Shevgav Tahsil karyalay | शेवगाव तहसिल कार्यालयाचा भोंगळा कारभार.

शेवगाव तहसिल कार्यालयाचा भोंगळा कारभार. | Shevgav Tahsil karyalay.

शेवगाव तहसिल कार्यालयाचा भोंगळा कारभार. | Shevgav Tahsil karyalay.
 Shevgav Tahsil karyalay.


 चवहाट्यावर जप्त केलेल्या ट्रॅक्टरचे किमती स्पेअर पार्टस् चोरी तालुका दंडाधिकाऱ्यांच्या कार्यालयातच चोरी कुंपणच तर शेत खात नाही ना ?

शेवगाव तालुक्यातील नवीन दहिफळ येथील शेतकरी श्री. बंडू ज्ञानेश्वर आर्ले यांच्या मालकीचा स्वराज 744 लाल रंगाचा ट्रॅक्टर दिनांक 6 ऑगस्ट 2022 रोजी गौण खनिज प्रतिबंधक पथकाने जप्त करून शेवगाव तहसील येथे जप्ती चि कारवाई उभा केलेला आहे.

त्या संदर्भात तहसीलदार साहेब यांनी आर्ले यांना नोटीस देऊण एक लाख 19 हजार 675 रुपयांचा दंड झाल्याबाबत कळवले. बंडू आर्ले यांच्या म्हणण्यानुसार ट्रॅक्टर हे घोटण शिवारात पंचर अवस्थेत उभे होते त्यामधे कोणतीही अवैध वाहतूक नव्हती तरीदेखील ट्रॅक्टर पकडून नेले आहे हा अन्याय आहे. याबाबत आर्ले यांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अपील दाखल केली आहे.सदरचा ट्रॅक्टर हा तहसीलदार शेवगाव यांच्या ताब्यात आहे.

आर्ले हे दिनांक 11नोव्हेंबर 2022 रोजी शेवगाव तहसील कार्यालयातील आवारात सदरचा ट्रॅक्टर पाहण्यासाठी गेले असता ट्रॅक्टरचे स्टार्टर,बॉश पंप, बॉशपंपाचे पाईप, फिल्टर, पावर स्टेरिंगचे पाईप, गिझर,डम्पिंग पाईप असे हजरो रुपयांचे स्पेअर पार्ट चोरून नेल्याबाबत व ट्रॅक्टरची जाणुन बुजुन तोडफोड केल्याबाबत तहसीलदार साहेबांना सांगितले असता आम्ही काय वाचमेन आहोत का? अशा पद्धतीची उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे बंडू आर्ले यांनी जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडे तक्रार दाखल करून न्याय मिळण्याची मागणी केली आहे.

तहसिल कार्यालयाकडून ट्रॅक्टर सोडण्यासाठी माझ्याकडे पैशाची मागणी केली होती परंतु मी देण्यास नकार दिल्याने माझ्या ट्रॅक्टरवर 1लाख 19 हजार 675 रुपयांचा अकारण दंड ठोठावला असल्याचे त्यांनी सांगितले. तहसील कार्यालयातील अधिकारी उपस्थीत असताना तेथील जप्त वाहनांचे स्पेयर पार्टस कसे चोरी जातात व याची दखल तहसिलदार का घेत नाहीत? हा मोठा प्रश्न आहे.

आर्ले शेवगांव पोलिसांमध्ये चोरीची तक्रार दाखल करायला गेले असता तुमचा ट्रॅक्टर तहसील कार्यालयाने जप्त केल्याने आम्ही तुमची तक्रार नोंदवुन घेऊ शकत नाही असे सांगितले* आता न्याय कोणाकडे मागायचा ??? 

ताजा कलम.

यां पूर्वीही शेवगांव तहसील कार्यलयातुन अनेक ब्रास जप्त गौण खनिज संगनमताने पसार होऊन सरकारी अधिकाऱ्यांच्या खासगी कामांवर बिनबोभाट रातोरात पोहोच झाली आहे अशी चर्चा आहे कार्यालयातील सी सी टीव्ही त चेक केल्यास ते बागडबिल्ले कोण सगळं समजेल.

*अविनाश देशमुख शेवगाव* 

*सामाजिक कार्यकर्ता पत्रकार*

Leave a Comment

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !