Jaipal Singh Munda यांच्या बद्दल संपूर्ण माहिती वाचा.
जयपालसिंग मुंडा हे आपल्या जीवन काळातच गाथापुरूष बनले होते. त्यांच्या बाबतीत मुंडा जमातीत अनेक दंतकथा प्रचलित झाल्या आहेत. त्यापैकी ‘मेम की ममता’ ची दंतकथा खूप प्रसिद्ध आहे. त्या कथेनुसार जयपालसिंग मुंडा हे छोटा नागपूर प्रांताचे स्वातंत्र्य सेनानी आणि बिरसा मुंडाच्या क्रांति आंदोलनाची (उलगुलान) निर्मिती होती असे मानले जाते. ( Jaipal Singh Munda who strongly supported the inclusion of the word ‘tribal’ in the Constitution )
प्रचलित दंतकथेनुसार बिरसा मुंडा यांनी डोंबारीच्या घनदाट जंगलात इंग्रजांबरोबर भीषण लढाई केली होती. त्या युध्दा दरम्यान आपल्या लहान मुलाला दूध पाजणाऱ्या आदिवासी महिलेला बंदुकीची गोळी लागली आणि ती तथेच गतप्राण झाली. परंतू ते लहान बालक आपल्या मृत आईचे दुध पीत होते. आणि हे विदारक वास्तव चित्र एका इंग्रज महिलेने पाहीले. आणि त्या महिलेमध्ये आईची ममता जागृत झाली. आणि त्या मुलाला तीने आपला सोबत इंग्लेडला नेले. आणि तेथे त्याचे पालन-पोषक करून आई.सी एस. अधिकारी बनवून खुंटी या गावी पाठवले. आणि ते तेजस्वी बालक होते, राज्यघटनेमध्ये ‘आदिवासी’ शब्द समाविष्ट करण्याचा जोरदार समर्थन करणारे Jaipal Singh Munda
जयपालसिहांचे मूळ नाव प्रमोद पाहन असे होते. परंतू खुंटी गावात पुजाविधी करण्यासाठी येणाऱ्या (जयपाल मिश्र) नामक पंडीतजीने ते नाव बदलून जयपालसिंह असे केले. ते आजही भारतीय आदिवासी इतिहासात कायम आहे.
जन्म तारखेबाबत अनभिज्ञता.
जयपाल सिंह मुंडा यांची जन्मतारीख निश्चित माहित नाही. त्याबाबत वेगवेगळे मतप्रवाह आहे. बिरसा मुंडा यांच्या जन्म तारखेच्या संभ्रमा प्रमाणेच जयपालसिंह मुंडा यांच्याही जन्म तारखेबाबत अनभिज्ञता आहे. परंतु त्यांची जन्मतारीख ही 3 जानेवारी 1903 अशी मानली गेली आहे. परंतू जयपालसिंहाच्या आईच्या (राधामणी) म्हणण्यानुसार जयपालसिंगाचा जन्म हिवाळ्यात (जाडे का मौसम) झाला होता. जयपालसिंहाचा जन्म रांची जिल्ह्यातील खुंटी गावात 'पाहन' टोळीमध्ये झाला. त्यांच्या वडीलांचे नाव अमरु पाहन होते. ते त्यावेळेस आदिवासी समाजातील प्रतिष्ठित व्यक्ति मानले जायचे.
जयपालसिंहाचे शिक्षण
जयपालसिहांचे प्राथमिक शिक्षण टकरा येथील प्राथमिक शाळेत झाले. आणि 1910 ते 1919 पर्यंत संत पॉल शाळेमध्ये त्यांचे पुढील शिक्षण झाले. आणि उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला रवाना झाले. संत पाल शाळेचे प्रिंसिपल फादर कैनन कासग्रेव जयपालसिंहाच्या प्रतिभेवर प्रभावित होवून 1919 मधे जयपालसिंहाना उच्च शिक्षणा - साठी आपल्या सोबत इंग्लंडला घेवून गेले
शाळेच्या कर्णधारापासून, ऑलिंपिक हॉकीच्या सुवर्ण पदक विजेत्या संघाच्या कर्णधार पदापर्यंतचा रोमांचक प्रवास.
जयपालसिंहांच्या जीवनातील सर्वाधिक रोमांचक आणि गौरवपूर्ण क्षण असेल तर तो, 1928 च्या आॅलिंपिक- मधिल अॅमस्टरडॅम येथे झालेल्या हॉकी संघाचा कर्णधार म्हणून खेळण्याचा. आणि यामुळे जयपालसिंह यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर हॉकीचे सर्वोत्कृष्ट खेळाडू अशी ओळख निर्माण झाली. येथे अर्थातच हॉकीचे जादूगर म्हणून Jaipal Singh Munda, एरिक पेन्निगर, शौकत अली, गोलकिपर एलेन आणि ध्यानचंद आहेत. परंतु दुदैवाने सर्व खेळाडू मागे ठेवले गेले. आणि प्रसिध्दी मिळाली ती केवळ ध्यानचंद यांना.
अर्थात फायनल आणि सेमी फायनलच्या सामन्यात Jaipal Singh Munda खेळले नाही. यावर स्पष्ट मत मात्र कुठेही त्यांनी मांडलेले नाही. परंतू तत्कालिन प्रसिद्ध खेळ पत्रकार ( 1948) एम. एल. कपूर यांनी लिहले की, जयपालसिंह कोणत्याही गोष्टीशी तडजोड करणारे नव्हते. परिणामी टीम मधील अँग्लो-इंडियन खेळाडूंनी जयपालांसमोर अडचणी उभ्या केल्या. जयपालसिंह कोणत्याही अनुचित प्रकाराला खपवून घेत नव्हते, त्यामुळेच त्यांनी या दोन्ही सामन्यात न खेळण्याचा निर्णय घेतला.
एक और ‘बिरसा’ भगवान – ऑक्सफोर्ड से.
रांची येथून नियमित प्रकाशित होणारे वर्तमानपत्र (साप्ताहिक) 'द सेंटीनल' मध्ये एक अग्रलेख प्रकाशित झाला होता. ज्याचे शीर्षक होते - Another Birsa Bhagwan but, from Oxford! : Jaipal Singh Munda म्हणजेच दुसरा 'भगवान बिरसा' परंतू ऑक्सफोर्डहून.
ज्या प्रमाणे बिरसांचे अनुयायी त्यांना अवतारी पुरुष मानायने त्याचप्रमाणे जयपालसिंहांनाही झारखंड आंदोलनाच्या वेळी अवतारी पुरुषच मानायचे. काही अनुयायी तर, जयपाल सिंहांना बिरसाचा अवतार मानायचे. 1942 मधील 'आदिवासी महासभा' चे आंदोलन आदिवासिंमध्ये नवस्वातंत्र्याची स्वप्ने जागवत होते. त्याबाबत अर्जुन भगत नावाच्या नागपुरी कवीने जयपालसिंहांवर एक कविता लिहली - जिची पहिली ओळ होती - 'धन्य विधी के विचारे, दुखिया हरे जयपाल सिंह चरणे पधारे'.
Jaipal Singh Munda साठी प्रशंसापत्र.
संत पॉल शाळेचे जयपालसिहांचे प्रिसिंपल रेवरेंड कैनन कॉसग्रेव यांनी 25 जून 1924 च्या स्तुतीपत्रांमध्ये लिहतात की, Jaipal Singh Munda वर्गात प्रत्येक वर्षी शिक्षणात प्रथम येण्याबरोबरच 'फुटबॉल' मध्ये कुशल खेळाडू होता. आणि हॉकीचा तर तो कॅप्टनच होता. त्याचबरोबर त्याच्या सोबत शिक्षणाऱ्या प्रत्येक जाती- धर्मातील विद्यार्थी त्याला आपला नेता मानायचे. आणि शाळांमध्ये इतर विद्यार्थ्यांवर प्रभाव टाकण्यात त्याचा हातखंडा होता. आणि जयपाल आपल्या या गुणांचा उपयोग सामाजिक कायर्यासाठी करायचा. तो एक जन्मजात नेता असून, त्याचा दृष्टीकोन विशाल आणि अत्यंत विस्तृत होता. प्रत्येक दृष्टिकोणातून त्याचे चरित्र, श्रेष्ठत्व आणि दृढता झलकत होती. प्रिंसिपल असुनही जयपालांच्या अद्वितीय गुणांचा प्रशंसक होण्याची स्पष्टोक्ती प्रिसिंपल रेवरेंड जयपालांसाठीच्या आपल्या स्तूतीपत्रातून देतात.
जयपालांची विरता, रोमांचक घटना.
संत जॉन कॉलेजचे आधुनिक इतिहासाचे प्राध्यापक डब्लू. सी. कास्टिन आपल्या 16 ऑगस्ट 1926 च्या एका पत्रात म्हणतात Jaipal Singh Munda चरित्र श्रेष्ठ आणि आदर्श आहे. हा युवक म्हणजे मानवी सद्गुणांचा पुतळा असा गौरवद्गार काढतात. हा युवक वीर, दयाळू, दृढनिश्चयी, आत्मविश्वासू आदी गुणांनी संपन्न असल्याचे सांगून नीडरता हि नसानसात भिनल्याचे सांगून एक सत्यघटनेचे कथन करतात - विद्यापीठ क्षेत्रात एकदा एक घोडा अचानक बिथरुन/ घाबरून टांगा गाडीला घेवून सुसाट वेगाने धावू लागला. त्याचवेळेस टांगा चालक खाली पडला, तेव्हा मात्र घोडा आणखिनच बेभान होवून, सैरावैरा धावू लागला.
लोक घाबरून जीव वाचवण्यासाठी इकडे-तिकडे धावू लागले. सर्वत्र हाहाकार माजला. त्यावेळी जयपाल सिंहांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून, आपली विरता आणि चतुराईने त्या घोड्याला पकडून एक महिला आणि तीच्या मुलाचा जीव वाचवला होता. दरम्यान जयपाल सिंहांच्या पायाला जबर इजा होवून पाय फैक्चर झाला. त्यावेळी त्यांना मोठ्या शस्रक्रीया कराव्या लागल्या. आदिवासी समाजासाठी घटनेतच स्थान मिळवून देण्याचा युक्तिवाद करणारे, राष्ट्रीय खेळ हॉकी ला ओलंपिक मध्ये सुवर्ण पदक मिळवून देणारे महान खेळाडू तथा संविधान सभेचे सदस्य असलेल्या Jaipal Singh Munda यांचा 20 मार्च 1970 रोजी संशयास्पद मृत्यु झाला.
Leave a Reply