शेवगांव तालुक्यातील वाघोली येथील महिलांचे गावात दारूबंदी करण्यासाठी शेवगाव पोलीस निरीक्षकांना निवेदन अवैध दारु विक्रेता प्रतिथयश शिक्षण संस्थेत शिक्षक?
गावात दारूबंदी करण्यासाठी ग्रामसभेत केला ठराव पास. |
शेवगाव प्रतिनिधी: दि 30 ऑक्टोबर शेवगाव तालुक्यातील वाघोली गावातील अवैधपणे सुरू असलेली दारू विक्री बंद करण्यासाठी ग्रामपंचायत वाघोली येथील सरपंच बाबासाहेब घाडगे उपसरपंच जमेराताई पवार ग्रामसेवक जनाबाई फटाले यांनी मासिक सभेत १७ ऑक्टोबर २२ रोजी ठराव केला होता.
दारू विक्री बंद करण्यासाठी ग्रामसभेत मागणी केली होती.
याबाबत सविस्तर माहिती अशी की शेवगाव तालुक्यातील मौजे वाघोली येथील ग्रामसभेत चर्चा झाली असता गावातील खालील सह्या करणाऱ्या सर्व नागरिक व महिला पुरुष यांनी गावातील अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी ग्रामसभेत मागणी केली होती. त्यानुसार सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या उपस्थितीत दारूबंदी विक्री बंद करण्याचा ठराव करण्यात आला.
महिला चे संसार उघड्यावर पडण्याची भीती.
काल दिनांक शनिवार २९ रोजी शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये वाघोली येथील महिला व पुरुषांनी येऊन शेवगाव पोलीस निरीक्षक यांना यासंबंधीचे लेखी निवेदन दिले. या निवेदनामध्ये असे म्हटले आहे की, अवैध दारू विक्रीमुळे गावातील नवयुवक वर्ग ही व्यसनाधीनतेच्या मार्गाकडे चालला आहे, तसेच महिला चे संसार उघड्यावर पडण्याची भीती निर्माण झालेली आहे, पोलीस खात्याकडून ही दारू विक्री बंद करण्यात आली नाही तर रस्ता रोको आंदोलन उभे करू, येत्या आठ दिवसाच्या आत पोलीस खात्याकडून संबंधित दारू विक्रेत्यावर कारवाई करून दारू विक्री बंद करण्यात यावी अन्यथा कोणतीही पूर्व सूचना न देता ‘ रस्ता रोको’ आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी महिलांनी दिला.*
गेल्या ३० वर्षापासून आज अखेर काही व्यक्ती बाहेरील गावातून देशी दारू खरेदी करतात व वाघोली गावात दारू विक्रीचा व्यवसाय करतात. या निवेदनावर भरत आल्हाट, उमेश भालसिंग, संतोष आल्हाट, संगीता आल्हाट, रेखा आल्हाट, अर्चना आल्हाट, मीना आल्हाट राधा आल्हाट, सुनिता आल्हाट, नालाबाई आल्हाट, मार्था आल्हाट, सविता आल्हाट, ललिता काळे, शरद आल्हाट, भगवान भालसिंग, सोपान पवार, रवींद्र आल्हाट, वाघोली सेवा सोसायटीचे संचालक सोपान जमदाडे, बाजीराव आल्हाट, संतोष अल्हाट, बाळासाहेब आल्हाट, संजय आल्हाट, अण्णासाहेब आल्हाट, श्रीधर आल्हाट यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. *शेवगाव पोलीस स्टेशनच्या वतीने विश्वास पावरा यांनी निवेदन स्वीकारले*
*ताजा कलम*
*दिवसा शिक्षकी पेशा करून रात्री दारु विकणारा हाrचा पिंजऱ्यातील शिक्षक कोण शेवगावं शहरातील परिषद शिक्षण संस्थेत ज्ञानदानाचे कामं करणारा कोण??? अशी चर्चा यां निमित्ताने शहरासह तालुक्यात सुरु आहे*
*अविनाश देशमुख शेवगाव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*