Shevgav police station | शेवगाव पोलीस स्टेशन च्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची दबंग कामगिरी

शेवगाव पोलीस स्टेशन च्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची दबंग कामगिरी चोवीस तासात पकडले अपहरणकर्ते.

शेवगाव पोलीस स्टेशन च्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची दबंग कामगिरी
Shevgav police station 


अपहरण झालेल्या तरूणाची शेवगाव पोलीसांनी चोवीस तासात केली सुटका ” शेवगाव पोलीस स्टेशन गु.र.नं.672/2022 भा.द.वि.कलम 363 प्रमाणे दिनांक 22/09/2022 रोजी 21-47 वा.दाखल असुन नमुद गुन्ह्यातील फिर्यादी नामे लक्ष्म़ण भीमराव बोरूडे रा.शेकटे बुा ता.शेवगाव यांनी फिर्याद दिली की,त्यांचे चुलते सोनाजी छबुराव बोरूडे वय 30 वर्षे हे शेवगाव ते गेवराई रोडवर साई कोटेक ॲण्ड़ जिनिंग जवळ बालमटाकळी शिवारात असताना त्यांना चार ते पाच आज्ञात इसमांनी बोलेरो जीप मध्ये जबरदस्तीने बसुन नेवून त्यांचे अपहरण केले आहे.

अशा मजकुराचे फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टरी दाखल करण्यात आला होता. *नमुद गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवुन अपहरीत तरूणाचा शोध घेणे कामी आम्ही विलास पुजारी,6 पोलीस निरीक्षक शेवगाव पो.स्टे यांनी तात्काळ सपोनि अशिष शेळके,सफौ बडधे,चापोना संभाजी धायतडक,पोकॉ राजेंद्र ढाकणे यांचे पथक तयार करून त्यांना तपास कामी रवाना केले. तपास पथकाने प्रथम गेवराई येथे शोध घेतला परंतु तेथे अपहरित तरूण मिळुन आला नाही.

 23/09/2022 रोजी सकाळी 07-30 वा.सुमारास 6आज्ञात आरोपींनी अपहरित तरूण सोनाजी छबुराव बोरूडे याचे चुलत भावाचे मोबाईल फोनवर फोन करून सोनाजी छबुराव बोरूडे यास फोनवर बोलण्यास भाग पाडुन चार-पाच लाख रूपये तयार ठेवा असे सांगीतले होते.

शेवगाव पोलीस स्टेशन चे दबंग अधिकारी विलास पुजारी,पोलीस निरीक्षक शेवगाव पो.स्टे यांनी परिस्थीतीचे गांभीर्य लक्षात घेवुन सदरचे आज्ञात आरोपीचे मोबाईल फोनचे लोकेशन वरून तपास पथकास प्रथम जेजूरी भागात तपास करण्याचे सांगीतले व त्यानंतर मोबाईल लोकशन बदलल्याने तपास पथकास बारामती पोलीस स्टेशन हद्दीत सापळा लावण्यास सांगीतले त्यानुसार तपास पथकाने सापळा लावून 1) भगवान प्रल्हाद ठोसर वय 36 वर्षे रा.सिंदखेड ता.गेवराई जि.बीड 2) केलास केरूजी धरंधरे वय 50 वर्षे रा.साठेनगर गेवराई ता.गेवराई जि.बीड 3)जिवन प्रकाश करांडे वय 30 वर्षे रा.सिंदखेड ता.गेवराई जि.बीड 4) बाळासाहेब भास्क़र करांडे व य 50 वर्षे रा.मोटे गल्ली गेवराई ता.गेवराई जि.बीड 5) ज्ञानेश्व़र भगवान कांबळे वय 27 वर्षे रा.साठेनगर गेवराई ता.गेवराई जि.बीड यांना अपहरित तरूण सोनाजी छबुराव बोरूडे याचेसह व त्यांनी वापरलेल्या बोलेरो जीप नं.MH-23 E-9713 हीचेसह शिताफीने ताब्यात घेतले आहे.

 सदर कामगिरी मा.मनोज पाटील पोलीस अधीक्षक,अहमदनगर ,मा.सौरभ कुमार अगरवाल अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, *मा.संदीप मिटके उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर विभाग प्रभारी चार्ज शेवगाव उपविभाग शेवगाव ,विलास एस. पुजारी ,पोलीस निरीक्षक शेवगाव पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि अशिष शेळके,स फौ भगवान बडधे,पो कॉ राजेंद्र ढाकणे,चा पो ना संभाजी धायतडक पोलीस कॉन्टेबल वासुदेव दमाळे यांनी यशस्वी कामगिरी केली तालुक्यातुन अभिनंदन होत आहे

*अविनाश देशमुख शेवगाव* 

*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*

Leave a Comment

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !