State Bank Of India बँकेत रक्कम घेण्यास नाकारल्याने पडले महागात

स्टेट बँकेत २० हजार पेक्षा कमी रक्कम घेण्यास नकार पोर्टलवर तक्रार होताच ग्राहक सेवा केंद्र सुरू.

शेगाव ■ कोणतेही आदेश नसताना सामान्य ग्राहक, वयस्कर, अपंग ग्राहकाना नाहक त्रास म्हणून शेगांव येथील दोन्ही ब्रांच मध्ये २० हजार किंवा त्या खालील रक्कम तेथील रोखपाल आणि शाखाधिकारी रोख रक्कम घेत नाही, उलट ग्राहक सेवा केंद्रात जाण्याचा सल्ला दिला जातो.


State Bank Of India : स्थानिक गांधी चौक शाखा परिसरात भारतीय स्टेट बँक चे कोणतेही ग्राहक सेवा केंद्र नाही. यामुळे रोख रक्कम घेणे व देणे या साठी कोणत्याही वरिष्ठ अधिकारीचे आदेश नसताना सुद्धा ग्राहकाना नाहक त्रास देण्याचा प्रकार वरील शाखेत सुरु होता. त्या बद्दल केंद्र सरकार च्या CPGRAM या पोर्टल वर व लोकपाल भारतीय स्टेट बँक यांचेकडे येथील रितेश खेतान यांनी तक्रार करताच रु. २० हजार पेक्षा कमी रक्कम.

ग्राहकांना बँक कामकाज बाबत काही तक्रार किंवा बँकचे अधिकारी कर्मचारी यांच्या कडून कायदा सोडून जबरदस्ती कोणतेही आदेश नसताना त्रास होत असल्यास ग्राहकांनी वरील पोर्टलवर ऑनलाइन तक्रार नोंदवावी असे आवाहन तक्रारकर्ता रितेश ओमप्रकाश खेतान यांनी केले आहे.

घेणे व देणे ही सुविधा शाखेत सुरु असल्याचा EMAILशाखाधिकारी द्वारे त्यांना पाठवण्यात आला.

ग्राहकाना त्रास नाहक देणाऱ्या रोखपाल व शाखाधिकारी विरूध्द तक्रार नोंदवताच त्याची दखल घेण्यात आली. आणि सर्वांच्या सुविधेकरीता ४ मार्चपासून बँक परिसरात ग्राहक सेवा केंद्र सुद्धा तात्काळ सुरु करण्यात आले.

(ता. प्र) ग्राहक सेवा केंद्र चालक हा अति दीड शहाणा असतोच ग्राहकाना नाहक त्रास होत पैसे काढून देतांना आणि पैसे भरतांना चार्जेस जास्त घेत असतांना दिसल्यास तात्काळ CPGRAM या पोर्टल तक्रारी करू शकता. तुम्ही ग्राहक सेवा केंद्र मध्ये पैसे काढत असतांना किंवा पैसे भरतांना कोणतेही चार्जेस लागत नसल्याचे सांगितले. असे बँकेचे शाखाधिकारी यांनी या वेळी सांगितले. 

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !