Breaking News : समान नागरी कायद्या विरोधात बिरसा फायटर्सचे निवेदन.

समान नागरी कायद्या विरोधात बिरसा फायटर्सचे निवेदन.

प्रतिनिधी, शिरपूर : देशभरात ऐन लोकसभा निवडणुकिच्या पार्श्वभूमीवर चर्चेत असलेल्या आणि आदिवासी समाजावर अन्यायकारक अशा समान नागरी कायद्याला बिरसा फायटर्सने विरोध केला असून तसे निवेदन प्रांताधिकारी आणि तहसिलदार यांच्या मार्फत महामहिम राष्ट्रपति यांना पाठवले आहे.

 बिरसा फायटर्स तर्फे राष्ट्रपति आणि राज्यपाल यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटलेय की, भारत हा धर्म निरपेक्ष देश आहे. असे असतांना केंद्र सरकारद्वारा येवु घातलेल्या समान नागरी कायद्यामुळे आदिवासी समाजाच्या चालिरीती, रूढी, परंपरा, संस्कृती, वारसदार, समाजाची स्वतंत्र न्याय व्यवस्था आदींवर गंभीर परिणाम होतील. आणि यामुळे आदिवासी समाजाचे अस्तित्वच धोक्यात येईल असे म्हटले आहे. 

देशातील 700 पेक्षा अधीक आदिवासी समुदायांवर हिंदू किंवा कोणत्याही धर्माचे कोणत्याही प्रकारचे नियम लागू होत नाही. आदिवासी समाजाची समाज व्यवस्था आजही मौखिक नियमानुसार चालते. ज्याला रूढीगत विधी (कस्टमरी लॉ) म्हटले जाते. भारतीय राज्यघटनेतील कलम 13(3)(क) मधे प्रचलित रूढी, परंपरांना कायद्याचा दर्जा असल्याचे निवेदनात म्हटले आहे. समान नागरी कायद्यामुळे 5 वी 6 वी अनुसूची प्रभावीत होणार असल्याचेही म्हटले आहे.

निवेदन देतेवेळी बिरसा फायटर्सचे जिल्हाध्यक्ष वसंत पावरा, ॲड. भूरसिंग पावरा, अध्यक्ष नाशिक विभाग विलास पावरा बिरसा फायटर्स, सरदार पावरा, सुरेश पावरा, जिजाबराव पावरा, शांतीलाल पावरा आदी उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *