अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) पोलीस पाटील व कोतवाल भरती प्रकिया सुरु करा : बिरसा फायटर्स.
शिरपूर : धुळे जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) पोलीस पाटील व कोतवाल भरती प्रक्रियेची स्थगिती उठवून तात्काळ भरती प्रकिया सुरु करा असी मागणी बिरसा फायटर्सने उपविभागीय अधिकारी शिरपूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
निवेदनात म्हटले आहे कि, धुळे जिल्ह्यात पोलीस पाटील व कोतवाल भरती प्रकिया सुरु होती; त्यानुसार उमेदवारांनी सदर पदाकरिता ऑनलाईन अर्ज भरले होते. परंतु, महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागाकडील पत्र क्र.बीसीसी ११२३/प्र.क्र.७४/१६-क दि. १३/१०/२०२३ अन्वये बिगर आदिवासी आरक्षण हक्क बचाव संस्थेने मा. सर्वोच्च नायालयात याचिका दाखल केली होती, त्यानुसार मा. सर्वोच्च नायालयाचे पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत पेसा क्षेत्रातील विहित करण्यात आलेल्या १७ संवर्गातील पद भरतीच्या अनुषंगाने निवड/नियुक्ती प्रकिया संदर्भात कोणतीही कार्यवाही करण्यात येऊ नये असे निर्देश दिलेले आहे.
मा. जिल्हाधिकारी, धुळे यांचे कडील पत्र क्र.ड/कक्ष-३/एमएजी-१/कावि/६१३/२०२३ दि. २०/१०/२०२३ व पत्र क्र.फ/कक्ष-७/टेनन्सी/कावि/८३३/२०२३ दि. २०/१०/२०२३ अन्वये पोलीस पाटील व कोतवाल ही पदे देखील अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) १७ संवर्गाच्या सूचीतील असल्याने धुळे जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत चालू असेलेली भरती प्रकिया पुढील आदेशापावेतो स्थगित करण्यात येत आहे असे कळविले होते.
मा. राज्यपाल यांच्या अधिसुचनेसार अनुसूचित क्षेत्रातील सुनिश्चित केलेली १७ संवर्गातील पदे स्थानिक अनुसूचित जमातीतील उमेदवारांमधून भरण्यात येईल असे स्पष्ट निर्देश दिले आहे. तरी देखील एकीकडे धुळे जिल्ह्यातील बिगर पेसा क्षेत्रातील पोलीस पाटील व कोतवाल पद भरती प्रकिया सुरळीत चालू होती आणि त्याकरिता परीक्षा घेण्यात आली. अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) पोलीस पाटील व कोतवाल पद भरती प्रकियेला स्थगिती आणून बिगर पेसा क्षेत्रातील भरती प्रकिया सुरळीत सुरु आणि अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) उमेदवारांवर अन्याय करण्यात येत आहे.
अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) उमेदवारांवर होत असलेल्या अन्यायाबाबत विचार करून निवेदनाची दखल घेऊन धुळे जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) पोलीस पाटील व कोतवाल भरती प्रक्रियेची स्थगिती उठवून तात्काळ भरती प्रकिया सुरु करावी असी मागणी करण्यात आली.
समाज बांधव यांची उपस्थिती
निवेदन देतांना अध्यक्ष नाशिक विभाग विलास पावरा, तालुकाध्यक्ष ईश्वर मोरे, जैतपूर गाव अध्यक्ष ज्ञानेश्वर मोरे, भोंग्या पावरा, शिवाजी पावरा, जिजाबराव पावरा, विजय पावरा, दशरथ भिल, रामेश्वर पावरा, जतन भील, बदुलाल राठोड व इतर समाज बांधव उपस्थित होते.