Collector | या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला हा धाडसी निर्णय; Whatsapp, e-mail ID केला सार्वजनिक.

Usmanabad : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला हा धाडसी निर्णय; Whatsapp, e-mail ID केला सार्वजनिक.

जिल्हाधिकाऱ्यांच्या या धाडसी निर्णयाचे मात्र, सर्वस्तरातून स्वागत होत आहे.
जिल्हाधिकारी सचिन ओंबासे

जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांनी स्वतःचा व्हॉटसअॅपनंबर व ई- मेल आयडी सार्वजनिक केला आहे.

दहिवडी : सर्वच शासकीय कार्यालयात सर्वाधिक भ्रष्टाचार होत असतो. त्याला आळा घालण्यासाठी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी तथा माणचे सुपूत्र सचिन ओंबासे यांनी स्वतःचा व्हॉटसअॅपनंबर व ई- मेल आयडी सार्वजनिक केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील कोणत्याही कामाबद्दल कोणीही शासकीय ‘फी’ व्यतिरिक्त पैसे मागत असल्यास तत्काळ या क्रमांकावर व ईमेल आयडीवर माहिती द्यावी, असे आवाहन केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या धाडसी निर्णयाचे मात्र, सर्वस्तरातून स्वागत होत आहे.

जिल्हाधिकारी सचिन ओंबासे नुकताच पदाचा पदभार स्वीकारला.

सचिन ओंबासे यांनी नुकताच उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला आहे. त्यांनी लगेचच जिल्हाधिकारी कार्यालयात प्रलंबित असणा-या प्रकरणात नियमानुसार पात्र आढळणारी प्रकरणे तात्काळ निकाली काढण्याचा निर्णय घेतला. तसेच यात भ्रष्टाचार होवू नये यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील कोणत्याही कामासाठी शासकीय कर्मचारी, एजंट, खाजगी व्यक्ती यांनी पैशाची मागणी केल्यास सदरबाब निदर्शनास आणून देण्याचे आवाहन केले आहे.

जिल्हाधिकारी यांनी Whatsapp, e-mail ID  सार्वजनिक केला.

त्यांनी जिल्हाधिकारी व निवासी उपजिल्हाधिकारी यांचे व्हॅटसअॅप नंबर व वैयक्तिक ई-मेल आयडी सार्वजनिक केले असून यावर माहिती देण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील कोणत्याही विभागात भ्रष्टाचार होतोय हे लोकांकडून समजणार आहे. असा प्रकार जिल्हाधिकाऱ्यांच्या तातडीने निदर्शनास येणार आहे. जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांच्या या धाडसी निर्णयाचे मात्र, सर्वस्तरातून स्वागत होत आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील कोणत्याही कामाबद्दल. 

“कोणत्याही व्यक्तीला जिल्हाधिकारी कार्यालयातील कोणत्याही कामाबद्दल कोणीही शासकीय फी व्यतिरिक्त पैसे मागितल्यास तत्काळ मला माहिती द्यावी. माहिती देणाऱ्या व्यक्तींची नावे उघड करण्यात येणार नाहीत. तसेच ती उघड होणार नाहीत याबाबत खबरदारी घेण्यात येईल.”

सचिन ओंबासे (जिल्हाधिकारी उस्मानाबाद)*

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *