Kodid Arogyavardhini Sub-centre. | कोडीद आरोग्यवर्धिनी उपकेंद्र येथे ‘मानव विकास मिशन कार्यक्रम’ शिबिर संपन्न.!

आरोग्यवर्धिनी उपकेंद्र कोडीद ता.शिरपूर येथे ‘मानव विकास मिशन कार्यक्रम’ अंतर्गत गरोदर महिला, बालकांची तपासणी शिबिर संपन्न.!

कोडीद आरोग्यवर्धिनी उपकेंद्र येथे ‘मानव विकास मिशन कार्यक्रम’ शिबिर संपन्न.!
Kodid Arogyavardhini Sub-centre.


कोडीद येथे मानव विकास कार्यक्रम.

मानव विकास निर्देशांक वाढविण्यासाठी शासनाच्या वतीने मानव विकास कार्यक्रम राज्यातील अनेक जिल्ह्यात, तालुक्यात सुरू केला आहे. त्यात आरोग्य आणि शिक्षणावर विशेष लक्ष देण्यात आले. याप्रमाणे प्राधान्याने कुपोषित बालके, कमजोर माता, गरोदर महिला यांची परिपूर्ण तपासणी,त्यांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करणे, त्यानुसार उपचाराची सुविधा करणे अशा सर्वच बाबींचा अंतर्भाव कऱण्यात आला आहे.

कोडीद येथे तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व उपचार शिबिर घेण्यात आले.

प्राथमिक आरोग्य केंद्र, बोराडी अंतर्गत येणारे कोडीद येथील आरोग्यवर्धिनी उपकेंद्र कोडीद येथे आज दिनांक २७ जानेवारी रोजी “मानव विकास मिशन कार्यक्रम’ अंतर्गत आरोग्यवर्धिनी उपकेंद्र कोडीद, उपकेंद्र फत्तेपूर, उपकेंद्र मालकातर अंतर्गत ५१  गरोदर माता, अतिजोखिमेच्या माता ७ व बालके ० ते ६ महिने मधील १५  व ६महिने ते २ वर्षांपर्यंत १७ असे एकूण ३२ बालकांची तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व उपचार शिबिर घेण्यात आले.

कोडीद येथे डॉ. आणि 

ह्यावेळी स्रीरोग तज्ञ डॉ.राहुल कामडे सर, बालरोगतज्ञ डॉ.विशाल शिवदे सर, आरोग्यवर्धिनी उपकेंद्र कोडीद येथील समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.हिरा पावरा, उपकेंद्र कोडीद, उपकेंद्र मालकातर, उपकेंद्र फत्तेपूर, उपकेंद्र बुडकी येथील आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, गट प्रवर्तक, आशा वर्कर्स कर्मचारी तसेच सर्व आरोग्य कर्मचारी कॅम्प ठिकाणी उपकेंद्र कोडीद येथे उपस्थित होते.

ह्यावेळी उपकेंद्र कोडीद येथील समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.हिरा पावरा ह्यांनी सगळ्यांचे आभार मानले.

Leave a Comment

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !