Floorball Association Of Maharashtra | फ्लोअर बॉल राज्य अजिंक्यपद स्पर्धेत विजय पावरा याची राष्ट्रीय पातळीवर निवड.

विजय पावरा याची फ्लोअर बॉल स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर निवड.


शिरपूर: नंदुरबार येथे दिनांक २५ ते २७ ऑगस्ट दरम्यान जिल्हा क्रीडा संकुल नंदुरबार येथे फ्लोअर बॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मार्गदर्शनाखाली ९ वी वरिष्ठ गट फ्लोअर बॉल राज्य अजिंक्यपद स्पर्धा पार पडली. स्पर्धेत गंगामाई इंन्सस्टीट्यूट ऑफ फार्मसी येथे शिक्षण घेत असलेले आणि जोयदा गावाचे नाव राष्ट्रीय विपातळीवर पोहचवणारा विजय पावरा यांनी ओपन टीम कडून खेळतांना आपले अप्रतिम खेळ कौशल्य दाखवत राष्ट्रीय पातळीवर निवड पक्की केली. आता विजय पावरा राष्ट्रीय आणि ओलंपिकची तयारी करत आहे. 

जोयदा खेडेगावात राहणाऱ्या विजयची घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे. लहानपणापासून विजय धाडसी आणि साहसी आहे. कोणतेही काम जिद्दीने, मन लावून करण्याची त्याची पद्धत आहे. त्याला शिक्षणाबरोबर फ्लोअर बॉल व हॉकी खेळात विशेष आवड होती. त्यामुळेच त्याने आज राष्ट्रीय विटीममधे स्थान मिळवले. विजयच्या या कामगिरीने त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

नंदुरबार येथे फ्लोअर बॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मार्गदर्शनाखाली ९ वी वरिष्ठ गट फ्लोअर बॉल राज्य अजिंक्यपद स्पर्धा पार पडली.


विजय पावरा याचे इ. १ ली ते १२ वीचे शिक्षण श्री. छत्रपती शिवाजी सैनिकी विद्यालय मोराणे येथे झाले व पदवी शिक्षण गंगामाई इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी नगांव येथे चालू आहे. परिस्थितीवर मात करत राष्ट्रीय स्पर्धेपर्यंत मजल मारलेल्या विजयवर जोयदा गावासह परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *