आरोग्य अधिकारी संघटनेचा जिल्हा मेळावा. |
समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेचा जिल्हा मेळावा उत्साहात संपन्न.
मा. केंद्रीय संरक्षण राज्य मंत्री खासदार मा. बाबासाहेब डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला धुळे जिल्हा समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेचा जिल्हा मेळावा
दि:18/09/2022 रोजी धुळे येथील पद्मश्री टॉवर येथे जिल्ह्यातील समुदाय आरोग्य अधिकारी यांचा जिल्हा मेळावा आयोजित करण्यात आला होता…
यावेळी कार्यक्रमचे उदघाट्न धन्वंतरी चे पूजन व दीपप्रज्वलन करून झाले,
यावेळी कोरोना काळात आरोग्य सेवा बाजावीत असताना शाहिद झालेल्या समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या परिवारातील सदस्यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली..
खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी मनोगत व्यक्त केले* यावेळी डॉ. भामरे यांनी समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे असा शब्द दिला
आपल्या समस्या आणि भविष्यातील गरजा जाणून घेत त्यावर लवकरच केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसूख मांडविया यांची भेट घेऊन आपले प्रश्न लोकसभेत मांडेल आणि आपल्याला न्याय मिळवून देईल
यात प्रमुख्याने -समुदाय आरोग्य अधिकारी यांना सेवेत कायम करणे,इन्क्रिमेंट, पी. एफ. लागू करणे, जिल्हा तालुका अंतर्गत बदल्या,पती-पत्नी एकत्रिकरण,विमा कवच या आपल्या सर्व मागण्या केंद्रीय आरोग्य मंत्री तसेच राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून आपल्या मागण्या मी व्यक्तिशः दिल्लीदरबारी मांडून नक्की पूर्ण करेल असे अश्वासन दिले
यांनतर धुळे पंचायत समितीचे सभापती प्रा. विजय पाटील यांनी आपल्या मनोगततून सी. एच.ओ यांचे कौतुक केले.
अध्यक्षीय भाषण डॉ. प्रकाश मोरे यांनी केले.
यांनंतर दुपारच्या सत्रात प्रश्न आपला उत्तर आमचे हे चर्चा सत्र आयोजित केले होते यात बऱ्याच समुदाय आरोग्य अधिकारी यांनी आपल्याला समस्या मांडल्या त्यावर *अध्यक्ष डॉ. प्रकाश मोरे यांनी समाधानकारक उत्तर देत भविष्यात आपल्या सगळ्या समास्या दूर करू असा विश्वास दिला
उपकेंद्र स्तरावर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे संघटनेकडून प्रशस्ती पत्र देऊन सन्मान करण्यात आला
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. जगदीश शिंदे व डॉ.दीपक सटोटे यांनी केले, स्वागत व आभार प्रदर्शन ही शिंदे यांनी केले*
यावेळी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून खासदार मा. डॉ. सुभाष भामरे होते सोबत धुळे ता. पंचायत समितीचे सभापती प्रा.विजय पाटील,पंचायत समिती सदस्य प्रा.रितेश परदेशी,डॉ.गणेश भगत पुणे,
समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेचा जिल्हा मेळावा उत्साहात संपन्न. |
कार्यक्रमाचे अध्यक्ष धुळे जिल्हा समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रकाश मोरे होते.
तसेच समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेचे पदाधिकारी मान्यवर *डॉ.योगेश पाटील, डॉ. राहुल जाधव,डॉ. प्राची चौरे, डॉ.विनोद क्षीरसागर,डॉ. विश्वास पाटील, डॉ. अमोल पाठक, डॉ. हर्षा भट श्री. योगेश पाटोळे,* श्री रोहित पवार, श्री. भटू पाटील, श्री. त्र्यंबक घरटे,डॉ कल्पेश पाटील, डॉ. गोपाळ शिंपी तसेच जिल्ह्यातील सर्व समुदाय आरोग्य अधिकारी यावेळी उपस्थित होते