Helpline Number १०८ वर कॉल करा, मोफत आरोग्य सुविधा मिळवा !

Helpline Number १०८ वर कॉल करा मोफत आरोग्य सुविधा मिळवा ! 

मुंबई : एखादा अपघात झाला. कोणाला भाजले, कोणाला हयविकाराचा झटका आला अथवा बाळंतपणासाठी एखाद्या महिलेला तातडीने जायचे झाले तर डायल १०८ रुग्णवाहिका सेवेची अनेकांना आठवण होते. मुंबईत जानेवारी २०२२ ते जानेवारी २०२३ या काळात तब्बल एक लाखाहून अधिक जणांनी सेवेचा लाभ घेतला आहे. शहर, उपनगरांतील दोन लाख बालकांची तपासणी.
Helpline Number १०८ वर कॉल करा, मोफत आरोग्य सुविधा मिळवा !
Helpline Number १०८ वर कॉल करा, मोफत आरोग्य सुविधा मिळवा ! 


 काय आहे १०८ क्रमांक ? 

राज्य आरोग्य विभागाने रुग्णांना आपत्कालीन सेवा मिळावी म्हणून राज्यात १०८ क्रमांकाची हेल्पलाइन सुरू केली आहे. 

१०८ क्रमांक Helpline Number .

या क्रमांकावर फोन केल्यास त्यांना तत्काळ डॉक्टरांनी सुसज्ज अशी रुग्णवाहिका पाठवून मदत केली जाते. ‘या’ स्वरूपाची मदत रस्ते अपघात, नैसर्गिक आपत्ती, वैद्यकी आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाला गोल्डन अवरमध्ये उपचार मिळण्याकरिता अत्याधुनिक रुग्णवाहिकेची सेवा सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी १०८ हा क्रमांक देण्यात आला असून, राज्यातील लाखो नागरिकांसाठी हा क्रमांक जीवनदायी ठरला आहे.

मुंबईत ९०० हून अधिक रुग्णवाहिका मुंबईत १०८ अंतर्गत सुमारे ९३७ रुग्णवाहिका कार्यरत आहेत. आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय उपचारांसाठी सुरु करण्यात आलेल्या रुग्णवाहिकेमुळे अनेकांसाठी वरदान ठरत आहे. अशी केली जाते मदत.


१०८’ क्रमांकावर कॉल केल्यास GPS च्या सहाय्याने मदत होते.

■ रुग्ण अथवा इतर कोणाकडून १०८’ क्रमांकावर कॉल केल्यास तो क्रमांक कुठला, ते शोधले जाते. ‘जीपीएसच्या मदतीने त्या भागात कोणते रुग्णालय आहे. हे पाहून तेथील ग्रामीण, उपजिल्हा रुग्णालय अथवा प्राथमिक आरोग्य केंद्राला माहिती दिल जाते. त्यानंतर रुग्णवाहिका रुग्णापर्यंत कमीत कमी वेळेत पोहोचेल, याकडे लक्ष दिले जाते. 

आपत्कालीन परिस्थिती तत्काळ १०८’ ला फोन करा.

आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदत मिळाल्यास मृत्युदर कमी होतो. त्यामुळे या • सेवेचा जास्तीत जास्त वापर होण्याची गरज आहे. त्यामुळे नागरिकांनी एखादा अपघात झाला, अथवा कुठे आपत्कालीन परिस्थिती असेल, तर तत्काळ १०८’ ला फोन करा. हा मोफत क्रमांक असून, तुम्ही फोन केल्यानंतर काही मिनिटांमध्ये मदत मिळेल, अशी माहिती महाराष्ट्र अत्यावश्यक सेवेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर शेळके यांनी दिली आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !