महाराष्ट्रात देखील “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना सुरु : Mazi ladki Bahin Yojana Maharashtra Online Apply

Mazi ladki Bahin Yojana Maharashtra Online Apply : मध्य प्रदेशच्या धर्तीवर महिलांच्या खात्यात  थेट १,२५० रुपये दिले जातात. बरोबर आता महाराष्ट्रात देखील लाडक्या बहिणींसाठी राज्यात योजना लोकाभिमुख योजनांचा धडाका सुरु झालेला आहे.

Mazi ladki Bahin Yojana Maharashtra Online Apply : "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजना सुरु या योजनेचे अधिकृत संकेतस्थळ www.pmgov.com अशी आहे

मुंबई : 2024 लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर आता विधानसभा निवडणुकीपूर्वी लोकाभिमुख योजनांचा धडाका लावण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील शिंदे सरकार कामाला लागले आहे. मध्य प्रदेशमधील ‘लाडली बहना’ योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रातील गोरगरीब, आणि  निम्न मध्यमवर्गीय बहिणींच्या बँक खात्यात दरमहा 1500 रुपये जमा होतील, अशी एक योजना आखली गेली आहे.

२०२४ लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी गरिबांच्या खात्यात दरमहा (८५०० )  साडेआठ हजार रुपये जमा होतील, असे आश्वासन दिले होते.२०२४ लोकसभा निवडणुकीच्या काही राज्यांमध्ये या घोषणेचा फायदा काँग्रेसला झाला, असे विश्लेषण आता दिले जात आहे. याच दरम्यान मध्य प्रदेशात लाडली बहना योजनेचा फायदा झाला भाजपला होता. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यातील शिंदे सरकार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांसाठी आणली आहे.

सूत्रांनी सांगितले प्रमाणे , महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या कार्यालयाने लाडकी बहीण योजनेचा एक प्रस्ताव तयार केला आहे. सद्याचे महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सद्याचे महाराष्ट्र राज्यातील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर योजनेचे सादरीकरण देखील करण्यात आले आहे.

माझी लाडकी बहीण योजनेत काही बदल सुचविले आहेत आणि त्यानुसार बदल केले जात आहेत. महाराष्ट्रातील गोरगरीब, आणि  निम्न मध्यमवर्गीय महिला यांना जवळपास दीड कोटी या योजनेचा लाभ दिला जाईल अशी शक्यता आहे.मध्य प्रदेशमधील ‘लाडली बहना’ योजनेच्या दरमहा १,२५० रुपये दिले जातात, महाराष्ट्रात त्यापेक्षा अधिक रक्कम देण्याचे प्रस्तावित महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

लेक लाडकी योजना महिला व बालकल्याण विभागाने आधीच आणली आहे. मुलीच्या जन्मापासून ती १८ वर्षाची होईपर्यंत तिच्या बँक खात्यात एक लाख एक हजार रुपये टप्प्याटप्प्याने जमा केले जातात. त्या नंतर महिलांना एसटी बसच्या प्रवासात ५० टक्के सवलतीचा निर्णय शिंदे सरकारने यापूर्वीच घेतला आहे.

Table of Contents

मध्य प्रदेशातील ‘लाडली बहना’ कशी आहे. Mazi ladki Bahin Yojana Maharashtra Online Apply

मध्य प्रदेशात शिवराजसिंह चौहान मुख्यमंत्री यांच्या कार्यकाळात असताना त्यांनी ‘लाडली बहना’ ही योजना महिलांसाठी आणली आणि प्रत्येकी १,२५० रुपये महिन्याकाठी महिलांच्या बँक खात्यात जमा होऊ लागले आहे. लगेच झालेल्या मध्य प्रदेश 2023 विधानसभा निवडणुकीत भाजपला दणदणीत विजय मिळाला होता. त्यात या योजनेच्या लाभार्थी महिलांनी भाजपला मोठ्या प्रमाणात पसंती दिली, असा निष्कर्ष समोर आलेला होता.

मध्य प्रदेशात किती महिला यांना या योजनेचा लाभ मिळतो. ?

मध्य प्रदेशात १ कोटी २९ लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळतो. 12 महिन्यांपासून नियमितपणे ही रक्कम दिली जात आहे. मध्य प्रदेशातील नवविवाहित महिला आणि घटस्फोटिता, विधवा भगिनींना योजनेचा लाभ दिला जातो.

मध्य प्रदेशात या योजनेत वय आणि अट काय आहे. ?

वयाची अट २१ वर्षे ते ६० वर्षे इतकी आहे. महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2,50,000 रुपयांपेक्षा अधिक असू नये ही अट आहे. महाराष्ट्रात जवळपास हेच नियम असतील, असे समजते. पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबांतील महिलांना याचा लाभ मिळेल.

महाराष्ट्र राज्यात “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजना सुरु करण्यास मान्यता देण्याबाबत शासन निर्णय कसा आहे ? :- Mazi ladki Bahin Yojana Maharashtra Online Apply

महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग. शासन निर्णय क्रमांक- मबावि २०२४/प्र.क्र.९६/कार्या-२. नवीन प्रशासकीय इमारत, तिसरा मजला, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०००३२ दिनांक:-२८ जून, २०२४.

 “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजना ची प्रस्तावना कशी आहे? :- Mazi ladki Bahin Yojana Maharashtra Online Apply

महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये अॅनिमियाचे प्रमाणे ५० पेक्षा जास्त आहे. तसेच राज्यातील श्रमबल पाहणीनुसार पुरुषांची रोजगाराची टक्केवारी ५९.१० टक्के व स्त्रीयांची टक्केवारी २८.७० टक्के इतकी आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेता, महिलांच्या आर्थिक, आरोग्य परिस्थितीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे.

महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना राबविण्यात येत आहेत. महिलांचा श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे, ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो असा महिलांना या योजनेचा मिळणार. सदर परिस्थिती लक्षात घेऊन, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजना सुरू करण्याचे प्रस्तावित आहे.

“मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजना चा शासन निर्णय :- Mazi ladki Bahin Yojana Maharashtra Online Apply

राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची “मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण” योजना सुरु करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

Mazi ladki Bahin Yojana Maharashtra Online Apply : "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजना सुरु या योजनेचे अधिकृत संकेतस्थळ www.pmgov.com अशी आहे

योजनेचा उद्देश :- Mazi ladki Bahin Yojana Maharashtra Online Apply

  •  राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे.
  • त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे.
  • राज्यातील महिला स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे.
  • राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे.
  • महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा.

योजनेचे स्वरुप काय आहे ? Mazi ladki Bahin Yojana Maharashtra Online Apply

योजनेचे स्वरुप नुसार प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण (Direct Benefit Transfer) सक्षम बँक खात्यात दरमहा रु.१,५००/- इतकी रक्कम दिली जाणार आहे. तसेच केंद्र/राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेव्दारे रु.१,५००/- पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेव्दारे पात्र महिलेस देण्यात येईल.

योजनेचे कालावधी काय आहे ? Mazi ladki Bahin Yojana Maharashtra Online Apply

योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६० या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला यांना देण्यात येणार आहे.

योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता काय आहे ? – Mazi ladki Bahin Yojana Maharashtra Online Apply

  • लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे.
  • राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला.
  • किमान वयाची २१ वर्षे पूर्ण व कमाल वयाची ६० वर्ष पूर्ण होईपर्यंत.
  • सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बैंक खाते असणे आवश्यक आहे.
  • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.२.५० लाखापेक्षा जास्त नसावे.
  • ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाख रुपयांपेक्षा अधिक आहे.

योजनेच्या लाभार्थ्यांची अपात्रता काय आहे ? –

  • ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे.
  • ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी आहे
  • कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत.
  • सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत.
  • सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेव्दारे रु.१,५००/- पेक्षा जास्त लाभ घेतला असेल.
  • ज्यांच्या कुटुंबातील सदस्य ग्रामपंचायत माजी सरपंच, ग्रामपंचायत माजी सदस्य, सद्याचे विद्यमान ग्रामपंचायत सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवक किंवा माजी खासदार/आमदार आहे.
  • ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉर्पोरेशन/बोर्ड/उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य आहेत.
  • ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे.
  • ज्यांच्याकडे चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत.
  • सदर योजनेच्या “पात्रता” व “अपात्रता” निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकत्ता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेवून शासन मान्यतेने कार्यवाही करण्यात येईल.

सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरिता खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहेतः- Mazi ladki Bahin Yojana Maharashtra Online Apply

  • लाभार्थ्याचे आधार कार्ड.
  • महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र/महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला.
  • सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला
  • (वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाखापर्यंत असणे अनिवार्य).
  • बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत.
  • पासपोर्ट आकाराचा फोटो.
  • रेशनकार्ड.
  • सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र.

लाभार्थी निवड :-

“मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेच्या लाभार्थीची पात्रता अंगणवाडी सेविका/पर्यवेक्षिका/मुख्यसेविका/सेतू सुविधा केंद्र/ग्रामपंचायत/ग्रामसेवक/वार्ड अधिकारी यांनी खातरजमा करुन ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्यांचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा. सक्षम अधिकारी यांनी या कामकाजावर नियंत्रण ठेवावे. त्यानुसार सदर योजनेकरिता अंगणवाडी सेविका/पर्यवेक्षिका/मुख्यसेविका/सेतू सुविधा केंद्र/ग्रामपंचायत/ग्रामसेवक/वार्ड अधिकारी व सक्षम अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे.

योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज अर्ज पडताळणी करुन सक्षम अधिकाऱ्याकडे मान्यतेसाठी सादर अंतिम मंजूरी देण्याकरीता सक्षम संबंधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती नियंत्रण अधिकारी आयुक्त, महिला व बाल विकास, महाराष्ट्र राज्य, पुणे हे सदर योजनेसाठी “नियंत्रण अधिकारी” राहतील. तसेच आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई हे “सहनियंत्रण अधिकारी” राहतील.

या योजनेचा अर्ज कोठे जाऊन भरावा ? Mazi ladki Bahin Yojana Maharashtra Online Apply

ग्रामीण भाग अंगणवाडी पर्यवेक्षिका सेतू सुविधा सेविका संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अधिकारी केंद्र/ग्रामपंचायत/ग्रामसेवक नागरी भाग अंगणवाडी सेविका/ मुख्यसेविका / वार्ड अधिकारी/ सेतू सुविधा केंद्र

योजनेची कार्यपध्दती :- Mazi ladki Bahin Yojana Maharashtra Online Apply

  • अर्ज करण्याची प्रक्रिया योजनेचे अर्ज पोर्टल/मोबाइल अॅपद्वारे/सेतू सुविधा केंद्राव्दारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे:-
  • पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल.
  • ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल, त्याच्यासाठी “अर्ज” भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात/बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये नागरी/ग्रामीण/आदिवासी)/ग्रामपंचायत/वार्ड/सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील. अंगणवाडी केंद्रात/बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय
  • वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात/बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये (नागरी/ग्रामीण/आदिवासी)/सेतू सुविधा केंद्र मध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी यथायोग्य पोच पावती दिली जाईल.
  • (४) अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल.
  • (५) अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि E-KYC करता येईल. यासाठी महिलेने खालील माहिती आणणे आवश्यक आहे.
  • १. कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र (रेशनकार्ड)
  • २. स्वतःचे आधार कार्ड

या योजनेसाठी तात्पुरत्या निवड झालेले यादी चे प्रकाशन कोठे होईल ?: Mazi ladki Bahin Yojana Maharashtra Online Apply

अर्ज प्राप्त झाल्यानंतर, पात्र अर्जदारांची तात्पुरती यादी पोर्टल/अॅपवर जाहीर केली जाईल, त्याची प्रत अंगणवाडी केंद्र/ग्रामपंचायत/वॉर्ड स्तरावरील सूचना फलकावर देखील लावण्यात येईल.

आक्षेपांची पावती कोठे भेटेल ? Mazi ladki Bahin Yojana Maharashtra Online Apply

जाहीर यादीवरील हरकत पोर्टल/अॅपद्वारे प्राप्त केल्या जातील. याशिवाय अंगणवाडी सेविका/मुख्यसेविका/सेतू सुविधा केंद्र यांचेमार्फत बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे लेखी हरकत/तक्रार नोंदवता येईल. लेखी (ऑफलाईन) प्राप्त झालेल्या हरकत/तक्रार रजिस्टरमध्ये नोंदविल्या जातील आणि ऑनलाईन अपलोड केल्या जातील. पात्र लाभार्थी यादी जाहीर केल्याच्या दिनांकापासून ०५ दिवसांपर्यंत सर्व हरकत/तक्रार नोंदविणे आवश्यक आहे.

या योजनेची तक्रार कोठे करता येणार ? Mazi ladki Bahin Yojana Maharashtra Online Apply

सदर हरकतीचे निराकरण करण्यासाठी संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली “तक्रार निवारण समिती गठीत करण्यात येईल. खालील दिलेला लिंक अँप्स हा आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत  चालू होणार आहे. वारंवार चेक करत रहा लिंक अँप्स.. 

Mazi Ladki Bahin Yojana Maharashtra Online Apply Click Link Here 

अंतिम यादीचे प्रकाशन कोठे होणार ?: Mazi ladki Bahin Yojana Maharashtra Online Apply

सदर समितीमार्फत प्राप्त हरकतीचे निराकरण करण्यात येऊन, पात्र लाभार्थ्यांची अंतिम यादी तयार केली जाईल. सदर पात्र/अपात्र लाभार्थ्यांची स्वतंत्र यादी अंगणवाडी केंद्र/ग्रामपंचायत/वॉर्ड स्तरावर / सेतू सुविधा केंद्र, तसेच पोर्टल/अॅपवर देखील जाहीर केली जाईल.पात्र अंतिम यादीतील महिला मृत झाल्यास सदर महिलेचे नाव लाभार्थी यादीतून वगळण्यात येईल.

लाभाच्या रक्कमेचे वितरण:- Mazi ladki Bahin Yojana Maharashtra Online Apply

प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण (Direct Benefit Transfer) सक्षम बँक खात्यात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत रक्कम जमा केली जाईल.

योजनेची प्रसिध्दी कसे होणार आहे :

सदर योजनेची प्रसिध्दी जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद/नोडल अधिकारी तसेच जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांनी संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या समन्वयाने करावी. तसेच, गाव पातळीवरील होणाऱ्या ग्रामसभा/ महिला सभांमध्ये सदर योजनेबाबत व्यापक प्रसिध्दी देण्यात यावी.

सदर योजनेसाठी वेब पोर्टल व मोबाईल अॅपलिकेशन तयार करण्याची जबाबादारी आयुक्त, महिला व बाल विकास, पुणे यांची राहील.

या योजनेतील लाभार्थ्यांची पोर्टलवर नोंदणी होऊन योजना सुरुळीत कार्यान्वित राहण्याकरीता तसेच पोर्टलचे संचालन, अर्ज Digitized पध्दतीने जतन करणे, पोर्टल वेळोवेळी अद्ययावत करणे याकरीता आयुक्त, महिला व बाल विकास, पुणे यांच्या स्तरावर कक्ष निर्माण करण्यास व त्यामध्ये विहीत पध्दतीने १० तांत्रिक मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात येईल. तसेच योजना सुरुळीत कार्यान्वित राहण्याकरीता, नियंत्रण ठेवण्यासाठी शासनस्तरावर कक्ष निर्माण करुन ०५ तांत्रिक मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात येईल.

Mazi ladki Bahin Yojana Maharashtra Online Apply : "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजना सुरु या योजनेचे अधिकृत संकेतस्थळ www.pmgov.com अशी आहे

सदर समितीची बैठक दरमहा तसेच आवश्यकतेनुसार आयोजित करण्यात यावी. सदर समितीची कार्यकक्षा खालीलप्रमाणे राहील :-

  • (१) सदर योजनेची देखरेख व संनियंत्रण करणे.
  • (२) सदर योजनेच्या अंमलबजावणीबाबत नियमित आढावा घेणे.
  • (३) सदर योजनेसाठी उपलब्ध तरतूद व खर्च याबाबतचा आढावा घेवून आवश्यक निधीची मागणी राज्यस्तरीय समितीकडे सादर करणे.
  • (४) कालबध्द पध्दतीने पात्र लाभार्थीची यादी अंतिम करणे व सदर योजनेपासून कोणताही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही, याची दक्षता घेणे.

राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय समितीमध्ये तसेच योजनेच्या अंमलबजावणी सुकर व्हावी, यासाठी कार्यपध्दतीमध्ये बदल करण्याचे अधिकार मा. मंत्री, महिला व बाल विकास यांना राहतील. तसेच मा. मंत्री, महिला व बाल विकास यांच्याकडून सदर योजनेचा आढावा दर ३ महिन्यांनी घेण्यात येईल.

Important Links : 

Related Notification Information Pdf : Mazi ladki Bahin Yojana Maharashtra Online Apply Click Here
Official Website Information Link : Mazi ladki Bahin Yojana Maharashtra Online Apply  Click Here
Join Us On Facebook  Click Here
Join Us On Telegram  Click Here
Join Us On WhatsApp  Click Here
Join Us On Instagram  Click Here

Leave a Comment

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !