Salman Khan यांना ठार मारण्याची धमकी. |
मला शस्त्र परवाना द्या, लॉरेन्स बिश्नोईच्या धमकीनंतर सलमान खान मुंबई पोलीस आयुक्तांच्या भेटीला.
मुंबई: बिश्नोई गँगकडून ठार मारण्याची धमकी आल्यानंतर सलमान खान ने (Salman Khan) आता वेपन्सच्या लायसन्ससाठी अर्ज केला आहे. याच संबंधी त्याने आज मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेतली. सलमान खान यांच्या वडिलांना, सलीम खान यांना काही दिवसांपूर्वी धमकीचं पत्र आलं होतं.
सिद्धू मुसेवालाची हत्या करणाऱ्या लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला ठार मारण्याची धमकी दिली आहे. काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानला बिश्नोई गँगकडून धमकी मिळाली आहे. सलमानचा न्याय हा न्यायालयाच्या न्यायानुसार होणार नाही, त्याने आणि त्याच्या वडिलांनी जनतेसमोर येऊन जाहीर माफी मागावी अशी मागणी त्याने केली होती. तसे न झाल्यास सलमान खानला ठार मारू असंही त्याने म्हटलं आहे.
काय आहे कळवीट शिकार प्रकरण?
राजस्थानमधील बिश्नोई समाज कळवीट प्राण्याला देव मानतात. 1998मध्ये ‘हम साथ-साथ है’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सलमान खानवर राजस्थानमध्ये काळवीटाची शिकार केल्याचा आरोप झाला होता.
या काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानलाही तुरुंगाची हवा देखील खावी लागली होती. मात्र, आता या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई टोळीने उडी घेतली आहे.
कोण आहे लॉरेन्स बिश्नोई?
बिश्नोई टोळीचा प्रमुख लॉरेन्स बिष्णोई अवघ्या 28 वर्षांचा आहे, तर त्याच्या टोळीतील सदस्य वीस ते पंचवीस वयोगटातील आहेत.
मात्र, इतक्या कमी वयात या सर्वांवर हत्या, खंडणी, हत्येचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे नोंद आहेत. स्वतः लॉरेन्सवर पन्नास पेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीने आतापर्यंत केलेले गुन्हे पाहता त्याच्या टोळीकडून सलमान खानला देण्यात आलेल्या हत्येच्या धमकीला मुंबई आणि दिल्ली पोलिसांनी गांभीर्याने घेतलंय.
#SalmanKhan CMOMaharashtra #mumbai #police #thane #bollywood #mumbaipolicecommissioner