Police Crimes – News सासर च्या मंडळीच्या जाचाला कंटाळुन घेतला गळफास.

Police Crimes - News
Police Crimes – News


शेवगांव तालुक्यातील आव्हाने बु||. येथील मयत प्रतिभा  लक्ष्मण  भुसारी  हिचा  दारुडा पती व सासरच्या मंडळीच्या  जाचाला कंटाळुन गळफास घेऊन केली  आत्महत्या  आरोपी  पती अटकेत मुलीच्या  वडिलांनी केला व्यक्त केला घातपात असल्याचा  संशय.

शेवगांव तालुक्यातील  आव्हाने येथील  रहिवासी महिलेने सासर च्या मंडळीच्या जाचाला  कंटाळुन घरातील छताला गळफास घेऊन आपली  जीवन यात्रा संपवली. 

याबाबत सविस्तर  वृत्त असे की मयत  महिलेला पहिल्या दोन मुली झाल्या म्हणुन पती रोज दारु पिऊन मारहाण करत असे त्यास *सासु राहीबाई बापु भुसारी  सासरा बापु नाना भुसारी  नणंद  सुनीता शिवाजी गव्हाणे वेलतूरी ता आष्टी  जि. बिड  दुसरी नणंद संगीत संजय  बकाल ढोरजळगांव शें. ता शेवगाव  तिसरी नणंद सविता किशोर डोंगरे बऱ्हाणपूर.ता शेवगाव  हे सर्व संगनमताने मारहाण शिवीगाळ व मानसिक त्रास देत असत.

 दरम्यान मयत प्रतिभा हिस मार्च 2022 मध्ये एक मुलगा झाले तरीही तिचा छळ यां सासरच्या मंडळीणी सुरु ठेवला तिच्या तान्ह्या बाळाला  देखील त्रास देत असत यां विषयी शेवगांव पोलीस स्टेशन ला  मयत मुलीचे वडील   बाळासाहेब गोरक्षनाथ उगले रा आखतवाडे ता शेवगाव यांनी मुलीच्या  मृत्यु बद्दल फिर्याद दिली संशयित पती लक्ष्मण यांस शेवगांव पोलिसांनी ताब्यात घेतले  गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पावरा साहेब आणि त्याचे सहकारी करत आहेत.

 ताजा कलम.

सदरच्या गुन्ह्यात सहभाग असलेल्या आरोपींचा जो पर्यंत अटक होत नाही तो पर्यंत माझ्या मयत मुलीला न्याय मिळणार नाही अशी भावना मयत मुलीच्या वडिलांनी व्यक्त केली आहे.

*अविनाश देशमुख शेवगाव* 

*सामाजिक कार्यकर्ता पत्रकार*

Leave a Comment

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !