नंदुरबार : राज्यात सध्या आरक्षणाच्या मुद्यावरून राजकारण चांगलंच तापल्याच दिसून येत आहे. एकीकडे मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे, दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये यासाठी आंदोलन सुरू आहे. त्याचबरोबर धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून देखील राज्यात आंदोलन करत आहेत.
अशातच धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून नंदुरबारमध् ये आदिवासी समाज आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. तर काँग्रेस पक्षातून भाजपात आयात केलेल्या माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी ६ ानगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
एकनाथ शिंदे हा मूर्ख नालायक आणि बेरड मुख्यमंत्री असल्याचं माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी म्हटलं आहे. तर जो सरकार किंवा आदिवासींच्या विरोधात निर्णय घेईल
त्याला जमिनीत गाडल्या शिवाय शांत बसायचं नाही, असा पवित्रा देखील त्यांनी यावेळी घेतला आहे. आदिवासी आमदार खासदारांनी राजीनामा देण्याची गरज नाही. सरकार निवडणुकीच्या उद्दिष्टाने धनगर समाजाला बसवण्याच्या काम करत आहे. आदिवासी क्षेत्रातून शिवसेना, राष्ट्रवादी, भाजपाला हद्दपार करा, असं काँग्रेसमधून नुकतेच भाजपात गेलेल्या पद्माकर वळवी यांनी म्हटलं आहे.
आदिवासींचे हक्क, आरक्षण, घटनात्मक तरतुदी याच्याबाबतीमध् ये आम्ही आदीवासी पुढारी म्हणून कधीच तडजोड केली नाही. पण, सरकारमध्ये आम्ही मंत्री असताना आम्ही सरकारला सांगत आलो आहोत, आदीवासींच्या हक्कांवर तुम्ही गदा आणू शकत नाही. आम्ही राज्यामध्ये आमदार म्हणून मंत्री म्हणून काम केलं आहे, परतू आज ४ पक्षानगरांच्या, आदिवासींच्या बाबतील पैसा कायदा असेल त्याबाबत ज्या.
येणाऱ्या विधानसभेत आदिवासींच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या भाजपा, शिंदे, आणि अजित पवार गटाच्या उमेदवारांना सरकसकट पाडा…;- पद्माकर वळवी ( Padmakar Valvi home envy of Mahayuti )
भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेत आहेत. त्यातून राज्याला मुर्ख मुख्यमंत्री राज्याला मिळाला आहे, असं पद्माकर वळवी यांनी यावेळी म्हटलं आहे. मुख्यमंर्त्यांचे सल्लागार अतिशय चुकीचे आहेत, त्याचे सल्लागार कोण आहेत माहिती नाही. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी आदीवासींच्या भावनांशी खेळू नये. आदिवासींनी कधीच काही मागितलेलं नाही. राजकारणापायी आदिवासींचा बळी घेण्याचं काम सुरू आहे.
Padmakar Valvi home envy of Mahayuti
मी कोणत्या पक्षात आहे, याचा विषय नाही. पण जो पक्ष आदिवींच्या विरोधात निर्णय होईल त्याला जमिनीत गाडल्याशिवाय राहायचं नाही. त्यांना दाखवून द्या आदिवासी कोण आहेत, असंही त्यांनी म्हटलं आहे. आदिवासी आमदार खासदारांनी राजीनामा देण्याची गरज नाही. त्यांनी फक्त धमक्या द्या, असंही पद्माकर वळवी (चंकडींत टंसअप) यांनी म्हटलं आहे.