Electricity, accident, care and compensation वीज, अपघात, काळजी आणि नुकसान भरपाई.

Mahavitran Graminbatmya
Mahavitran (Msedcl)


विद्युत अपघाताबद्द्लची नुकसान भरपाई विद्यत पुरवठा करणाऱ्या कंपनीकडे करता येते.

अपघात झाल्यावर नुकसान भरपाई मिळणेसाठी विविध पुरावे देऊन पाठपुरावा करत बसण्यापेक्षा अपघात न होण्यासाठी छोट्या – मोठया गोष्टींची, स्वत:च्या व इतरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून व्यवस्थित काळजी घेतल्यास होणारे गंभीर वीज अपघात ग्राहक निश्चितपणे टाळू शकतो. शेवटी सर्व प्रकारच्या विद्युत अपघाताबद्द्लची नुकसान भरपाई विद्यत पुरवठा करणाऱ्या कंपनीकडे करता येते. तेथे ग्राहकाचे समाधान न झाल्यास जिल्हा ग्राहक न्याय मंचाकडे दाद मागता येऊ शकते.

विजेमुळे होणारे अनेक गंभीर अपघात.

मानवी जीवनात अन्न, पाणी, वस्त्र, निवारा याबरोबर सध्याच्या काळात वीजेचीही अत्यंत आवश्यकता भासत आहे. परंतु वीजेचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करावा लागतो. कारण आपण अनेक ठिकाणी विजेमुळे होणारे अनेक गंभीर अपघात पाहत असतो. विद्युत अपघात हे प्रामुख्याने मनुष्यहानी, स्थावर जंगम मालमत्ता व पाळीव प्राणी इ. बाबतीत होत असतात. या घटकांचे नुकसान विद्युत अपघाताने झाल्यास संबंधित वीज पुरवठा करणा-या कंपनीकडे नुकसान भरपाई मागता येते.

विद्युत अपघातातील पोलीस पंचनामा.

विजेचा झटका बसून व्यक्ती किंवा प्राणी दगावल्यास सर्वात प्रथम जवळच्या वीज पुरवठा करणा-या कंपनीच्या शाखा कार्यालयात / कर्मचा-यांना कळवावे. तसेच, पोलीस स्टेशनला कळवणे आवश्यक आहे. पोलीस पंचनामा होईपर्यंत मृतदेह घटनास्थळापासून हलवू नये. विद्युत अपघातातील व्यक्ती किंवा प्राणी यांच्या पोस्टमार्टमचे अहवाल, पोलीस पंचनामा इत्यादीच्या प्रति नुकसान भरपाई दाव्यासाठी आवश्यक आहेत. वीजपुरवठा करणारे सर्व खांब, तारा, सर्व्हिस लाईन व मीटर पर्यंत काही दोष निर्माण होऊन झालेल्या अपघातास विद्युत पुरवठा करणारी संबंधित कंपनी जबाबदार असते.ग्राहकाच्या फिटिंगमधील दोष अथवा उपकरणांच्या दोषामुळे अपघात झाल्यास संबंधित कंपनी जबाबदार नसते. विद्युत अपघाताची माहिती मिळताच वीज कंपनीचे अधिकारी / कर्मचा-यांनी अपघात स्थळी ताबडतोब जाऊन वीज पुरवठा बंद झाल्याची खात्री करणे आवश्यक आहे. तसेच जवळच्या रहिवाशांबरोबर संपर्क साधून अपघाताच्या कारणांचा शोध घेतला पाहिजे. जवळच्या पोलीस स्टेशनला कळवून विद्युत निरीक्षक यांनाही कळवणे बंधनकारक आहे. विद्युत निरीक्षक अपघातस्थळी पाहणी करून, विद्युतवाहिन्या पोलीस पंचनामा, इतर निरीक्षणे करून अधिकारी / कर्मचारी यांची जबाबदारी निश्चित करून तसा अहवाल देतात. नैसर्गिक आपत्ती व अपघातातील व्यक्तीचा काही दोष नसताना वीज पुरवठा करणा-या व उपकरणे यांच्या संपर्कात आल्याने अपघात होऊन मृत्यू झाल्यास किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास वीज कंपनीकडे नुकसानभरपाई मागता येते.

विद्युत अपघात झाल्यावर नुकसान भरपाई.

विद्युत कंपनीच्या प्रशासकीय परिपत्रकानुसार माणसांना आणि प्राण्यांना प्राणांतिक अपघात झाल्यास आर्थिक नुकसानभरपाई दिली जाते माणसांना अप्राणांतिक अपघात झाल्यास रु. २.५ लाख नुकसानभरपाई देण्यात येते. जर माणसांना प्राणांतिक अपघात झाला तर मृत व्यक्तीचे वय आणि कमाईची क्षमता याचा विचार करून रु. ४ लाख इतकी नुकसानभरपाई दिली जाते. अशा अपघातात इतर संबंधित लोकसुद्धा प्राणांतिक अपघातासाठी रु. २०,००० आणि अप्राणांतिक अपघात झाल्यास रु. १००० ते रु. ५००० इतक्या तातडीच्या आर्थिक मदतीसाठी दावा करू शकतात. प्राण्यांना अप्राणांतिक अपघात झाल्यास रु. २००० ची आर्थिक मदत करण्यात येते. (एस.एस.ई.डी.सी.एल.प्रशासकीय परिपत्रक क्र. ५३३ दि. ९ मार्च २०१६ आणि एस.एस.ई.डी.सी.एल.प्रशासकीय परिपत्रक क्र. १९२ दि. २० नोव्हें २००८) सुरुवातीला दिलेली तातडीची मदत ही नंतरच्या भरपाईच्या रकमेतून वळती केली जाते. बैल, गाय, म्हैस, घोडा इ. पाळीव प्राणी मृत झाल्यास जास्तीतजास्त रु. ३०,०००/- इतकी नुकसानभरपाई मिळू शकते आणि बकरा, शेळी, गाढव, वासरू इ. प्राणी मृत झाल्यास जास्तीतजास्त रु. ३००० इतकी नुकसानभरपाई संबंधित वीज कंपनीकडून मिळू शकते.

विद्युत अपघातातील नुकसानभरपाई साठी अर्ज

त्यासाठी पोलीस पंचनामा, मृत्यू झाला असल्यास वैद्यकीय अधिका-यांच्या पोस्टमार्टमचा अहवाल, सक्षम महसूल अधिका-यांचा वारसा दाखला, पोलिसांचा एफआयआर, कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास शासकीय दवाखान्यात औषधोपचाराचे दाखल खर्चाचे बिल, पावत्या तसेच अपघातातील मृत प्राण्याबाबतीत पशु वैद्यकीय अधिका-यांचा किंमतीबाबतचा दाखला इ. कागदपत्रे जोडून वीज पुरवठा करणा-या स्थानिक उपविभागीय कार्यालयास नुकसानभरपाई साठी अर्ज करता येतो.

विद्युत अपघाताचा फॉर्म (एफ’ नावचा Form )

 विद्युत अपघाताचा अहवाल देण्यासाठी उर्जा मंत्रालयाने ‘फॉर्म –एफ’ नावचा एक फॉर्म प्रसिद्ध केला आहे. य अधिसूचनेनुसार अपघाताची सूचना विद्युत निरीक्षकाला देण्याचे काम ग्राहक किंवा कनिष्ठ अभियंत्यापेक्षा खालच्या पदावर नसलेला कंपनीचा कोणताही कर्मचारी फॉर्म – एच्या नमुन्यानुसार करू शकतो. विद्युत अपघात घडल्यापासून विद्युत निरीक्षकाला २४ – ४८ तासांच्या आत त्याची सूचना देणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील सर्व वीज निरीक्षकांची विभागावर संपर्क माहिती महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे..

Next Page Click Here 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *