Shevgaon Municipal Council able to allocate the funds reserved for the disabled to the bank account of the disabled brothers.

शेवगांव  नगरपरिषदेने शासनाच्या नगरविकास विभागाच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी राखून ठेवलेल्या निधीचे शहरातील दिव्यांग बांधवांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आले.


 अविनाश देशमुख पत्रकार. 9960051755 
शेवगाव (04 फेब्रुवारी ) 

दिव्यागांसाठी असलेल्या राज्य व केंद्र सरकारच्या विविध सवलतीच्या योजनांचा दिव्यांगांनी लाभ घेवून स्वयंपूर्ण होण्याचा प्रयत्न करणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन राउत यांनी केले. शासनाच्या नगरविकास विभागाच्या माध्यमातून शेवगाव नगरपरिषदेने दिव्यांगांसाठी राखून ठेवलेल्या निधीचे शहरातील दिव्यांग बांधवांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आले.

कार्यक्रमात मुख्याधिकारी राउत उपस्थित.

त्याची माहिती संबधितांना देण्यासाठी पार पडलेल्या विशेष कार्यक्रमात मुख्याधिकारी राउत बोलत होते. ते पुढे म्हणाले की, शहरातील नगरपरिषदेकडे नोंदणी असलेल्या १६२ दिव्यांग बांधवांना प्रत्येकी रुपये १०५५ प्रमाणे १ लाख ७० हजार ९१० रुपये रक्कम संबधीतांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आली आहे.

नगरपरिषदेचे लेखापाल सोमनाथ नारळकर उपस्थित.

नगरपरिषदेचे लेखापाल सोमनाथ नारळकर यांनी स्वागत व प्रास्तविक करून योजनेची माहिती दिली. नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचे शरद लांडे यांच्यासह प्रहार दिव्यांग संघटनेचे गणेश हनवते, किशोर गरंडवाल, पांडुरंग काथवटे, शरद केरकड, लक्ष्मण शिंदे, सोहेल पठाण, अफजल पठान, सौरभ शिंदे, बाळासाहेब सरोदे यांच्यासह दिव्यांग बांधवांची उपस्थिती होती. 

Shevgaon Municipal Council able to allocate the funds reserved for the disabled to the bank account of the disabled brothers.


*ताजा कलम*


*शेवगांव तालुक्यातील दिव्यांग बांधवांसाठी शासनाने विविध योजनांमध्ये प्राधान्यायने समावेश करून त्यांचे जीवन  सुसहय्य केले पागिजे यासाठी शाशन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे गणेश हनवते  यांनी यावेळी बोलतांना सांगितले.

*अविनाश देशमुख शेवगांव* 

*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *