NPSS App News : भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयामार्फत राष्ट्रीय कीड व रोग सर्वेक्षणात (NPSS ) कापूस, सोयाबीन, मुंग, मका, भात, मिरची, व आंबा या पिकांच्या कीड – रोगाबाबत सर्वेक्षणासाठी प्रणाली विकसित करण्यात आली आहे.
NPSS full form in Agriculture : काय आहे NPSS App
भारत सरकारच्या केंद्रीय एकात्मिक कीड व्यवस्थापन केंद्र, NPSS हे App प्ले स्टोअरमधून डाउनलोड करून घेतले असल्यास शेतकर्यांनी स्वतःच्या शेतात प्रत्येक पिकांची निरीक्षणे घेऊन कीड व रोगांची प्राथमिक माहिती त्यात नमूद करावी. त्यावर शेतक-यांना NPSS App च्या माध्यमातून तात्काळ उपायोजना सुचविल्या जातात व जंतू व कीटकनाशक वापराबाबत माहिती मिळते त्यामुळे पिकावर तात्काळ फवारणी करून होणारे नुकसान टाळता येणार आहे.
हे NPSS अँप शेतकर्यांसाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे.सद्यस्थितीमध्ये या NPSS अँपद्वारे कापूस, मका, मिरची, व भात या पिकाबद्दलची कीड व रोग व्यवस्थापन बाबतची माहिती नोंदवू शकतो. या NPSS अँप मध्ये इतरही पिकांचा समावेश करण्यात आले आहे. या NPSS अँपद्वारे घरबसल्या पिकांवरील कीड व रोगांबाबतची निरीक्षणे नोंदवू शकतात. त्या साठी Usar Id आणि Pass Word देखील देण्यात येणार आहे. खालीलप्रमाणे आहे.
- Usar Id : farmernsk@006
- Pass Word : Npss@123
या प्रणालीमध्ये NPSS ॲप डाउनलोड करून शेतकऱ्यांनी स्वत: पिकावरील किडीची निरीक्षणे ॲपवर नोंदविल्यास त्यावरील उपाय योजना शेतकऱ्यांना मोबाइलवर तत्काळ उपलब्ध होणार आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांनी NPSS ॲप चा वापर करण्याचे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय मार्फत यांनी केले आहे. NPSS App या ॲपमध्ये विभागातील प्रमुख पिकांचा टप्प्याटप्प्याने समावेश होणार आहे.
शेतकऱ्यांना पिकांवरील किडीचा प्रादुर्भाव नियंत्रणासाठी NPSS ॲप कमी खर्चात उत्तम नियंत्रण करण्यासाठी तत्काळ उपाययोजना सुचविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी आपल्या मोबाइलवरून गुगल प्ले स्टोअरमधून NPSS ॲप डाउनलोड करून या प्रणालीचा वापर करावा.
ही प्रणाली सध्या प्रायोगिक तत्त्वावर असून, प्रयोगशील शेतकऱ्यांनी प्रणालीचा वापर करून हे NPSS App अधिक परिपूर्ण होण्यासाठी कृषी विभागास अभिप्राय द्यावेत. त्यामुळे या NPSS ॲपमध्ये आणखी सुधारणा करता येईल, असेही कळविण्यात आले आहे.