Nucleus Budget Yojana | न्युक्लियस बजेट योजनेंतर्गत आदिवासी शेतकऱ्यांना योग्य सवलीतीच्या दरात योजना उपलब्ध करून देण्याची मागणी.

न्युक्लियस बजेट योजनेंतर्गत आदिवासी शेतकऱ्यांना ताडपत्री, फवारणी पंप व सौर दिवे सवलीतीच्या दरात उपलब्ध करून द्या : बिरसा फायटर्स शिरपुरची मागणी

शिरपूर : धुळे जिल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्यांना न्युक्लियस बजेट योजनेंतर्गत ताडपत्री, फवारणी पंप व सौर दिवे सवलीतीच्या दरात उपलब्ध करून द्या अशी मागणी बिरसा फायटर्स शिरपुरने प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, धुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

न्युक्लियस बजेट योजनेंतर्गत आदिवासी शेतकऱ्यांना योग्य सवलीतीच्या दरात योजना उपलब्ध करून देण्याची मागणी.


निवेदनात म्हटले आहे कि, धुळे जिल्ह्यातील आदिवासी समाज हा प्रामुख्याने शेती व्यवसाय करतो आणि तो पूर्णतः शेतीवर अवलंबून आहे. वाढत्या महागाईमुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. शेती करण्याकरिता अनेक संसाधनांची गरज पडते. धुळे जिल्ह्यात शिरपूर, धुळे, शिंदखेडा व साक्री या चारही तालुक्यात आदिवासी समाज राहतो.

जिल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्यांच्या पिकांचे संरक्षण व्हावे व आर्थिक मदत व्हावी या हेतूने न्युक्लियस बजेट योजनेंतर्गत आदिवासी वनजमीन धारक व ७/१२ धारक शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाची ताडपत्री (अंदाजे साईज ४०*४० किंवा ५०*५०), सौर दिवे व फवारणी पंप आपल्या स्तरावरून सवलीतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात यावे. सदर साहित्य हे आपल्या कार्यालयामार्फत वितरीत करण्यात यावे जेणेकरून दर्जाची गुणवत्ता राखली जाईल. सदर साहित्य घेण्याकरिता कोणत्याही मक्तेदाराला परवानगी देण्यात येऊ नये.

धुळे जिल्ह्यात आदिवासी शेतकरी यांची लोकसंख्या जास्त असल्याने जास्त ताडपत्री व फवारणी पंप जास्त मंजूर करण्यात यावे जेणेकरून जास्तीच जास्त शेतकरी या योजनेचा लाभ घेतली. सदर योजनेचा लाभ फक्त खऱ्या आदिवासी शेतकरी यांना होईल याची दक्षता घेण्यात यावी. अशी मागणी करण्यात आली आहे. 

निवेदन देताना यांची उपस्थिती 

अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मनोज पावरा, विजय पावरा, सुनिल पावरा, लकी पावरा, शुभम पावरा, पियुष पावरा, महेंद्र पावरा

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *