सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाकडून बचत गटांसाठी 4 % व्याजाने महिलांना उद्योगासाठी मिळेल कर्ज योजना. स्वतःचा आर्थिक विकास करू शकणाऱ्या महिला साठी गुणकारी योजना आहे. आणि मिळेल ५ लाख ते २० लाखांपर्यंत कर्ज. ( Mahila Samriddhi Loan Scheme )
4 % व्याजाने महिलांना उद्योगासाठी मिळेल कर्ज |
Mahila Samriddhi Loan Scheme : केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाकडून महिला समृद्धी कर्ज योजना ही योजना महिला व्यावसायिकांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि त्यांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी महिलांसाठी राबवली जात आहे. त्या माध्यमातून अनेक बचत गटांना या 4 % व्याजाने महिलांना उद्योगासाठी कर्ज देत आहे.
काय आहे महिला समृद्धी योजना? Mahila Samriddhi Loan Scheme
राज्यातील बचत गटातील ज्या महिला स्वतःचा एखादा लघु उद्योग सुरु करण्यासाठी इच्छुक आहेत अशा महिलांना स्वतःचा एखादा उद्योग सुरु करण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे हे या योजनेचे मुख्ये उद्दिष्ट्य आहे. महिला समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत महिलांचा आर्थिक तसेच सामाजिक विकास करणे, आणि महिला व्यवसायिकांना प्रोत्साहित करणे, हा उद्देश आहे.
सुरुवात झाली आहे. Mahila Samriddhi Loan Scheme
सध्या महिलावर्ग पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असतात. महिलांनी पुढे जावे त्यासाठी सरकार नवनवीन योजना राबवत असते. जेणेकरून महिला स्वतःचा उद्योग सुरु करतील आणि स्वतःचा आर्थिक विकास करू शकतील, या संकल्पनेतून ही योजना हाती घेण्यात आली आहे. त्यामुळे कित्येक महिला, बचत गटाच्या साह्याने स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी पुढे आलेले आहेत. महिला समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत महिलांना स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी ५ लाख ते २० लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले कर्ज.
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
महिला बचत गटातील महिलांना स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी २० लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. त्यासाठी ४ टक्के व्याज दर आकारला जातो. महिला समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत महिलांना ९५ टक्के कर्ज राष्ट्रीय महामंडळाकडून व ५ टक्के कर्ज राज्य महामंडळाकडून उपलब्ध करून दिले जाते त्यामुळे लाभार्थ्यांचा सहभाग शून्य असतो.
अर्ज करण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार त्या साठी येथे क्लिक करा.
१२ बचत गटांना दीड कोटींचे कर्ज जिल्ह्यातील १२ बचत गटांना या योजनेच्या माध्यमातून दीड कोटींचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. त्याची परतफेडही सुरळीतपणे सुरु असल्याचे सांगण्यात आले.
निकष काय? Mahila Samriddhi Loan Scheme
काही वेळेस राज्य महामंडळाकडून कर्ज उपलब्ध न झाल्यास लाभार्थी महिलेस स्वतःकडील ५ टक्के रक्कम भरावी लागेल. कर्जाच्या वितरणाच्या तारखेपासून घेतलेला कर्जाचा उपयोग ४ महिन्याच्या आत करणे अनिवार्य आहे. महिला समृद्धी कर्ज योजने अंतर्गत जास्तीत जास्त २० लाखांचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते व त्यावरील रक्कम लाभार्थी महिलेस स्वतःकडील भरावी लागेल. या योजनेअंतर्गत फक्त महिलांना लाभ मिळेल. अर्जदार महिला कुठल्याही बँकेची थकबाकीदार नको.
योजनेमुळे प्रगतीचे बुस्टर मिळण्यास चार टक्के दराने मिळते महिलांना कर्ज.
Mahila Samriddhi Loan Scheme ही योजना केंद्र शासनाची आहे. ही योजना महिलांसाठी लाभदायी ठरत असल्याचे दिसून येत आहे. – योगेश पाटील, उपायुक्त, समाज कल्याण विभाग.
Conclusion
वाचक मित्रांनो तुम्हाला Mahila Samriddhi Loan Scheme चा लाभ घ्यायचा असल्यास आपल्या जवळील सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग ला भेट द्या . आणि अशाच नवनवीन माहिती साठी आमच्या सोसिअल मेडिया ला भेट देत राहा. जेणेकरून केंद्र शासनाची आणि राज्य सरकाची योजना ची माहिती तुम्हाला जलद गतीने मिळो.
या योजना आहेत चालू :
- Crop insurance Link
- SIX Best Topic Of Insurance Link
- Chia Seeds Yojana Link
- PM-KISAN Yojana Link
- शेअर मार्केट” आणि “फॉरेक्स ट्रेडिंग कसा फ्रोड पासून कसे राहावे. Link
[…] हेही वाचा : 4 % व्याजाने महिलांना उद्योगासाठी मिळे… […]
[…] हेही वाचा : 4 % व्याजाने महिलांना उद्योगासाठी मिळे… […]