शेवगाव शहरातील नगर परिषद हद्दीतील जागा शहरातील क्रांती चौकात सिद्धिविनायक गणपती मंदिरामागे सुरु असलेले अवैध चार माजली कोट्यवधींचे बांधकाम अनधिकृतपने बांधकाम पाडले बंद प्रा. किसन चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन.
अविनाश देशमुख शेवगांव.
शेवगाव (ता. 5 डिसेंबर शेवगांव प्रतिनिधी) शेवगाव शहरात जुन 2015 पासुन नगरपरिषद अस्तित्वात आहे बांधकाम परवाना अतिक्रमण आणि सरकारी जागांवर होत असलेले अतिक्रमण थांबविण्यासाठी स्वत्रंत्र विभाग आहे.
गेल्या काही दिवसांपासुन शहरातील नगर परिषद हद्दीतील गट न 1124 पैकी 02 आर ही जागा शहरातील क्रांती चौकात सिद्धिविनायक गणपती मंदिरामागे असून या जागेवर काही दिवसांपासून अनधिकृतपने बांधकाम चालु होतें त्यामध्ये जवळच्या जागेचा “एक ट्रस्टी एक व्यापारी आणि एक शिक्षक आणि एक कायद्याचा रक्षक’ मिळुन चार मजली इमला बांधण्याचा जुमला करत होतें.
रात्रंदिवस बांधकाम सुरु होतें सदरची जागा ही शासकीय अभिलेखानुसार कुणाच्याही मालकीची खाजगी जागा नसून शासकीय जागा आहे. मा जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या आदेशाच्या चौकशीनुसार सदरची जागा ही बगीचा आणि रस्ता रुंदीकरणासाठी राखून ठेवलेली आहे शहराच्या मध्यभागी असलेल्या या शासकीय जागेवर शेवगावकरांच्या नाकावर टिचून राजरोसपणे अनाधिकृत बांधकाम करत होतें ,सदरचे बांधकाम कुणाच्या परवानगीने सुरू केले होतें ? कुणाचे होतें ?
सगळं माहीत असूनही नगर परिषद, व गावातील कोणीच बोलायला तयार नव्हतं* ‘तेरी भी चूप ..मेरी भी चुप परंतु वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा किसन चव्हाण यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांणी तात्काळ शेवगाव शहरातील वंचितच्या पदाधिकाऱ्यां मार्फत नगर परिषद, आणि तहसीलदार यांना व *नगरपरिषद प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून सदरच्या शासकीय जागेवरील अनाधिकृत बांधकाम तात्काळ बंद करण्यात आले.
शेवगाव शहरातील नगर परिषद हद्दीतील शासकीय जागेवर, भूखंडावर अनेकांची अतिक्रमणे आहेत,अनेकांनी शासकीय भूखंड गिळंकृत केलेले आहेत याला जबाबदार कोण? आशीर्वाद कोणाचा ?
शेवगाव शहराची परिस्थिती” कुंपनच शेत खातय “अशी झाली आहे *याचा पर्दाफाश प्रा किसन चव्हाण निश्चितच करतील असा विश्वास सर्वसामान्य शेवगावकरांना वाटला अनेकांनी फोनवर आणि प्रत्यक्ष भेटुन वंचीत बहुजन आघाडीच्या नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आपल्याकडून सर्वसामान्य जनतेची सेवा घडत राहो.
*ताजा कलम*
संबंधित बांधकामाला असे काय कागतपत्र पाहुन पालिकेच्या बांधकाम विभागाने परवानगी दिली हा संशोधनाचा विषय आहे याची सखोल चौकशी झाली पाहिजे.
क्रमशः
*नगरपरिषद मालकीच्या नवीन बाजारतळ येथे दर पंधरा दिवसाला टपरी टाकतय कोण आणि त्या परवानगी देतंय कोण नगरपरिषदेचा अतिक्रमण विभाग साखर झोपेत त्याना कोणीतरी जाऊन सांगा.
*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता /पत्रकार*