शेवगांव तालुक्यातील बोधेगाव दौऱ्यावर असलेल्या पालकमंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील याना काळे झेंडे दाखविणाऱ्या कॉ संजय नांगरे आणि स्वाभिमानी चे दत्ता फुंदे याना शेवगांव पोलिसांनी घेतले ताब्यात.
Marathi Breaking News : |
अविनाश देशमुख शेवगाव.
माननीय पलकमंत्री तथा महसुल मंत्री राधाकृष्ण विखे आपण असेच शेवगांव तालुक्यात वारंवार दौरे करा म्हणजे तालुक्यातील महसुल विभाग कृषी विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग पोलीस गृह विभाग वीजवितरण आदींचा कारभार सुरळीत चालु राहील.
वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्रा किसन चव्हाण व वंचित बहुजन आघाडीचे शेवगाव तालुका अध्यक्ष शेख प्यारेलालभाई व ईतर कार्यकर्ते पदाधिकारी यांना शेवगाव पोलिसांनी भल्या पहाटे नजर कैद केळे पोलिसांनी कार्यक्रम संपे पर्यंत ताब्यात ठेवले पालकमंत्र्यांच्या बोधेगाव दौ-याअगोदर च काळे झेंडे दाखवू नये म्हणून वंचित बहुजन महीला आघाडी शेवगाव तालुका महिला अध्यक्ष संगीताताई ढवळे,मुन्वरभाई शेख धोंडीराम मासाळकर, शेख बन्नूभाई व ईतर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.*
आज बोधेगाव येथे येणार म्हणुन त्यांना वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी हे काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवणार होतें शेतकरी व शेवगाव तालुक्यातील राज्य महामार्गावरील मोठे खड्डे ,पिण्याचे पाणी पर तिच्या पावसाने शेतकऱ्यांचे झालेले नुकसानआदी ज्वलंत प्रश्नासाठी अशी माहिती मिळाली की वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्रा किसन चव्हाण यांच्या घरासमोर पोलिस तैनात करण्यात आले होतें त्यांना सकाळी पोलीस स्टेशन शेवगांव येथे नजर कैद करण्यात आले मा राधाकृष्ण विखे आज बोधेगाव येथे आले होतें.
पालकमंत्र्यांच्या बोधेगाव दौ-याअगोदर च काळे झेंडे दाखवू नये म्हणून वंचित बहुजन महीला आघाडी शेवगाव तालुका अध्यक्ष संगीताताई ढवळे, मुन्वरभाई शेख धोंडीराम मासाळकर, शेख बन्नूभाई व ईतर स्वाभिमानी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.* लोकशाही मध्ये अन्याय होत असेल तर आपल्या न्याय मागण्यांसाठी आंदोलन करणे हा गुन्हा आहे कां???
ताजा कलम*
*परतिच्या पावसाने झालेले आतोनात नुकसान तालुक्यातील सर्व राज्य महा मार्गांची झालेली दुरावस्था सध्याचे तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार जिल्ह्याचे खासदार यांचे मतदारसंघाकडे झालेले अक्षम्य दुर्लक्ष यावर लाख वेधण्यासाठी आपण शेवगाव तालुक्यात वारंवार दौरा करा* म्हणजे एक एक करून सर्व रस्ते खड्डे मुक्त होतील.
*अविनाश देशमुख शेवगाव*
*सामाजिक कार्यकर्ता पत्रकार*