NEET exam scam puts future of students in jeopardy नीट परीक्षेतील घोटाळ्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात

NEET exam scam puts future of students in jeopardy नीट परीक्षेतील घोटाळ्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात

NEET exam scam puts future of students in jeopardy नीट परीक्षेतील घोटाळ्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात

NEET exam scam puts future of students in jeopardy नीट परीक्षेतील घोटाळ्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात

चाळीसगाव : देशात वैद्यकिय क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी एनटीएतर्फे घेण्यात येणाऱ्या नीटच्या परीक्षेत घोटाळा झाल्याने अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. या पार्श्वभूमिवर हजारो विद्यार्थ्यांनी चाळीसगाव तहसीलवर धडक मोर्चा काढला.

या वेळी नीटची परीक्षा पुन्हा घेण्यात यावी, अशा मागणीचे पत्र तहसीलदार प्रशांत पाटील यांना विद्यार्थ्यांमार्फत देण्यात आले.

देशात एनटीएतर्फे वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी नीट परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहिर झाला आहे. यात एकाच परीक्षा केंद्रावरील ६७ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क मिळाले आहेत. त्याच बरोबर अनेक संशयास्पद बाबी दिसून आल्याने देशातील विद्याथ्यांकडून परीक्षेत मोठाभष्ट्राचार करत काही विद्यार्थ्यांना जास्तीचे मार्क देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

विद्यार्थी तीन ते चार वर्षे या परीक्षेसाठी तयारी करत असतात. देशातील मोठया हजारो विद्यार्थ्यांचा तहसीलवर मोर्चा; पुन्हा परीक्षा घेण्याची मागण.

परीक्षेत घोटाळा होत असून जास्ते गुण दिले जात असतील, तर कष्टं करून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात असल्याचे मत पालकांनी मांडले. या प्रकरणाची चौकशी करावी व ही परीक्षा पुन्हा घेण्यात यावी, अशा मागणीसाठी शहरातील विद्यार्थ्यांनी शहरातील जेता सायन्स अकॅडमीपासून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते वीर सावरकर चौकातील तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. या वेळी विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. तहलीदार प्रशांत पाटील यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

यातील दोषींवर कठोर शिक्षा करा NEET exam scam puts future of students in jeopardy

या सर्व प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी. तर यात दोषी असलेल्यांना कडक शिक्षा करावी. जेणेकरून पुन्हा असे प्रकार घडू नयेत. यासाठी स्वतंत्र यंत्रणा राबवावी व नीट परीक्षा पुन्हा पारदर्शकपणे घ्यावी. –

प्रवीण महाजन, पालक या वेळी जेता सायन्स अकॅडमीचे संचालक श्रीकांत मोरकर, डॉ. दीपकसिंग मोरकर, नीलेश ढोले, गजानन तायडे, डॉ. मनीषा मोरकर, शशी कुमार, प्रदिप पटेल, एम. डी. नाझीर, स्मिता सोनार व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

घोटाळ्यामुळे स्वप्न पाण्यात लहानपणापासून डॉक्टर होण्याचे स्वप्नं होते. इतकी मेहनत करून परीक्षा दिली. परंतु, या घोटाळ्यामुळे सर्व स्वप्नं पाण्यात मिळाले. फक्त श्रीमंतांच्याच मुलांनी यापुढे डॉक्टर व्हायच का, आम्हाला न्याय द्या, परीक्षा पुन्हा घ्या. मानसी महाजन, विद्यार्थिनी परीक्षेवरील विश्वास उडेल

अशा घोटाळ्यांमुळे देश मोठया संकटात सापडेल. विद्यार्थ्यांचा परीक्षेवरील विश्वास उडूल जाईल. असे लोक जर डॉक्टर झालेत तर त्यांच्याकडून रुग्णसेवा घडूच शकत नाही. या प्रकरणाची चौकशी करावी. – कृशाली बाविस्कर, विद्यार्थि

हेही वाचा : 

पंतप्रधान आवास योजनेची चौकशी. टेंडर घोटाळा उघडकीस

नवा घोटाळा एकाच खोलीतुन चालवल्या 550 बनावट कंपन्या : New Scam 550 Fake Companies Run From One रूम

Government Investigation Agencies. लाखो कोटी रुपयांच्या क्षेत्रीय तांत्रिक व आर्थिक गैरव्यवहाराचा वटवृक्ष जोपासलेला आहे

 

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !