राहुल पावरा यांचा मृतदेह नांदर्डे गावी पोहचल्यावर अंत्यदर्शनासाठी ग्रामस्थांची झालेली गर्दी. वैभव वाघ यांच्यावर पांढरद (ता. भडगाव) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. साश्रुनयनांनी वीर जवानांना अखेरचा निरोप पांढरद व नांदर्डे येथे शोककळा : वैभव वाघ व राहुल पावरा यांच्या अंत्यविध.
Rural News : अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक येथे प्रवरा नदीच्या पात्रात बचावकार्य करताना वीरमरण आलेले एसडीआरएफचे जवान राहुल गोपीचंद पावरा यांच्यावर नांदर्डे (ता. शिरपूर) येथे तर, वैभव सुनील वाघ (वय ३१) यांना पांढरद (ता. भडगाव) या आपल्या मूळ गावी शुक्रवारी साकुनयनांनी शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला
बचावकार्य करताना नाव उलटून शहीद झालेल्या वैभव सुनील वाघ या धुळे येथील राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानावर भडगाव तालुक्यातील पांढरद येथे शुक्रवारी शासकीय इतमामात अत्यसंस्कार : Brave soldiers from Pandharad and Nandarde
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक या गावी प्रवरा नदीपात्रात बचावकार्य करीत असताना नाव उलटून शहीद झाले होते. वैभव वाघ यांचे पार्थिव शुक्रवारी सकाळी गावात येताच कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. गावातील रस्त्यांवर रांगोळ्या घालण्यात आल्या होत्या. सजवलेल्या स्थावर त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले होते. यावेळी ‘वैभव वाध अमर रहे’च्या घोषणा देण्यात आल्या. वाघ यांना शेवटचा निरोप देण्यासाठी मोठा अनसमुदाय उपस्थित राहील, है लक्षात घेता गिरणा नदीजवळील शेतात अंत्यसंस्कारांसाठी व्यवस्था करण्यात आली होती.
आदिवासी समाजाची भाषा ‘आमुक छुडीन गयू तू पछू आव’ : Brave soldiers from Pandharad and Nandarde
बौराडी जि.धुळे: वीर मरण पावलेल्या राहुल गोपीचंद पावरा यांच्यावर नांदतें (ता. शिरपूर) येथे गुरुवारी मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारास शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. वीर जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी परिसरातील जवळपास दोन हजार नागरिक उपस्थित होते. यावेळी राहुल पावरा याच्या बहिणीने भाष आमुक छुडीन गयू तू पछु आव (भावा तू आम्हाला सोडून गेलास, तू परत ये) असे म्हणत टाहो फोडला तेव्हा उपस्थितांचेही डोळे पाणावले होते.
पावरा यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी एकाच परिवारातील अनेकजण शासकीय सेवेत : Brave soldiers from Pandharad and Nandarde
नांदई सारख्या लहान गावात पाठरा परिवाराकडे आदर्श परिवार म्हणून पाहिले जाते. राहुल पावरा यांचे वडील गोपीचंद पावरा है राज्य राखीव पोलिस बलात कर्मचारी होते. वडिलांच्या विचारांचा वारसा पुढे नेत राहुल पावरा यांनी एसडीआरएफची नोकरी पत्करली. आई वंशीबाई पावरा ह्या गृहिणी असून मोठा भाऊ नरेश पावरा है पण राज्य राखीव पोलिस बलात कार्यरत आहेत. बहीण सुमन पावरा या देखील सर्कल अधिकारी आहेत. जवळपास २५०० लोकवस्तीच्या गावात एकाच घरात इतके शासकीय कर्मचारी असण्याचा मान देखील याचं परिवाराला प्राप्त आहे.
नांदर्डसह बौराडी, वाघबडर्डी, वाडी, वाधाडी, शिरपूर, बुड़की, न्यू बोराड़ी आदी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. “अमर रहे, अमर रहे राहुल पावरा अमर रहे’ च्या घोषणा देण्यात आल्या, : Brave soldiers from Pandharad and Nandarde
यावेळी पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी भागवत सोनवणे, नायब तहसीलदार अधिकार पेंढारकर, विजय पाटील, पोलिस निरीक्षक कांतीलाल पाटील, पीएसआय सुरेश पांचाळ तसेच महसूल विभाग व जिल्हा राज्य राखीव पोलिस बल गटक्रमांक सहाचे विविध अधिकारी यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली. पोलिस दलाच्या तुकडीने बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून मानवंदना दिली.
Read More :
अशाच नवनवीन माहिती साठी : शासकीय योजना : माहिती अधिकार : ग्रामपंचायत चे माहिती : साठी आमच्या सोसिअल मेडिया ला जॉईन व्हा : आम्ही दररोज नवीन माहिती शेअर करत असतो. Brave soldiers from Pandharad and Nandarde
Related Notification Information : Brave soldiers from Pandharad and Nandarde | Click Here |
Join Us On WhatsApp | Click Here |
Join Us On Telegram | Click Here |
Join Us On Facebook | Click Here |
Official Website Information | Click Here |