The birth anniversary of democrat Anna Bhau Sathe and the death anniversary of Lokmanya Tilak were celebrated with enthusiasm.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथी उत्साहात साजरी
The birth anniversary of democrat Anna Bhau Sathe and the death anniversary of Lokmanya Tilak were celebrated with enthusiasm


शेवगांवच्या रेसिडेन्शियल हायस्कूल मध्ये लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथी उत्साहात साजरी विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळकांचे गुण आत्मसात करावे प्रचार्य श्री.बालाजी गायकवाड

दि. १ ऑगस्ट शेवगाव  – टिळक फक्त संपादकच नव्हते तर संस्कृत, खगोलशास्त्र अशा विषयांची ते गाढे अभ्यासक होते. त्याचे बहुआयामी व्यक्तिमत्व होते .

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच “ असे ब्रिटिशाना ठणकावून सांगणारे लोकमान्य टिळक होते विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळकांचे गुण आत्मसात करावे.  असे प्रतिपादन विद्यालयाचे  प्राचार्य बालाजी गायकवाड केले. ते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

रेसिडेन्शिअल हायस्कूल मध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. 

या वेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दोन्ही महान नेत्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी दौंड मयुरी,सोलाट ईश्वरी ,देवढे वैष्णवी,नाईक स्नेहा,शिंदे ईश्वरी,बोडखे रितेश,भिसे वैष्णवी, आदी विद्यार्थ्यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे व बाळ गंगाधर टिळक  यांच्या जीवनावर मनोगते व्यक्त केले .दारकुंडे ओमकार याने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची वेशभूषा करून मनोगत व्यक्त केले.

या प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य बालाजी गायकवाड, उपमुख्याध्यापक रमेशचंद्र बेनके, श्रीम. शिंगटे मॅडम, विद्यालयातील जेष्ठ शिक्षक सुनिल वाघूंबरे,संजय दळवी व्यासपीठावर उपस्थित होते तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक बंधू-भगिनी शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बाळासाहेब गव्हाळ यांनी केले तर आभार रामनाथ काळे  यांनी मानले.

*अविनाश देशमुख शेवगाव* 

*सामाजिक कार्यकर्ता /पत्रकार*

Leave a Comment

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !