RTI ची माहिती न दिल्याने चार पोलिसांच्या चौकश्या आदेश.

आरटीआय’ची माहिती न दिल्याने चार पोलिसांच्या चौकशीचे आदेश.

माहिती अधिकारांतर्गत मागितलेली माहिती जाणूनबुजून नाकारल्याप्रकरणी तत्कालीन जन माहिती अधिकारी तथा सहायक पोलिस आयुक्त प्रीती टिपरे यांच्यासह चार अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश पुणे खंडपीठाचे राज्य माहिती आयुक्त समीर सहाय यांनी दिले आहेत.

शहरातील दिनेशसिंह शीतल यांनी दिलेल्या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने कार्यवाही केलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे व पदनामे मिळावे, अर्जाच्या अनुषंगाने द्रौपतीबाई शीतल, दिनेशसिंग शीतज्ञ यांना चौकशीसाठी बोलवलेल्याची प्रत द्यावी आदीची

माहिती मागितली होती; पण ही माहिती तत्कालीन जन माहिती अधिकारी प्रीती टिपरे यांनी नाकारली.

याप्रकरणी दिनेशसिंग शीतल यांनी प्रथम अपिलीय अधिकाऱ्यांकडे दाद मागितली, त्यांनी अपील फेटाळले. यामुळे शीतल यांनी राज्य माहिती आयोग, पुणे खंडपीठ येथे दाद नाही.

मागितल्यानंतर तेथे याप्रकरणी सुनावणी झाली. त्यानंतर प्रकरणी वरील सर्व अधिकाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशी करण्याचा आदेश पुणे खंडपीठाने दिला. दरम्यान, याबाबत समोआ टिपरे यांच्याशी संपर्क साधला.

दिनेशसिंग विठ्ठलसिंग शितल , तक्रारदार : “मी माहिती अधिकाराखाली मागितलेली माहिती जन माहिती अधिकाऱ्यांनी चुकीची कारणे देत नाकारली. याप्रकरणी पुणे खंडपीठात दाद मागितल्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सुनावणीसाठी हजर राहण्यास सांगितले पण ते गैरहजर राहिल्याने त्यांच्यावर विभागीय चौकशी करण्याचे आदेश पोलिस आयुक्तांना दिले आहेत. शिवाय मी मागितलेली माहिती लवकर विनामूल्य द्यावे, तसेच अनुपालन अहवाल व शपथपत्र २० मार्चच्या आत आयोगाकडे सादर करण्याचा आदेश दिला आहे.”


Leave a Comment

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !