Cricket Premier League : दिनांक-1 फेब्रुवारी 2023 पासून सरपंच चषक कोडीद क्रिकेट प्रीमियर लीग स्पर्धा चॅलेंज क्रिकेट क्लब तर्फे आयोजित केली होती तरी त्याचा अंतिम सामना काल.
क्रिकेट प्रीमियर लीग : फत्तेपूर चॅलेंजर संघ प्रथम विजेता
क्रिकेट प्रीमियर लीग : दिनांक-04/03/2023 रोजी झाला त्यात फत्तेपूर चॅलेंजर संघ प्रथम विजेता ठरला यांना कोडीद गावाचे लोकनियुक्त सरपंच आरती प्रकाश पावरा व प्रकाश गंगाराम पावरा (D.R.D.A)यांच्या हस्ते प्रथम पारितोषिक ३५,००० हजार व ट्रॉफी देण्यात आले.
क्रिकेट प्रीमियर लीग : द्वितीय पारितोषिक सांगवी.
तसेच द्वितीय पारितोषिक सांगवी संघानी जिंकला. व्दितीय बक्षिस चॅलेंज क्रिकेट क्लब व कांता शेठ याच्या हस्ते १५,००० रोख व ट्रॉफी देण्यात आले आणि तृतीय पारितोषिक तोरणमाळ संघानी जिंकला तृतीय पारितोषिक डॉ.हिरा पावरा (समुदाय आरोग्य अधिकारी तथा जयस महाराष्ट्र उपाध्यक्ष) यांच्या हस्ते ७०००/- रोख व ट्रॉफी देण्यात आले.आणि चतुर्थ पारितोषिक तन्मय स्पोर्ट्स करण पवार यांच्या हस्ते ट्रॉफी व दाजिमल पावरा सर तसेच सर्व मान्यवरांच्या हस्ते अनेक बक्षिस देण्यात आले आले.
तसेच या अंतिम सामना बघण्यासाठी हजार शिरपूर तालुका शहादा तालुका, तळोदा तालुका पानसेमल तालुका नंदुरबार जिल्हा असे अनेक दर्शक मॅच च्या आनंद घेण्यासाठी हजारोच्या संख्यने उपस्थित होते..
या अंतिम सामन्याचे सर्व कमेट्री जितू सर व शब्बीर सर यांनी केले होते..
प्रकाश दादांनी तसेच गावाची नागरिक यांनी पुढचा वर्षी कोडीद गावात याच्या पेक्षा ही मोठी टूर्नामेंट पार पाडू असे आश्वासन दिले.
सर्व क्रिकेट संघानी आणि गावाचे मान्यवरांनी अशी टूर्नामेंट आज पर्यंत ग्रामीण भागात कुठे झाली नाही अशा मान आयोजक नितेश पावरा व चॅलेंज क्रिकेट क्लब यांना आभार मानले*