ग्रामीण बातम्या : गडचिरोली कर्ज घेण्यासाठी एरवी बँकेत अर्जफाटे करून कागदपत्रांची पूर्तता करता – करता दमछाक होते. पण, कुरखेडा येथील संस्कार क्रेडिट को-ऑप. सोसायटी म., गडचिरोली या संस्थेत कुठल्याही कर्जासाठी अर्ज केलेला नसताना लाखोंची ‘लक्ष्मी’ जमा केली जायची व काही वेळेतच गडपही व्हायची, खातेधारकांच्या परस्पर ही सगळी अफरातफर सुरू होती. ( Fraud case against 14 people including BJP taluk president )
१९ डिसेंबरला कुरखेडा ठाण्यात संस्कार क्रेडिट को-ऑप. या संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालकांसह १४ जणांवर फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला. आरोपींमध्ये भाजप तालुकाध्यक्ष चांगदेव फायेंचाही समावेश आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, वेदप्रकाश विजयसिंग राठोड (३८, रा. गांधी वॉर्ड चौक, कुरखेडा) असे तक्रारदाराचे नाव आहे. ते संस्कार क्रेडिट को ऑप. सोसायटीचे भागधारक व दैनंदिन बचत खातेधारक आहेत. कोरची शाखेतील तत्कालीन व्यवस्थापक शुभम राजकुमार परिहार यांच्या खात्यातून परस्पर २१ लाख ५० हजार रुपये कर्ज उचलले, प्रभारामकुमार परिहार यांच्या नावे २० लाख९९ हजार ९०० रुपये कर्ज उचलले. मुनेश्वर पारधी, लोमेश पारधी या खातेदारांच्या नावेही परस्पर कर्ज उचलल्याचे तक्रारीत नमूद आहे.
Fraud case against 14 people including BJP taluk president
संस्थेचे लेखापरीक्षण केले नाही. दायित्व नियम ३५चे उल्लंघन केले, निधी निर्मिती व विनियोगाबाबत वार्षिक सभेत मंजुरी घेतली नाही, असा दावाही तक्रारीत केला आहे. कुरखेडा पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम ४०६, ४०७, ४०८, ४०९, ४१८, ४२०, ५६४, ५६५, ४६८, ४७१, ४७४, ४७७ – अ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. उपनिरीक्षक वर्षा बोरसे तपास करत आहेत.
ना कारण, ना तारणदरम्यान, या संस्थेने विशिष्ट लोकांना कुठलेही कारण नसताना व काहीही तारण न ठेवता लाखोंचे कर्ज दिले व ते एकरकमी खात्यातून उचलले. संस्थेची आर्थिक क्षमता नसतानाही बेकायदेशीरपणे लाखोंचे कर्ज रेवड्या – फुटाण्याप्रमाणे वाटले, असा आरोपदेखील तक्रारदार वेदप्रकाश राठोड यांनी ठेवला आहे.
..यांच्यावर गुन्हा नोंदसंस्कार क्रेडिट को-ऑप. सोसायटीचा अध्यक्ष मनीष फाये, मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज बांगरे, संस्था उपाध्यक्ष व भाजप तालुकाध्यक्ष चांगदेव फाये, संचालक दीनदयाल भट्टड, नितीन कावळे, मंगेश मांडवे, हरिश टेलका, लक्ष्मण धुळसे, परसराम नाट, चेतना कुंभलवार, मंगला वडीकर, व्यवस्थापक दिवाकर देवांगण, कर्ज अधिकारी प्रल्हाद लांजे यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे.
( Fraud case against 14 people including BJP taluk president )
Cupid in Flight
48” x 48” Giclee print on archival paper.
Riva su kaçak tespiti Su kaçağını kısa sürede tespit edip onardılar, beklediğimden çok daha iyiydi. http://brandconti.com/author/kacak/