ऑनलाइन तक्रार दाखल करण्याची सुविधा झाली सुरु : Online complaint Filing Facility has Start

Online complaint Filing Facility has Start : ऑनलाइन तक्रार दाखल करण्याची सुविधा झाली सुरु संपूर्ण माहिती जाणून घ्या .

ऑनलाइन तक्रार दाखल करण्याची सुविधा झाली सुरु : Online complaint Filing Facility has Start

१ फेब्रुवारीपासून ऑनलाइन तक्रार दाखल करण्याची सुविधा : ग्राहक तक्रारींसाठी ऑनलाइन सेवा तक्रार नोंदवण्यासाठी आधारकार्ड किंवा मतदार ओळखपत्राची गरज ऑनलाइन तक्रार दाखल करण्याची सुविधा.
जर एखाद्या सेवा क्षेत्रातील कंपनीने ग्राहक म्हणून तुमची फसवणूक केली असेल, आणि बड्या कंपनीविरोधात तक्रार नोंदवताना न्यायालयीन प्रक्रियेत अडकून राहण्याच्या कटकटीमुळे तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करत असाल तर येत्या १ फेब्रुवारीपासून ग्राहकांची ही चिंता कायमची मिटणार आहे. कारण ‘राज्य ग्राहक विवाद तक्रार निवारण आयोगा’ने सर्वसामान्य ग्राहकांनाही तक्रार नोंदवता यावी, यासाठी ऑनलाइन सेवा सुरू करण्याचे जाहीर केले आहे.

खालील माहिती देखील  वाचा :

ऑनलाइन तक्रार दाखल करण्याची सुविधा Online complaint Filing Facility has Start

यासाठी www.consumerconnect.co.in हे संकेस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. ग्राहकांना ऑनलाइन तक्रार नोंदवण्यासाठी आधारकार्ड किंवा मतदान ओळखपत्र सादर करावी लागणार आहेत. याशिवाय कोणत्या प्रकारची तक्रार नोंदवायची आहे, हा पर्याय निवडून त्याविषयी लेखी तक्रार स्कॅन करून पाठवावी लागणार आहे. यानंतर आयोगाचे नोंदणी कार्यालय कागदपत्राची पडताळणी करून तक्रार नोंदवून घेणार आहे.

ही तक्रार नोंदवली गेल्याचे तक्रारदाराला इमेल किंवा भ्रमणध्वनीवरील संदेशच्या माध्यमातून पुढील तपशील व सुनावणीची तारीख कळणार असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय ग्राहकांना तक्रार नोंदवताना कायदेशीर सल्ला आवश्यक असल्यास त्यांना कॉल सेंटरच्या माध्यमातून मदत केली जाणार आहे. राज्य आयोगाकडून ग्राहकांना तक्रार नोंदवण्यासाठी पुरविण्यात आलेल्या या सुविधेसाठी एक सॉफ्टवेअर तयार करण्यात आला आहे.

Online complaint Filing Facility has Start ऑनलाइन तक्रार दाखल करण्यसाठी येथे क्लिक करा .

राज्यात सुमारे २०० कर्मचाऱ्यांना यासाठी प्रशिक्षण देण्यात आले आहे. या प्रक्रियेमुळे कागदविरहीत कामकाज होईल. याशिवाय सर्वसामान्यांना घराबाहेर न पडता थेट ऑनलाइन तक्रार नोंदवता येईल. आयोगाकडून ग्राहकांना व्हिडिओ-परिषदेचा पर्यायही उपलब्ध करून दिला जाणार आहे. यामुळे ग्राहकांना व कंपनीला समोरासमोर आपले म्हणणे मांडता येणार आहे. भविष्यात भ्रमणध्वनीमधील अॅपच्या माध्यमातून ग्राहकांना सेवा पुरविली जाणार असल्याचे समजते. ( Online complaint Filing Facility has Start )

Read More : 

अशाच नवनवीन माहिती साठी : शासकीय योजना : माहिती अधिकार : ग्रामपंचायत चे माहिती : साठी आमच्या सोसिअल मेडिया ला जॉईन व्हा : आम्ही दररोज नवीन माहिती शेअर करत असतो.

Related Notification Information Pdf : Click Here
Official Website Information Link :  Click Here
Join Us On Facebook  Click Here
Join Us On Telegram  Click Here
Join Us On WhatsApp  Click Here
Join Us On Instagram  Click Here

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *