कागदोपत्री गटार दाखवित लाटले 20 लाख रुपये : Kagadopatri Dakhvat latale 20 Lakh Rupaye

Kagadopatri Dakhvat latale 20 Lakh Rupaye मालेगाव महापालिका: तब्बल एक तपानंतर अखेर गुन्हा दाखल कागदोपत्री गटार दाखवित लाटले 20 लाख रुपये.

कागदोपत्री गटार दाखवित लाटले 20 लाख रुपये : Kagadopatri Dakhvat latale 20 Lakh Rupaye

ग्रामीण बातम्या न्यूज नेटवर्क मालेगाव : सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी कॉलनी भागात केवळ कागदोपत्री ठेकेदाराच्या गटार दाखवित संगनमताने अधिकाऱ्यांनी संगनमत करून तब्बल २० लाख ६७ हजार ६०७ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी मुंबईतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल झालेल्या तक्रारीवर चौकशीअंती मनपाच्या पंधरा आजी-माजी अधिकाऱ्यांवर छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

६० फुटीरोडवरील स्टेट बँक परिसरात गटारीच्या कामासाठी सोहेल अब्दुल रहेमान मासुमअली यांना सन २०१२ मध्ये ४९ लाख रुपयांचा ठेका दिला होता; परंतु गटारीच्या कामासाठी ४९ लाखांचा निधी सत्यम शिवम अपार्टमेंट परिसरात गटारीच्या कामासाठी सोहेल अब्दुल रहेमान मासुमअली यांना २०१२ मध्ये ४९ लाख रुपयांचा ठेका देण्यात आला; परंतु ठेकेदार व अधिकाऱ्यांनी संगनमताने प्रत्यक्ष कामावर खर्च न करता अन्य ठिकाणांच्या गटारीचे काम दाखवित यामधून २० लाख ६७ हजार ६०७ रुपयांचा आर्थिक अपहार केला होता.

संबंधितांनी निधीचा प्रत्यक्ष कामावर खर्च न करता २० लाख ६७ हजार ६०७ रुपयांचा अपहार केला होता. माहिती अधिकार कार्यकर्ता तुषार पाटील यांनी मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. कोरोना काळात सलग दोन वर्षे चौकशीचा वेग मंदावला होता.

त्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दक्षता व गुण नियंत्रण विभागाला चौकशीचे आदेश देण्यात आले होते. यासाठी लागणारे शासन शुल्क दोन ते अडीच लाख रुपये भरण्याचे आदेश मालेगाव महापालिकेला देण्यात आले होते. त्यानुसार दक्षता व गुण नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांनी २०२२ मध्ये मालेगावी येत गटारीची पाहणी केली असता तक्रारदार तुषार पाटील यांनी दाखविलेल्या ठिकाणी गटार दिसून आली नाही.

छावणी पोलिसांत गुन्हा (Kagadopatri Dakhvat latale 20 Lakh Rupaye )

महापालिकेत त्यावेळी कार्यरत उपायुक्त्त, अभियंता, अधिकारी, लिपिक तसेच लेखाधिकारी अशा पंधराजणांनी २०१२ मध्ये आपल्या पदाचा व अधिकारांचा दुरुपयोग करीत भ्रष्टाचार केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक नितीन पाटील यांच्या फिर्यादीवरून छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

यांच्यावर झाला गुन्हा ( Kagadopatri Dakhvat latale 20 Lakh Rupaye )

कैलास बच्छाव (शहर अभियंता), मुरलीधर देवरे, (सेवानिवृत्त, कनिष्ठ अभियंता), संजय जाधव (तत्कालीन कनिष्ठ अभियंता), राजेंद्र बाविस्कर (सेवानिवृत्त उपअभियंता), सोहेल अब्दुल रहेमान शहा (ठेकेदार), दिनेश जगताप (विभागप्रमुख, के. बी. एच. पॉलिटेक्निक, मालेगाव), नीलेश जाधव (तत्कालीन कनिष्ठ लिपिक), अशोक म्हसदे (सेवानिवृत्त लेखा परीक्षक), सुहास कुलकर्णी (तत्कालीन लिपिक), कमरुद्दीन शेख (तत्कालीन लेखा अधिकारी), सुनील खडके (तत्कालीन लिपिक), मधुकर चौधरी (निवृत्त लिपिक), उत्तम कावडे (निवृत्त लेखा परीक्षक), केदा भामरे (लिपिक), कृष्णा वळवी, मयत (तत्कालीन उपायुक्त), राजाराम बच्छाव (शहर अभियंता).

खालील माहिती वाचा :

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !