व्यवस्थेचा_बळी |
Manish Utekar ठाणे २३ वर्षाच्या तरुणाने वाहतूक पोलिसांच्या मानसिक छळामुळे आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सुसाईट नोटमध्ये लिहले आत्महत्याचे कारण.. सरकारला विनंती आहे की ,हे जे कोणी पोलीसअधिकारी आहेत.
त्यांच्यावर तत्काळ कारवाई करून त्यांना सेवेतून बडतर्फ करावे.
सुसाईट नोट –
मी मनिष उतेकर गटारी च्या दिवशी माझी गाडी कोपरी ठाणे ईस्ट या भागात ट्राफिक पोलीस मोरे साहेब यांनी रात्री च्या वेळी ड्रिंक & ड्राइव्ह मध्ये पकडलेली.
मी आर्मी भरती पोलीस भरती देणारा विद्यार्थी आहे गाडी पकडलेली त्यात त्यांनी आम्हाला सांगितले तुम्ही उद्या या आम्ही दुसऱ्या दिवशी सुद्धा गेलो माफी मागितली आणि काय असेल ते दंड तिथेच भरायला तयार होतो पण त्यांनी मला धमकी देऊन सांगितलं कोर्टात जावं लागेल माझ्या समोर कित्येक बाईक लाच घेऊन पैसे घेऊन सोडून दिले त्यांनी
मी परत तिसऱ्या दिवशी गेलो माफी मागितली सांगितलं साहेब माझं करिअर सर्व संपून जाईल कोर्टात गेलो तर तुम्ही दंड काय असेल ते घ्या मी देतो हिते.
ट्राफिक पोलीस पुष्पक साहेब, ट्राफिक पोलीस सुधाकर साहेब यांनी मला धमकी दिली तुझं करिअर च बरबाद करायचं आहे, भीती दाखवून दिली.
या सर्व भीती मुळे आज मी आत्महत्या करत आहे
आज ही माझ्यावर वेळ आले उद्या अशी वेळ कोणावर यायला नको
मी सर्व ट्राफिक पोलिसांचा मान ठेवतो but अस कधी कोणासोबत वागू नका जेणेकरून समोरचा माणूस प्रेशर टेन्शनमुळं आत्महत्या करेल म्हणून मी हे सर्व मेसेज करून ठेवत आहे आणि ती गाडी माझ्या मित्राची आहे त्यांची काही चुकी नाही बस ट्राफिक पोलीस सुधाकर साहेब, ट्राफिक पोलीस पुष्कर साहेब यांच्या दबावामुळे मी आज आत्महत्या करत आहे.
#ManishUtekar #JusticeForManishUtekar
CMOMaharashtra Devendra Fadnavis Ajit Pawar