Maharashtra police bharti 2022 | 20 हजार पोलीस दलासाठी भरती.

महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम 2021 व त्यामध्ये शासनाने वेळोवेळी केलेले आणि दिनांक 23 6 2022 च्या सेवा प्रवेश नियमात केलेल्या सुधारित तरतुदीनुसार पोलिस आयुक्त पोलीस अधीक्षक संबंधित पोलीस घटक कार्यालयाचे नाव नमूद करावे.

पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज .
पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज . police bharti 2022


त्यांचे आस्थापने वरील पोलीस शिपाई संबंधित घटक प्रमुखांनी त्यांच्या आस्थापने कडून भरण्यात येत असलेल्या पदाचा उल्लेख करावा यांची रिक्त असलेली पदे भरण्यासाठी आवेदन पत्र संगणीय प्रणाली द्वारे दिनांक 9 / 11  / 2022 ते 30 11 20122 या कालावधीत स्वीकारण्यात येतील याबाबतची सविस्तर माहिती ही पुढील संकेतस्थळावर देण्यात आणि प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

पोलीस भरती प्रक्रियेमध्ये  ऑनलाइन अर्ज सादर करण्याची सुविधा.


उमेदवारास पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक यांच्या स्थापनेवरील पोलीस शिपाई या पदासाठी ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करता येईल. ऑनलाइन आवेदन अर्ज सादर करण्याची सुविधा या संकेतस्थळावर उपलब्ध राहणार आहे.

पोलीस भरती ऑनलाईन अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ.

Maharashtra State Police

https://www.mahapolice.gov.in

Maharashtra State Police

उमेदवार एकाच घटकात एका पदासाठी एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर करू शकत नाही.

उमेदवारचे चुकीची माहिती दिल्यास उमेदवारी कोणत्याही टप्प्यात रद्द होईल.

पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज .

पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवाराचे प्रथम 50 गुणांची शारीरिक परीक्षा चाचणी घेण्यात येईल व त्यानंतर होणारी लेखी परीक्षा ही पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांच्या आस्थापने वरील भरती प्रक्रिया वगळता इतर सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल. त्यासाठी अर्जदाराने ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी  सदरची बाब विचारात घेऊनच आवेदन अर्ज भरावा.

पोलीस भरती प्रक्रियेमध्ये शारीरिक चाचणी.

भरती प्रक्रियेमध्ये प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. शारीरिक योग्यता चाचणीमध्ये किमान 50% गुण मिळवणारे उमेदवारांमधून संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदाच्या 1.10 प्रमाणात उमेदवारांची 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल.

पोलीस भरती प्रक्रियेमध्ये  लेखी परीक्षा.

उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान 40% गुण मिळवणे अनिवार्य आहे लेखी परीक्षा मध्ये 40% पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येईल.

पोलीस भरती प्रक्रियेमध्ये कागदपत्र पडताळणी.

शारीरिक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये नमूद केलेल्या दोन निकषांच्या निकालाच्या आधारे उमेदवारांमधून एक गुणवत्ता यादी तयार केली जाईल. तात्पुरत्या निवड सूचीमध्ये समावेश झालेल्या उमेदवारांचीच मूळ कागदपत्रे पडताळणी करण्यात येईल कागदपत्र पडताळणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या निवड सूचीमध्ये समावेश केला जाईल. निवड सूचीतील उमेदवारांची निवड तात्पुरती असेल. निवड सूची मध्ये उमेदवारांच्या नावाच्या समावेश झाला म्हणून नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे समजण्यात येऊ नये. शारीरिक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये मिळालेल्या गुणांचे एकत्रीकरण केल्यानंतर गृह विभाग शासन निर्णय नुसार अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल.

सोबत चा PDF वाचा..

 Link 

Leave a Comment

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !