एस.आर.बी इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘आदिवासी संस्कृती महोत्सव’ साजरा.”

‘९ ऑगस्ट जागतिक आदिवासी’ दिनानिमित्त दहिवद येथिल एस.आर.बी इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘आदिवासी संस्कृती महोत्सव’ साजरा.” (SRB International School Adivasi Divas Sajara)

SRB International School Adivasi Divas Sajara '९ ऑगस्ट जागतिक आदिवासी' दिनानिमित्त

शिरपुर (धुळे) – प्रतिनिधी

दहिवद येथील एस.आर.बी इंटरनॅशनल स्कूलमध्ये दिनांक ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त शाळेत जागर आदिवासीं संस्कृतीचा, लोकपरंपरा, नृत्य-वाद्य, राहणीमान, शिक्षण, बोली भाषा आदी संबधित अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे प्रमुख  पाहुणे एस.आर.बी इंटरनॅशनल स्कूल संस्थेचे अध्यक्षा भाग्यलक्ष्मी बाविस्कर यांच्या हस्ते लोकनायक व क्रांतिकारी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.

शाळेतील छोट्या-छोट्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी ५ ते ६ आदिवासी नृत्य हे आदिवासी पेहरावासह सादर केले. त्याचबरोबर क्रांतिकारी बिरसा मुंडा यांच्या कार्याविषयी चेअरमन डॉ. धीरज बाविस्कर सर आणि संचालिका मानसी बाविस्कर मॅडम यांनी माहिती दिली

याचबरोबर आदिवासी संस्कृती, चालीरीती, आदिवासी परंपरा आदी विषयी मुलांनी भाषणे दिली. उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना आदिवासींचे जीवन त्यांचे शिक्षण व इतर समस्यांबाबत श्रीमती  रोमा वळवी  यांनी मत मांडले. या कार्यक्रमात ‘आदिवासी संस्कृतीचा जागर’  या विशेष कार्यक्रमाने उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे मने जिंकण्यात यशस्वी ठरला. ( SRB International School Adivasi Divas Sajara )

प्रमुख पाहुणे म्हणून एस.आर.बी इंटरनॅशनल स्कूल संस्थेचे अध्यक्षा भाग्यलक्ष्मी बाविस्कर,  चेअरमन डॉ. धीरज बाविस्कर, संचालिका मानसी बाविस्कर, मानव संसाधन अधिकारी प्रविण देशमुख, शाळेचे प्राचार्य सुभाष पटले, पूर्व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापिका निवेदिता दुबे, शाळेचे, शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ जयश्री बोरसे मॅडम व सौ सुष्मा पाटील मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन महाजन सर यांनी मानले.

हेही वाचा :

Leave a Comment

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !