लाडकी बहीण योजनेच्या कामास CSC सेतू चालकांनी कामावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला : CSC Setu Kendra Boycott the work of Ladaki Baheen Yojana
CSC Setu Kendra Boycott the work of Ladaki Baheen Yojana :लाडकी बहीण योजनेच्या कामास CSC सेतू केंद्रांचा नकार अर्ज भरण्याचे किती दर देणार हे निश्चित नाही.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अंगणवाडी सेविकांना प्रती लाभार्थी ५० रुपये अनुदान शासनाने जाहीर केले. मात्र CSC सेतू चालकांना मानधन देण्याबाबत कोणताही निर्णय घेतला नसल्याने सेतू चालकांनी या कामावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला.
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेअंतर्गत महिलांना मासिक दीड हजार रुपये देण्याचा निर्णय
शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेअंतर्गत महिलांना मासिक दीड हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. याबाबत विविध कागदपत्रांसह प्रस्ताव सादर करायचा आहे. अंगणवाडी सेविकांना अर्ज भरण्याचे काम देण्यात आले. काम पूर्ण झाल्यावर त्यांना प्रती लाभार्थी ५० – रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. अनेक महिला सेतूमध्येही जात – आहेत. मात्र सेतू चालकांना किती – मानधन मिळणार याबाबत शासनाने – अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. उलट जर सेतू चालकांनी पैसे घेतले, तर कारवाई करण्याचा इशारा शासनाने दिला.
मात्र, आम्हालाही पोटपाणी आहे, पीकविमा अर्जाचे पैसे अद्यापही प्रलंबित एक रुपयात पीक विमा योजना सुरू झाल्यापासून आम्ही ऑनलाईन अर्ज भरून घेतले. त्यासाठी प्रती लाभार्थी ३२ रुपये असा दर ठरवून दिलेला होता. दोन वर्षांपासून त्याचे पैसे आम्हाला प्राप्त झाले नाही. त्यामुळे यावर्षी पीकविमा अर्ज भरायला सेतूचालक फारसे उत्साही नसल्याचे अध्यक्ष प्रसाद लड्डा यांनी सांगितले.
आमच्याकडे जे मुले काम करतात. त्यांना पगार द्यावा लागतो, वीज बिल व सद्याच्या या काळात झेरॉक्स ची रिम महागले, प्रिंटींग मशिनी चे कॅलर्स महागले, त्या सोबत इतर खर्चही आम्हाला येतो. आम्ही मोफत काम कसे करणार? आम्हाला योग्य तो मोबदला मिळाला पाहिजे, अशी मागणी करत तो देण्याऐवजी उलट कारवाई करणार असल्याचे बोलले जात आहे. शासन प्रत्येक योजनेचे अर्ज भरताना त्याचे दर जाहीर करते. याचाही करावा. आम्हाला मोबदला मिळाला नाही, तर आम्ही काम करणार नाही. त्यामुळे सध्या हे काम न करण्याचा निर्णय श्रीरामपूर तालुक्यातील सेतू चालकांनी घेतला.
CSC केंद्र चालकांनी देखील नकार घेतला ? CSC Setu Kendra Boycott the work of Ladaki Baheen Yojana
कारण CSC च्या कामावर फक्त केंद्र सरकारच्या योजना ची कामे करावी लागतात, परंतु त्या योजना देखील वर्षातून एक दोन वेळेस येतात, राज्य सरकारच्या आशा कोणत्याही योजना किंवा इतर कामे नाहीत, CSC केंद्र चालकांना फक्त CSC ची ID देऊन फक्त झेरॉक्स च्या चे कामे करावे लागतात, अशातच CSC केंद्र चालक आणि सेतू केंद्र चालक यांनी आता निर्णय घेतला आहे. कोणतेही कागदपत्रे झेरॉक्स करणे महाग होणार, तसेच इतर शासकीय योजनाचे फोर्म भरायचे, शासकीय नोकरी चे फोर्म भरायचे जास्त पैसे लागणार असेही CSC केंद्र चालक यांचे म्हणणे आहे.
हेही वाचा :
- सीएससी चालकाची अशीही पदभरती झाली. CSC Center was also recruited.
- Best माहिती CSC केंद्रसाठी अर्ज कसा करावा. | How to Apply for CSC Center 2023 In Marathi
- What is CSC in Marathi | Best Information CSC In Marathi | CSC म्हणजे काय?
Important Links :
Related Notification Information Pdf : | Click Here |
Official Website Information Link : | Click Here |
Join Us On Facebook | Click Here |
Join Us On Telegram | Click Here |
Join Us On WhatsApp | Click Here |
Join Us On Instagram | Click Here |