यवतमाळ जिल्हा महागांव तालुक्यातील ग्राम भांब येथे धम्म ग्रंथ पठणाचे पुर्व बैठकीचे आयोजन. …..
( वि.प्र.जी.एम.भालेराव) दी.२४.०६.२०२३ रोजी यवतमाळ जिल्हा महागांव तालुक्यातील ग्राम भांब या छोट्याश्या गांवी, भगवान बुद्ध आणी त्यांचा धम्म ग्रंथाचं पठण सातत्याने होत रहावं याकरिता धम्म उपासक उपासिका व बाल बालीका यांनी सदर बैठकीचे आयोजन केले होते.
तथागत सम्यक सम्बुद्धांनी दु:ख मुक्तीचा मार्ग शोधुन मानवी जीवनाच्या कल्याणा करिता बहुजन हीताय बहुजन सुखाय धम्मानुकंपाय आदी कल्याणम मध्य कल्याणम परिसायेन कल्याणम असा उच्चत्तम धम्म दीला. अडीच हजार वर्षापासुन बुद्धाचा धम्म तग धरुन जर असेल तर यही पी सिक्को पहा निरीक्षण करा परिक्षण करा बुद्धीला पटेल तरच स्विकार करा असा निष्पक्ष आणी मुक्त असा ऐकमेव बुद्धाचा धम्म होय.
धम्म हा सरीते प्रमाणे प्रवाहीत होत रहावा,माणसा माणसातील मैत्री बंधुभावाचे ऋणानुबंध अतुट रहावे म्हणुनच बुद्बाच्या धम्म तत्वप्रणालीची नितांत आवश्यकता आहे.
आयु.अंबादास कांबळे, सामाजीक कार्यकर्ते यांच्या पुढाकाराने तसेच समस्त धम्म उपासक व उपासिका यांचे संयुक्त विचार विनियमातुन ग्रंथ पठण करण्यास व ग्रंथ श्रवण करण्यास सर्वानुमते संमती दर्शवीली.
वर्षावास प्रारंभ(आषाढ पोर्णीमा) दी.०३.०७.२०२३ पासुन होत असुन दी.१६.११.२०२३ रोजी वर्षावास समापन पर्यंत साथ सहयोग देऊया असं सदर बैठकीत सर्वांनी अनुमती दीली.
भांब या गांवी पन्नास ते साठ वर्षापासुन बुद्ध भीम गीतांचा वारसा लाभला असुन आजही यवतमाळ जिल्ह्याच्या अनेक तालुक्यात,ग्रामीण भागात गायनाच्या माध्यमातुन येथील गायक कलावंताना निमंत्रीत केले जाते ही या गावातील कलावंताची गायनरुपी मोठ्या प्रमाणातील ओळख आहे. गीतगायनातुन आंबेडकरी चळवळीचा प्रचार आणी प्रसार व्हावा तद्वतच समाज ऐकरुप होण्यास जनाधार वाढावा हा आमच्या कलावंताचा प्रांजळ उद्देश आहे असं सदर बैठकीत येथील गायक कलावंतानी आपले मनोगत व्यक्त केले.
धम्मग्रंथ बैठकी दरम्यान,धम्म उपासक अंबादास कांबळे,विश्वनाथ खंदारे भगवान कांबळे जनार्धन लोखंडे गजानन खाडे शुद्धोधन लोखंडे मनोहर भालेराव सुदर्शन लोखंडे गौतम लोखंडे किरण पांडे अमरसिंग राठोड सुनिल कांबळे अविनाश भालेराव(शिक्षक) सुभाष भालेराव प्रफ्फुल खंदारे समाधान कांबळे सक्षम भालेराव सम्राट खंदारे आर्यन खरे
उपासिका संघ: छायाबाई कांबळे कुसुमबाई लोखंडे संघमीत्रा लोखंडे सिंधुबाई खाडे अन्नपुर्णाबाई भालेराव सिमा भालेराव आम्रपाली भालेराव ज्योती भालेराव व इत्यादी उपासक उपासिका तथा बाल बालीकांची उपस्थीत होती.