कोडीद येथे जागतिक सिकल सेल ऍनिमिया दिवस साजरा ! Kodid Celebrating World Sickle Cell Anemia Day

Kodid Celebrating World Sickle Cell Anemia Day : आरोग्यवर्धिनी उपकेंद्र कोडीद अंतर्गत आरोग्यवर्धिनी उपकेंद्र कोडीद व शासकीय माध्यमिक आश्रम शाळा कोडीद येथे आज दिनांक १९ जुन २०२४ रोजी जागतिक सिकलसेल आजार नियंत्रण दिवस साजरा करण्यात आला.!

ह्यादरम्यान शालेय मुलांसोबत शालेय व आरोग्य टीम गावात जनजागृतीपर रॅली काढून जनजागृती केली. तसेच सिकल सेल तपासणी शिबिर वरील दोन्ही ठिकाणी आरोग्यवर्धिनी उपकेंद्र कोडीद व शासकीय माध्यमिक आश्रम शाळा कोडीद तपासणी दरम्यान येथील मुलांना ह्या आजाराविषयी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.हिरा पावरा ह्यांनी जनजागृतीपर सखोल मार्गदर्शन व पूर्ण रोगाविषयी माहिती देऊन मार्गदर्शन केले.

ह्यावेळी आरोग्यवर्धिनी उपकेंद्र कोडीदचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.हिरा पावरा, कोडीद शाळेचे मुख्याध्यापक व्ही.डी.पाटील सर, अधिक्षक अमित शाह सर व अधीक्षिका स्वाती भगत मॅडम व सर्व स्टाफ तसेच अर्थे शाळेचे मुख्याध्यापक डी.आर.पाटील सर व सर्व स्टाफ, आरोग्य सेविका प्रमिला गिरासे, गटप्रवर्तक ज्योती पावरा, सर्व आशा सेविका आदी आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. ह्यावेळी डॉ.हिरा पावरा ह्यांनी सर्वांचे आभार मानले.

काय आहे ? जागतिक सिकल सेल ऍनिमिया दिवस क्लिक करून वाचा : Kodid Celebrating World Sickle Cell Anemia Day

 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *