Police Patil | पोलीस पाटलांना लढवता येणार | सहकारी संस्थेच्या निवडणूका |
खुशखबर! पोलीस पाटलांना लढवता येणार सहकारी संस्थेच्या निवडणूका राज्य सरकारने शासन निर्णय काढल्याने शिक्कामोर्तब.
पोलिस पाटलांना सहकारी संस्थांच्या निवडणुका लढल्या बाबत सहकारी संस्थेत परत घेण्याबाबत अनेक शंका-कुशंका होत्या अनेक पोलिस पाटलांना सहकारी संस्थेत पद घेतल्याच्या तक्रारीनंतर अपात्र ठरवण्यात आल्याचे प्रकार घडले होते मात्र आता शासनाने निर्णय घेतल्याने पोलिस पाटलांना सहकारी संस्था च्या निवडणूका लढवता येणार आहे त्यामुळे पोलीस पाटलांच्या आनंदाचे वातावरण आहे.
पोलीस पाटील संघटनेच्या मागण्या बाबत गृहमंत्री यांच्याकडे 3 डिसेंबर 2021 रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. पोलीस पाटील सहकारी संस्थांमध्ये निवडणूक लढवू शकतो असे शासन पत्र असतानाही बऱ्याच ठिकाणी नियुक्ती प्राधिकारी जिल्हाधिकारी हे पोलीस पाटील यांचे निलंबन करतात. या मुद्द्यांबाबत बैठकीमध्ये चर्चा झाली त्या अनुषंगाने या संदर्भात स्पष्टता आणि याबाबत पोलीस पाटील संघटना यांनी शासनाकडे मागणी केली होती.
पोलीस पाटील हा गावातील शासनाच्या निवासी प्रतिनिधी असतो त्याच्या पदाचा दर्जा कामाची भूमिका आणि जबाबदाऱ्या पाहतात यांनी कोणत्याही राजकीय कार्यात स्वतःला सहभागी करून घेणे अपेक्षित नाही. महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 हा नियम नुसार पोलीस पाटील यांच्यावर राजकारणात भाग घेण्यापासून अथवा विधिमंडळाच्या अथवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोणत्याही निवडणुकीत सहभाग घेण्यास प्रतिबंध केले आहे.
पोलीस पाटील पदासाठी उमेदवार हा कोणत्याही राजकीय पक्ष किंवा राजकीय संघटनेचे सदस्य किंवा त्यांच्याशी संलग्न असता कामा नये स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी किंवा सदस्य यांच्या पोलीस पाटील पदासाठी उमेदवार म्हणून विचारात घेतले जाऊ शकतात तथापि त्या सर्व पदावरून प्रत्यक्षात राजीनामा दिल्यानंतर त्यांची नियुक्ती पोलीस पाटील पदावर केली जाऊ शकते.
तुटपुंज्या मानधनावर कशी करावी उपजीविका
पोलीस पाटील यांना मानधन दिले जाते वेतन दिले जात नाही म्हणून त्यांनी स्वतःचे असे स्वतंत्र उपजीविकेचे साधन असणे अपेक्षित आहे तुटपुंज्या मानधनावर ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकत नाही जर तो शेती करत असेल किंवा स्थानिक व्यावसायिक व्यापार करीत असेल तर हे काम त्यांच्या पोलीस पाटील पदाच्या कर्तव्यात हानिकारकच बाधा निर्माण करणारे असता कामा नये म्हणूनच त्यांनी सर्वसाधारणपणे कार्यरत असताना त्यांच्या कार्यकाळात कोणत्याही सहकारी संस्थेशी संबंध ठेवू नयेत अशी अपेक्षा करणे. अवाजवी आहे परिणामी पोलीस पाटील पोलीस पाटील पदाच्या उमेदवार सहकारी संस्थांच्या सदस्य व पदाधिकारी राहू शकतो किंवा त्यासाठी निवडणूक लढू शकतो. या संदर्भात शासकीय कर्मचाऱ्यास लागू असलेली महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 चा नियम 16(3) ची तरदूत, पोलीस पाटील यांना लागू नसल्याचेही म्हटले आहे.