नाशिक ग्रामीण बातम्या : भूमाफीया बोगस आदिवासीला इगतपुरी महा ई सेवा केंद्राच्या आशिर्वादाने बोगस आदिवासीला मिळाला आदिवासी जातीचा दाखला : खोट्या दाखल्याच्या आधारे आदिवासींची जमीन हडपली.
संतप्त अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन नाशिक – Maha E Seva Kendra dvare Bogas Kagadpatre
खऱ्या आदिवासी जमातीच्या नामसाधर्म्याचा फायदा घेत खोट्या कागदपत्राच्या आधारे बाबुराव बापूराव कांबळे, दया बाबूराव कांबळे, संगीता बाबुराव कांबळे यांनी इगतपुरी प्रांताकडून खोटा जातीचा दाखला घेतला. आदिवासीची जमीन हडपण्यासाठी सह्याद्रीतल्या खऱ्या आदिवासी कोळी महादेव जमातीचे खोटे जातीचे प्रमाणपत्र खोटी कागदपत्रे मिळवले. ते प्रमाणपत्र तत्काळ रद्द करावे.
शासनाची दिशाभूल आणि फसवणूक करणारे बाबुराव कांबळे हे हिंदू कोळी जातीचे असून तारळे पाटण जि. सातारा येथील रहिवासी आहेत. ते इतर मागासवर्गीय जातीचे असूनही त्यांनी खाडाखोड करून त्यांचे गाव टाकेद ता. इगतपुरी येथील जन्म झाल्याचे दाखवत जात हिंदू महादेव कोळी अशी दाखवली आहे.
त्यांच्या जन्म तारखेतही अफरातफर केली आहे. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकीभाऊ जाधव यांनी इगतपुरीचे उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी तथा , ओमकार पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. बाबुराव बापूराव कांबळे यांनी हिंदू कोळी म्हणून उपशिक्षक या पदावर सर्वतीर्थ टाकेद येथे नोकरी केली आहे. आदिवासी कोळी महादेव जमातीचा दाखला घेऊन खऱ्या आदिवासी व्यक्तीची जमीन घेऊन फसवणूक केली आहे.
ह्या व्यक्तीने आदिवासी कोळी महादेव जमातीचा घेतलेला दाखला कशाच्या आधारे दिला याचे पुरावे मिळावे. दिलेल्या दाखल्याची कसून चौकशी करून तो दाखला रद्द करावा. आपल्या विभागाने दाखला दिला नसेल तर तसे पत्र मिळावे. दाखला खोटा असेल तर आदिवासीचा खोटा दाखला बनवून फायदा घेतल्याबद्दल त्यांच्यावर अनुसूचित जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा.
आदिवासी जमीन मूळ मालक लोहकरे कुटुंब यांना त्यांची जमीन परत मिळावी. सातारा जिल्ह्यातील कांबळे हे बोगस आदिवासी असून एसबीसी जातीच्या प्रवर्गात मोडतात. त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ फौजदारी कारवाई व्हावी. खोटा जातीचा दाखला मिळवून देणाऱ्या कर्पे नामक दाखले देणाऱ्या महा ई सेवा केंद्र चालकाचा परवाना रद्द करावा.
यासंदर्भात प्रांतधिकाऱ्यांना अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकीभाऊ जाधव यांनी निवेदन दिले. आदिवासीं भागात भूमाफियांचा सुळसुळाट थांबवणार असून गोर गरीब आदिवासींच्या जमिनी लुटणाऱ्या भूमाफियांवर कारवाई होणार आहे. आदिवासींना त्यांच्या जमिनी परत मिळवून देणार असल्याचे लकीभाऊ जाधव यांनी सांगितले. (Maha E Seva Kendra dvare Bogas Kagadpatre)
बोगसांविरोधात ‘आदिवासी एकवटले २१ आदिवासी संघटनांचे मोर्चात सहभागी.
पंडित उपाध्याय स्वयं योजनेसाठी वयोमर्यादेत वाढ. Maha E Seva Kendra dvare Bogas Kagadpatre
