काँग्रेसचा उमेदवार ॲड. गोवाल पाडवींचा जल्लोष Victory Of Adv Gowal Padavi It was beneficial to Congress

काँग्रेसचा उमेदवार ॲड. गोवाल पाडवींचा जल्लोष Victory Of Advocate Gowal Padavi It was beneficial to Congress
काँग्रेसचा उमेदवार ॲड. गोवाल पाडवींचा जल्लोष Victory Of Advocate Gowal Padavi It was beneficial to Congress
Victory Of Advocate Gowal Padavi It was beneficial to Congress

काँग्रेसचा उमेदवार ॲड. गोवाल पाडवींचा जल्लोष Victory Of Advocate Gowal Padavi It was beneficial to Congress

शिरपुरात महाविकास आघाडीतर्फे जल्लोष कार्यकर्त्यांनी धरले ठेके: एकमेकांना पेढे भरवून व्यक्त केला आनंद नंदुरबार लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे ॲडव्होकेट गोवाल पाडवी मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्याबद्दल शिरपूर शहरात गुलाल उधळत ढोल-ताशाच्या गजरात फटाक्याची आतषबाजी करीत पेढे वाटून जल्लोष करण्यात आला. 

दि. ४ रोजी नंदुरबार येथे नंदुरबार लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी होऊन पहिल्या फेरीपासून काँग्रेसचे पाडवी भाजपाच्या डॉ. हीना गावित यांच्यापेक्षा सरस होते. शेवटपर्यंत गावितांना मताधिक्य मिळविता आले नाही. शिरपूर विधानसभा मतदारसंघ वगळता अन्य तालुक्यांत भाजपला फारशी मते मिळविता आले नसल्यामुळे पराभव पत्कारावा लागला.

 हीना गावितांचे बॅनर उतरविले.

मतमोजणी सुरू होण्यापूर्वीच भाजपाच्या डॉ. हीना गावीत यांचे अभिनंदनाचे बॅनर शहरातील मुख्य बाजारपेठेतील दुभाजकावरील इलेक्ट्रिक खांबावर लावले होते. मात्र, भाजपची प्रत्येक फेरीत पीछेहाट होत असताना लागलीच बॅनर उतरविण्यात आले. दुपारी २ वाजेपर्यंत काँग्रेसचे अन् अॅड. पाडवी यांचे लाखाहून मताधिक्य मिळत असताना शिरपूरसह अन्य विधानसभा मतदारसंघात जल्लोष साजरा होत होता.

महाविकास घटक पक्षातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी शिरपूर शहरातील पाचकंदील चौकात ढोल-ताशांच्या गजरात गुलाल उधळत फटाके फोडत जल्लोष केला. शिरपूर शहरातील पाचकंदील चौकात ढोल-ताशांच्या गजरात नाचताना महाविकास आघाडीचे कार्यकर्ते. त्यानंतर कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे खाऊ घातले. यावेळी सेनेचे भरत राजपूत, युवराज पाटील, विभा जोगराणा, देवेंद्र पाटील, बबलू शेख, वाजिद मलक, जितू राठोड, संदीप पाटील, हेमराज राजपूत, चंद्रकांत पाटील, समाधान पाटील, रोहित रामोळे, जावेद शेख आदी उपस्थित होते.

महायुतीतील घटक पक्षांची नाराजी काँग्रेसला ठरली फायदेशीर विजय गोवाल पाडवींचा, जल्लोष : Victory Of Advocate Gowal Padavi It was beneficial to Congress

नंदुरबार : नंदुरबार लोकसभा मतदारसंघात महायुतीतील घटक पक्षांची नाराजी दूर करण्यात भाजपला अपयश आल्याने त्याचा फायदा काँग्रेसला झाला. त्याचाच परिपाक म्हणून नंदुरबारला काँग्रेसच्या विजयाचा जल्लोष खऱ्या अर्थाने शिवसेना शिंदे सेनेचे नेते व माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या कार्यालयासमोर पहायला मिळाला. विशेष म्हणजे या जल्लोषात स्वतः रघुवंशी व त्यांचे पुत्र शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अॅड. राम रघुवंशी यांनीही सहभागी होत कार्यालयाच्या गॅलरीतूनच नाचण्याचा ठेका धरल्याने तेथील विजयाचा आनंदोत्सवाला वेगळीच रंगत आली होती.

या मतदारसंघात निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच भाजपच्या उमेदवार डॉ. हीना गावित यांच्या उमेदवारीला विरोध होता. त्यासंदर्भात जाहीरपणे महायुतीतील घटक पक्ष व पक्षातीलही अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भूमिका मांडली होती. मात्र असे असतानाही भाजपने डॉ. हीना गावीत यांना उमेदवारी दिली. विशेष म्हणजे उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही डॉ. हीना गावित व आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांनी नाराज पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला नाही.

भाजपचे अनेक पदाधिकारी व डॉ. गावीत यांचे पूर्वाश्रमीचे समर्थक त्यांच्या फोनची प्रतीक्षा करीत राहिले. पण गावीतांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने नाराजांची नाराजी वाढली. त्यामुळे या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्षपणे भाजपसाठी पूर्णपणे योगदान दिले नसल्याचे चित्र आहे. अनेक भाजप पदाधिकाऱ्यांनी जड अंतकरणातून पक्षाचा प्रचार केल्याचे चित्र प्रचार काळात दिसून आले. महायुतीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गट यांनाही सुरुवातीपासून सोबत घेण्याकडे भाजपने दुर्लक्ष केले.

विधानसभा मतदार संघनिहाय उमेदवारांना मिळालेली मते खालीलप्रमाणे किंवा क्लिक करून वाचा :

काँग्रेसचा उमेदवार ॲड. गोवाल पाडवींचा जल्लोष Victory Of Advocate Gowal Padavi It was beneficial to Congress
काँग्रेसचा उमेदवार ॲड. गोवाल पाडवींचा जल्लोष Victory Of Advocate Gowal Padavi It was beneficial to Congress

महायुतीतील घटक पक्षांची नाराजी भोवली. मुख्यमंत्री येऊनही नाराजी कायम

  • ■ जिल्ह्याच्या राजकारणात रघुवंशी आणि गावीत परिवार हे पारंपरिक राजकीय विरोधक मानले जातात. यावेळी डॉ. हीना गावितांना उमेदवारी देऊ नये यासाठी चंद्रकांत रघुवंशींनी जाहीर भूमिका घेतली होती. मात्र भाजपने हीना गावितांना उमेदवारी दिली. त्यामुळे रघुवंशी सुरुवातीपासून प्रचारात लांब राहिले.
  • ■ उमेदवारी जाहीर झाल्यानंतर गावीतांकडून प्रचारात सक्रिय होण्याबाबत किमान फोन येईल याची ते प्रतीक्षा करीत राहिले. मात्र तब्बल महिनाभर गावीतांकडून कुठलीही प्रतिक्रिया आली नाही. याउलट रघुवंशी आता संपले आहेत, त्यांचे कुठलेही राजकीय अस्तित्व नाही, अशा स्वरुपाची प्रतिक्रीया डॉ. गावीत यांची सोशल मिडीयावर झळकली. त्यामुळे रघुवंशींची नाराजी अधिकच वाढली.
  • ■ अखेर ही नाराजी दूर करण्यासाठी प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रघुवंशींच्या कार्यालयात आले. मात्र त्यातूनही ती नाराजी दूर झाली नाही. प्रचार काळात रघुवंशी यांचे सर्व कार्यकर्ते काँग्रेसचा उघड प्रचार करीत होते. त्यांच्या पक्षातील पदाधिकारी देखील रघुवंशींचे समर्थक असल्याने त्यांनीही काँग्रेसचा प्रचार केला. त्याचा भाजपला मोठा फटका बसल्याचे निकालातन दिसते.

राष्ट्रवादी काँग्रेसही प्रचारापासून लांब : Victory Of Advocate Gowal Padavi It was beneficial to Congress

महायुतीचा दुसरा घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी देखील भाजपच्या प्रचारात पूर्णपणे सक्रिय नसल्याचे दिसून आले. या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये देखील सन्मानाने प्रचारासाठी सोबत घेतले गेले नसल्याच्या प्रतिक्रिया उमटल्या. पालकमंत्री अनिल पाटील यांनी हा दुरावा कमी करण्यासाठी मध्यस्थी केली. त्यामुळे दोन दिवस आलबेल दिसले. पण त्यानंतर देखील या पक्षाचे पदाधिकारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा वगळता इतर ठिकाणी दिसून आले नसल्याचे चित्र आहे.

Read More : 

अशाच नवनवीन माहिती साठी : शासकीय योजना : माहिती अधिकार : ग्रामपंचायत चे माहिती : साठी आमच्या सोसिअल मेडिया ला जॉईन व्हा : आम्ही दररोज नवीन माहिती शेअर करत असतो. Victory Of Advocate Gowal Padavi It was beneficial to Congress

Related Notification Information Pdf : Victory Of Advocate Gowal Padavi It was beneficial to Congress Click Here
Official Website Information Link : Victory Of Advocate Gowal Padavi It was beneficial to Congress  Click Here
Join Us On Facebook  Click Here
Join Us On Telegram  Click Here
Join Us On WhatsApp  Click Here
Join Us On Instagram  Click Here

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !