जलमिशन कामांची उच्च स्तरीय चौकशी करा-बिरसा आर्मी : Conduct High Level Inquiry into Jalmission works Birsa Army

Conduct High Level Inquiry into Jalmission works Birsa Army : जलमिशन कामांची उच्च स्तरीय चौकशी करा-बिरसा आर्मी (जिल्ह्यात अपूर्ण व निकृष्ट दर्जाची कामे) तळोदा व धडगाव तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री,जिल्हाधिकारी,मुख्य कार्यकारी यांना निवेदन.

जलमिशन कामांची उच्च स्तरीय चौकशी करा-बिरसा आर्मी : Conduct High Level Inquiry into Jalmission works Birsa Army

तळोदा:जलमिशन कामांची उच्च स्तरीय चौकशी करावी;यासाठी बिरसा आर्मीने धडगाव व तळोदा तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री,जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी नंदुरबार यांना निवेदन पाठवून केली आहे. निवेदनात म्हटले आहे की,’हर घर जल’ या संकल्पनेतुन मिशनच्या माध्यमातुन गावातील प्रत्येक घरात,शाळा व सार्वजनिक ठिकाणी पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आली. जलमिशन कामांची उच्च स्तरीय चौकशी करा-बिरसा आर्मी : Conduct High Level Inquiry into Jalmission works Birsa Army

परंतु,जिल्ह्यात होत असलेल्या अनियमित,निकृष्ट दर्जाचे कामे,बोगस कामे,निकृष्ट दर्जाचे साहित्य,मोठ्या गावात दोन टाक्या असतांना एकच टाकीचे बांधकाम,कामे न करता निधी हडप,ठराविक वार्डात कामे करणे या संदर्भात संघटनेने १८ एप्रिल २०२३ रोजी निवेदन दिले होते.परंतु,संबंधित प्रशासानाने दुर्लक्ष केल्याने एक वर्ष उलटूनही कामात सुधारणा झाली नाही.जिल्ह्यात अद्यापही ३० टक्केही जलमिशनची कामे झालेली नाही. जलमिशन कामांची उच्च स्तरीय चौकशी करा-बिरसा आर्मी : Conduct High Level Inquiry into Jalmission works Birsa Army

अगोदर बोर व टाकी बांधून पाण्याची व्यवस्था केली पाहिजे.परंतु,अनेक गावात पाण्याचा थेंब नाही.मात्र,बिले काढण्यासाठी नळ बसून,बोगस कामे करतांना निदर्शनास येत आहे.जिल्ह्यातील अनेक गावात कामे होतांना दिसत नाही.कागदोपत्री कामे न होता;कल्याणकारी योजना गावापर्यत प्रभावीपणे पोहचण्यासाठी व चांगल्या प्रतीची कामे होण्यासाठी उच्च स्तरीय चौकशी करून भ्रष्ट लोकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.अन्यथा,तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातुन देण्यात आला आहे.

हेही वाचा :

Conduct High Level Inquiry into Jalmission works Birsa Army

निवेदनावर बिरसा आर्मीचे धडगाव तालुकाध्यक्ष अजय वळवी,उपाध्यक्ष कुवरसिंग पराडके,सहसचिव पिंट्या वळवी,अनिल वळवी,राकेश पराडके, सुनील वळवी,अनिल ठाकरे, कांतीलाल वळवी,निर्मल वळवी, जितेंद्र वळवी,वनकर पराडके व तळोदा येथील निवेदनावर विभागीय प्रवक्ता दयानंद चव्हाण,तालुकाध्यक्ष देविसिंग वळवी,अक्कलकुवा तालुकाध्यक्ष मानसिंग पाडवी, तळोदा प्रवक्ता रमाकांत वळवी, संघटक कालूसिंग पावरा, संपर्कप्रमुख सायसिंग पाडवी, सहसंघटक रोशन ठाकरे,जेकमसिंग वळवी आदी.कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.

हेही वाचा :

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *