online frauds and complaints

सायबरमधील लेटेस्ट फ्रॉड प्रकार सावध राहा बाबानो !

ऑनलाईन आपल्यासोबत होणारी फसवणूकीचे प्रकार व करावयाची तक्रार नोंद | Types of online frauds and complaints to be filed. 

तुम्हाला एक मेसेज येतो जो वाचताना सुकृत दर्शनी तो बँकेकडून आल्यासारखाच अधिकृत वाटतो. ज्यात म्हटलं जात की, तुमची अमुक तमुक बँकेतील खाते ब्लॉक करण्यात आले आहे. जर तुम्हाला ते पुन्हा सुरु करायचे असेल तर तुमचा पॅन नंबर अमुक तमुक साईट ची लिंक देतोय तिथं जाऊन अपडेट करा !

ऑनलाईन आपल्यासोबत होणारी फसवणूकीचे प्रकार व करावयाची तक्रार नोंद | Types of online frauds and complaints to be filed


खरतर हा फ्रॉड चा सापळा असतो. अंधारात दगड मारायचा…. लागला कुणाला तर लागला या प्रकारचा हा फ्रॉड !

असा मेसेज दहा जणांना पाठवला तर त्यातील किमान दोन चार जणांचे “त्या” बँकेत खाते असतेच ! आणि नेमके ते लोक मग सापळ्यात अडकतात. 

आता तुम्हाला वाटेल की पॅन नंबर अपडेट केल्याने फ्रॉड कसा होईल ?

तर सांगतो…. 

मुळात तुम्ही त्या लिंक ला क्लिक करणे हेच मुळात धोक्याचे ठरू शकते. कारण एक तर त्या लिंकमध्येच इनबिल्ट व्हायरस लिंक्ड असू शकतो. जो तुम्ही लिंक ला क्लिक केले तुमच्या मोबाईलमध्ये तो व्हायरस घुसतो आणि मग तुमच्या मोबाईलमधील डेटा / फोटो / व्हिडीओ सगळे चोरू शकतो. आणि मग नंतर त्याच्या आधारे तुम्हाला आर्थिक अथवा मानसिक रित्या ब्लॅकमेल केले जाते. म्हणजे उदा. तुमच्याच गॅलरीतील एखादा तुमचा फोटो घेऊन तो मॉर्फिंग करून नंतर तुम्हाला पाठवून “इतके पैसे द्या नाहीतर हा फोटो सोशल वर व्हायरल करू” असं सांगितलं जात. आणि तुम्ही सामाजिक इज्जतीच्या दृष्टीने घाबरून पैसे देऊन टाकता. गंमत म्हणजे हे लोक एकदम पन्नास हजार एक लाख रुपये अशी मोठी रक्कम मागत नाहीत तर दोनपाच हजार इतकीच मागतात. तुम्हाला वाटत की थोडक्यात भागतेय अन इज्जत वाचतेय म्हणून तुम्ही ते देऊन टाकता आणि समोरून नंतर कळवलं जाते की “ओके तुमचा तो फोटो डिलीट केला आहे” 

तुम्हीही रिलॅक्स होता. मात्र चार आठ दिवसानंतर दुसऱ्याच नम्बरवरून तोच फोटो तुम्हाला पाठवून पुन्हा ब्लॅकमेल केलं जाते आणि अशारितीने दोन महिन्यात एकूम मिळून लाखभर रुपयाला चंदन लावले जाते. 

किंवा दुसरा धोका म्हणजे…. तुम्हाला त्या लिंकवर विविध माहिती भरायला लावताना एका विशिष्ठ वेळी…. म्हटलं जातं की “आता तुम्हाला एक ओटीपी येईल तो इथं द्या” खरेतर तोपर्यंत वरची जी माहिती तुम्ही अपडेट करत आलेला असता त्यातच तुमच्या खात्याचा नम्बर व इतर डिटेल्स दिलेलं असतात. हॅकर त्याच्या मोबाईलवरून तिकडून तुमच्याच खात्यावर पैसे काढण्यासाठी लॉग इन झालेला असतो आणि त्यावेळी तुम्हाला मग ओटीपी जो येतो तो खरंच बँकेकडूनच असतो जो तुम्ही त्या समोरच्याला नकळत देऊन टाकता आणि तोच ओटीपी वापरून समोरचा माणूस दोन सेकंदात तुमचं खात साफ करतो. 

धोका हा आहे !

डीडी क्लास : मग आता यावर उपाय काय ?

सोप्पा उपाय आहे. ज्यांचे खातेच मेसेजमधल्या त्या बँकेत नाही त्यांनी या मेसेज ला एंटरटेन करू नये. जमलंच तर त्याविरुद्ध सरळ ऑनलाईन सायबर सेल कडे तक्रार करावी. जेणेकरून इतर कुणाची फसवणूक होणार नाही. आणि तितकं नाही जमलं तर किमान तो नंबर तरी तुम्ही ब्लॉक करावा. 

आणि ज्यांचे खरेच त्या मेसेज मधील बँकेत खाते असेल त्यांनी स्वतः त्या तुमच्या बँकेत जाऊन खात्री करून घ्यावी की खरेच बँकेने असं काही पाठवलं आहे का ? तेव्हा १००% खात्रीने सांगतो बँकेचे लोक सांगतील की…. असं काही त्यांनी पाठ्वलेच नाहीय. कारण अशी कोणतीही गोष्ट बँक मेसेजद्वारे करत नाही. फारतर फार ईमेल द्वारे सूचना देते. 

फिजिकली तुम्ही बँकेत गेल्याने पुढील सगळेच धोके संपतात आणि तुम्ही सुरक्षित राहता !

सोबत आजच मला आलेला तो मेसेज व त्याला मी दिलेले उत्तर पाहावे !

जागृत राहा, सुरक्षित राहा….

(ग्लोबल सायबर क्राईम हेल्पलाईन नॅशनल अवॉर्ड विनर)

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *