How to complaint against Anganwadi worker

अंगणवाडीमध्ये कोणत्या सुविधा लाभार्थ्यांपर्यंत पोचतात याची माहिती मिळेल का?

अंगणवाडीमध्ये कोणत्या सुविधा लाभार्थ्यांपर्यंत पोचतात याची माहिती मिळेल का? / How to complaint against Anganwadi worker पहिले अंगणवाडीची कार्ये असते ते वाचा.

भारतीय भाषांमध्ये अंगणवाडी शब्दाचा अर्थ “अंगणामधील निवारा” असा आहे. अंगणवाड्या भारत सरकारने १९७५ साली एकात्मिक बाल विकास सेवा अंतर्गत चालू केल्या आणि त्याचा उद्देश बालकांमधील कुपोषणाशी लढणे हा होता.

How to complaint against Anganwadi worker
How to complaint against Anganwadi worker

आईसीडीएसअंतर्गत अंगणवाडी हे सर्व आरोग्य, पोषण आणि शिक्षण विषयक योजनांचे मध्यवर्ती केंद्र आहे. खालील तक्त्यामध्ये लाभार्थी आणि उपलब्ध सेवा यांची माहिती दिली आहे

  • अ.क्र. 1) लाभार्थी, उपलब्ध सेवा. गरोदर आणि उपचार चालू असलेल्या माता, किशोरवयीन ११ ते १८ वयोगटातील मुली. आरोग्य तपासणी, गरोदरमहिलांचे धनुर्वातविरोधी लसीकरण. पुरक पोषण आहार, लसीकरण, आरोग्य तपासणी या सेवा देणे.
  • २ ) अन्य महिला वयोगट १५ ते ४५ वर्षे पोषण आणि आरोग्य शिक्षण देणे.
  • ३ ) १ वर्ष वयाखालील बालके पुरक पोषण आहार, लसीकरण, आरोग्य तपासणी, संदर्भ सेवा देणे.
  • ४ ) १ ते ३ वयोगटातील बालके, पुरक पोषण आहार, लसीकरण, आरोग्य तपासणी, संदर्भ सेवा देणे.
  • ५) ३ ते ६ वयोगटातील बालके, पुरक पोषण आहार, लसीकरण, आरोग्य तपासणी,  अनौपचारिक, पूर्वशालेय शिक्षण, योजना, सेवा देणे.

एकात्मिक बाल विकास सेवा योजना (आय सी डी एस). How to complaint against Anganwadi worker

आय सी डी एस, हा भारत सरकारने पुढाकार घेऊन सुरु केलेल्या उपक्रमापैकी एक असून राज्यातील महिला व बाल विकास विभागामार्फत कार्यान्वित करण्यात येतो.

आय सी डी एस लहान बालकांना पोषण आहार, आरोग्य निगा आणि शालापूर्व शिक्षण सेवा संकलित स्वरुपात पुरवू इच्छिते.

लहान बालकांच्या आरोग्य आणि पोषणाच्या समस्या त्याच्या किंवा तिच्या मातेचा विचार न करता सोडविता येणे शक्य नाही आणि म्हणूनच या उपक्रमाची व्याप्ती किशोरावस्थेतील मुली, गर्भवती महिला आणि स्तनदा माता यांच्यापर्यंत विस्तारण्यात आली आहे.

आय सी डी एस उपक्रम मुलांना आणि मातांना त्यांच्या गावात किंवा वार्डात सर्व पायाभूत आवश्यक सेवा एकत्रितपणे पुरवू देणे . ही योजना शहरी झोपडपट्ट्यामधून आणि ग्रामीण तसेच आदिवासी विभागातून टप्याटप्याने विस्तारली गेलेली आहे.

हेही वाचा इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना. Link 

या योजनेचे मूळ उद्दिष्ट गर्भवती आणि स्तनपान कालावधीत महिलांना वेतन नुकसान भरपाई म्हणून रोख रक्कम देणे तसेच त्यांना पोषक आहार उपलब्ध करून त्यांच्या आरोग्याची स्थिती सुधारणे.

गर्भवती महिलेने नोंदणी केल्यानंतर तिला शासनातर्फे मिळणारे आर्थिक लाभ घेता येतात. शासनाकडून दोन हप्त्यांमध्ये एकूण रुपये ६००० मदत दिली जाते. प्रथम प्रसुतीच्यावेळी (रुपये ३०००) आणि बालक सहा महिन्यांचे झाल्यावर (रुपये ३०००) देण्यात येतात.

हेही वाचा  किशोरी शक्ति योजना. Link 

या योजनेची प्रमुख उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत: How to complaint against Anganwadi worker

किशोर वयातील मुलींना बालविवाहाचे आणि वारंवारं मुलांना जन्म देण्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम, तसेच संतुलित आहाराची आणि हिरव्या पालेभाज्या खाण्याची आवश्यकता इत्यादी बाबतचे आरोग्य आणि स्वच्छते संबंधीत शिक्षण तसेच प्रशिक्षण देणे.

या योजनेतंर्गत किशोरींकरिता ’किशोरी मेळावा’, ’किशोरी आरोग्य शिबीर’ असे विविध प्रकारचे कार्यक्रम अंगणवाडी केंद्र पातळीवर आयोजित केले जातात. ज्या किशोरींना रक्तक्षय झाला असेल अशा मुलींची आर्यन फॉलिक ॲसिडच्या गोळ्या देऊन विशेष काळजी घेतली जाते. तसेच त्यांना स्वस्वच्छते विषयी विशेष प्रशिक्षण दिले जाते.

सद्यस्थितीत ही योजना अहमदनगर, अकोला, औरंगाबाद, भंडारा, चंद्रपूर, धुळे, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, नंदुरबार, उस्मानाबाद, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सिंधुदूर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये (केवळ २३) सुरू आहे.

किशोरवयीन मुलींसाठी योजना.

या योजनेची अतिमहत्वाकांक्षी उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत : किशोर वयातील मुलींना स्वयं-विकास आणि सबलीकरणाकरिता सक्षम करणे. त्यांच्या पोषणाची आणि आरोग्याची स्थिती सुधारणे. त्यांच्यामध्ये आरोग्य, स्वच्छता, पोषण, पौगंडावस्थेतील प्रजनन आणि लैंगिक आरोग्य (ए आर एस एच), कुंटुंब आणि मुलांची काळजी याबाबत जाणीव जागृती करणे.

  • ही योजना ११ ते १४ वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलीं जे शाळेत जात नाहीत त्यांच्यासाठी लागू आहे.
  • त्यांच्या गृह कौशल्ये, जीवन कौशल्ये आणि व्यावसायिक कौशल्यांमध्ये सुधारणा करा.
  • शालाबाह्य किशोरावस्थेतील मुलींना औपचारीक/ अनौपचारीक शिक्षण देऊन मुख्यप्रवाहात आणणे.
  • त्यांना सद्यस्थितीत उपलब्ध असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र, सामाजिक आरोग्य केंद्र, टपाल कार्यालय, बॅंक, पोलीस ठाणे इत्यादी सार्वजनिक सेवांबाबत माहिती देणे आणि मार्गदर्शन करणे.

अंगणवाडी हा महिला व बाल विकास विभागाच्या अंतर्गत काम करणारा गावातील सर्वात शेवटचा टप्पा. अंगणवाडी मध्ये अंगणवाडी सेविका यांचेवर गरोदर माता याच्या लसीकरणाची पूर्ण जबाबदारी दिलेली असून त्यांचे लसीकरण वेळेवर होईल तसेच त्यांना आवश्यक ते पोषण व पूरक आहार मिळेल याची काळजी घेतली जाते.

तसेच ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण देणे, त्यांना पूरक पोषण आहार (शासन आदेशानुसार )नियमित वाटप करणे, बालवयातील आवश्यक त्या सर्व लसी, इंजेक्शन देणे बालकांच्या आरोग्याची व वाढीची माहिती नियमित शासनाला देणे हि कामे केल्या जातात. तसेच शासनांकडून देण्यात येणाऱ्या सुविधा थेट गरोदर माता. स्तनदा माता व बाळ यांना दिले जाते.

अंगणवाडीत वेळापत्रकानुसार पोषण बालकांना मिळतो का! How to complaint against Anganwadi worker

अंगणवाडी केंद्रातून बालकांना दोन वेळेला ताजा पोषण आहार पुरविला जावा, कोणत्या दिवशी कोणता ‘मेन्यू’ द्यावा, याचे आठवडी नियोजन ठरवून देण्यात आलेले आहे.अपवादात्मक स्थितीत यामध्ये बदल केला जातो. आठवडी नियोजन अंगणवाडी केंद्राच्या दर्शनी दर्शनी भागात  आवश्यक आहे. वेळापत्रकानुसार बालकांना मिळतो का!

अंगणवाडी सेविकेची माहिती अधिकारात माहिती कशी मांगावी ? How to complaint against Anganwadi worker

काही गावात अंगणवाडी सेविकेचाच पोषण आहारावर डल्ला मारतात. त्या साठी माहिती अधिकाराचा कायद्याने अर्ज करून वर्ष निहाय माहिती मांगावे.

  • उदाहरण : जसे कि 1)  इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना ची रजिस्टर नोंद वही नकल प्रत मिळावे.
  • 2) किशोरवयीन मुलींसाठी योजना ची रजिस्टर नोंद वही ची नकल प्रत ची माहिती मिळावे.
  • 3) मागील एक वर्षाचा आलेले पोषण आहाराची माहिती मिळावे.
  • 4) पोषण आहारात वाटप केलेले आणि सही केलेले रजिस्टर नोंदवही चे नकल प्रत मांगा.

अंगणवाडी सेविकेची तक्रार कुठे करावी? How to complaint against Anganwadi worker

  • १) आपल्या हद्दीतील पंचायत समिती मध्ये महिला व बाल विकास विभाग शोधा..तेथील अधिकारी ला जाऊन आपली तक्रार कळवा. आवश्यक असल्यास लेखी तक्रार द्यावी.
  • अंगणवाडी क्रमांक आणि तेथील कर्मचारी मोबाईल नंबर सोबत असेल तर अधिकारी स्वतः बोलून विषय सोडवू शकतील.
  • २) तरीही काम झाले नाही तर BDO (गट विकास अधिकारी) यांना लेखी तक्रार करा.
  • 3) BDO (गट विकास अधिकारी) यांना लेखी तक्रार करून ही कार्यवाही केले नाही. CEO मुख्य कार्यकारी अधीकारी जिल्हा परिषद. येथे करा.
  • 4) कोठेही : आपल्या तक्रारी ची दखल घेतली जात नाही तर – कोर्टात याचिका दाखल करा…

ग्रामपंचायत च्या अंगणवाडी कढून गावाकऱ्याला दिले. भेट.. 

How to complaint against Anganwadi worker
How to complaint against Anganwadi worker

Related Post : 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top
error: हे तुम्ही copy करू शकत नाही !