June to September 99% rainfall, North Maharashtra, Konkan, Nashik, East Vidarbha, good rains : कोकण, नाशिक, पूर्व विदर्भात, उत्तर महाराष्ट्र || जून-जुलै महिन्यात ओढ देणार आणि उत्तम पाऊस होण्याचा अंदाज ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये चांगला बरसणार
: राज्यामध्ये जून ते सप्टेंबर २०२४ दरम्यान सरासरीच्या ९९ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, नाशिक, चंद्रपूर या भागांत १०० टक्के आणि उर्वरित भागांत साधारणपणे ९५ ते ९८ टक्के पावसाचा अंदाज आहे. पुण्यात शंभर टक्के पावसाचे प्रमाण असेल, असा अंदाज ज्येष्ठ कृषी हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला. जून-जुलै महिन्यात पावसाचा खंड पडेल आणि ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस होईल, असेही त्यांनी सांगितले.
ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस होणार : There will be good rains in August-September:
सध्या कमी दिवसांत अधिक पाऊस आणि काही काळ पावसात मोठे खंड पडतील, असे हवामान राहणार आहे. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण अधिक राहील. जून-जुलै महिन्यात पाऊस ओढ देणार आहे.
या भागात पडणार खंड ! The continent will fall in this area!
वाऱ्याचा वेग, सूर्यप्रकाशाचा कालावधी व तापमान कमी कराड आढळल्याने जून, जुलै महिन्यात धुळे, राहुरी, अकोला, पाडेगाव, शिंदेवाही, पुणे, कोल्हापूर येथे पावसात मोठा खंड राहण्याची शक्यता असून, दापोली, नागपूर, निफाड, सोलापूर, जळगाव व परभणी येथे खंडाचा कालावधी कमी राहण्याची शक्यता आहे.
कसा मांडला जातो अंदाज? : How is the prediction made? :
राज्यामध्ये सरासरीच्या ९९ टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे. हा अंदाज कमाल तापमान, सकाळ व दुपारची सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा ताशी वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी या निकषावर आधारित आहे. गेल्या ३० वर्षांची आकडेवारी या अंदाजासाठी वापरण्यात आली आहे.
Related Post :
- हवामान विभागाच्या अहवालातील अचूक माहिती.
- ढगाळ हवामान राहणार असल्याचा जिल्हा कृषी हवामान यांचा इशारा.The weather will be cloudy.
- वीज वारंवार जाते ॲप डाऊनलोड केला का!How to Download Mahavitran Aap
मान्सून पुढे कसा सरकतो? : How does the monsoon progress?
दक्षिण-पश्चिम मोसमी वारे उबदार पाण्यावरून प्रवास • करतात. त्या वाऱ्यांमध्ये ओलावा असतो. या वाऱ्यांच्या प्रवेशामुळे हवामानात वेगाने बदल होतो. हे वारे जून महिन्यात दक्षिणेकडून भारतात प्रवेश करतात आणि उत्तरेकडे सरकतात व एका महिन्यात संपूर्ण देश व्यापतात.
तुमच्या भागात कसा पाऊस? 98 ते 99 टक्के : How is the rain in your area? 98 to 99 percent
- नागपूर – 99 टक्के
- यवतमाळ – 99 टक्के
- सिंदेवाही (चंद्रपूर) 98 टक्के
- परभणी – 98 टक्के
- दापोली – 99 टक्के
- निफाड – 99 टक्के
- धुळे – 99 टक्के
- जळगाव – 99 टक्के
- कोल्हापूर – 98 टक्के
- पाडेगाव – 99 टक्के
- सोलापूर – 98 टक्के
- राहुरी – 99 टक्के
- पुणे – 98 टक्के
(जून ते सप्टेंबर – मिमीमध्ये) दोन-तीन दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्रात : June to September 99% rainfall, North Maharashtra, Konkan, Nashik, East Vidarbha, good rains
- तो आता दोन दिवसांपासून केरळमध्ये मान्सूनचा मुक्काम होता, पुढे सरकला आहे. रविवारी मान्सूनने तामिळनाडू, कर्नाटकचा काही भाग, आंध्र प्रदेशचा काही भाग आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये शिरकाव केला आहे.
- येत्या दोन-तीन दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. तसेच राज्यातील विदर्भामधील तापमान किंचित कमी झाले असून, अनेक भागांत पावसाचा अंदाज दिला आहे.
- यंदा वेळेआधीच मान्सून दाखल झाला. केरळमध्ये दोन दिवसांपूर्वी दाखल झालेला मान्सून पुढे सरकला नव्हता. रविवारी मान्सूनने मोठी वाटचाल केली आहे. बराच भाग त्याने व्यापला असून, त्याचा पुढील प्रवासही वेगाने होईल.
Related Post :
- Meteorologist Punjabrao Dak हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख
- Monsoon 2024 मान्सूनची आगेकूच ; 6 जूनला राज्यात धडक
- Alaldari Waterfall Very Beautiful Place. अलालदरी येथील सुंदर असा धबधबा.
शेतकऱ्यांनी चांगला पाऊस झाल्यावर पेरणी करावी.
कोकणात अधिक पाऊस असल्याने भाताचे उत्पादन चांगले होईल, पण मराठवाड्यात कमी पाऊस असल्याने कमी पाण्यात होणारी पिके लावावीत. कमी पाण्यातही चांगले उत्पन्न देतील, अशा पिकांचे वाण तयार करणे आवश्यक आहे. – डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ कृषी हवामानशास्त्रज्ञ.
Read More :
अशाच नवनवीन माहिती साठी : शासकीय योजना : माहिती अधिकार : ग्रामपंचायत चे माहिती : साठी आमच्या सोसिअल मेडिया ला जॉईन व्हा : आम्ही दररोज नवीन माहिती शेअर करत असतो.
Related Notification Information : | Click Here |
Join Us On WhatsApp | Click Here |
Join Us On Telegram | Click Here |
Join Us On Facebook | Click Here |
Official Website Information | Click Here |
Related Post :
- Information Related to Gram Panchayat | ग्रामपंचायत संबंधित माहिती
- ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे माहिती अधिकारद्वारे माहिती कशी मांगावी : RTI of gram panchayat employees
- स्वच्छ भारत मिशन माहिती अधिकारात माहिती उघड : Swachh Bharat Mission Grampanchayat