बापाला संपविण्यासाठी पोटच्या मुलाने स्क्रू ड्रायव्हरने केली हत्या

35 लाख बुडल्याने पोटच्या मुलाने केली हत्या The boy killed with a screwdriver
35 लाख बुडल्याने पोटच्या मुलाने केली हत्या The boy killed with a screwdriver
35 लाख बुडल्याने पोटच्या मुलाने केली हत्या The boy killed with a screwdriver

The boy killed with a screwdriver : बापाला संपविण्यासाठी पोटच्या मुलाने इंटरनेटवर शोधली मर्डर मिस्ट्री, आधी आइस्क्रीममधून दिल्या झोपेच्या गोळ्या, नंतर स्क्रू ड्रायव्हरने केली हत्या, शेअरमध्ये ३५ लाख बुडल्याने पैशांसाठी हत्या करून रचला दरोड्याचा बनाव.

दैनिक ग्रामीण बातम्या : छत्रपती संभाजीनगर: गेल्या आठ दिवसांपासून तो वडिलांचा मृत्यू होण्याच्या उद्देशाने त्यांना झोपेच्या गोळ्या देत होता. गोळ्यांचा त्यांच्यावर परिणाम झाला नाही. सोमवारी रात्री त्याने पुन्हा आइस्क्रीममधून गोळ्या दिल्या. तरीही मंगळवारी पहाटे वडील निवांत झोपलेले दिसल्यावर मुलाने पोटात स्कू ड्रायव्हर खुपसून जन्मदात्या वडिलांची कुर हत्या केली.

The boy killed with a screwdriver | बापाला संपविण्यासाठी पोटच्या मुलाने स्क्रू ड्रायव्हरने केली हत्या

शेअर मार्केटमध्ये लाखो रुपये हरून पोर्टफोलिओ घसरल्याने मानसिक स्थिती बिघडलेल्या मुलाने है घृणास्पद कृत्य केले, श्रीकृष्ण वामन पाटील (६०, रा. दीपनगर, सातारा) असे मृत वडिलांचे नाव असून मुलगा रोहित (३०) याला पोलिसांनी काही तासांत अटक केली.

सन २०२१ मध्ये महावितरणमधून ऑपरेटर पदावरून निवृत्त झालेले पाटील पत्नी बबिता, मुलगा रोहित, मुलगी गौरीसोबत राहत होते. गौरी बारावीची विद्यार्थिनी असून रोहितने अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेले आहे. त्यानंतर त्याने लाँड्री व्यवसाय सुरु करून शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग सुरू केले.

हेही वाचा : 

कोरोना काळात ट्रेडिंगमध्ये वेग घेतल्यानंतर आत्मविश्वास वाढला व टक्केवारीवर इतरांकडून गुंतवणूक सुरू केली. मागील दोन वर्षांत बाजाराच्या चढउतारात रोहित लाखो रुपये गमावून बसला. त्यानंतर जानेवारीपासून रोहितची पत्नी माहेरी राहते. गुंतवणूकदारांनी पैशांसाठी तगादा लावल्याने पाटील यांनी मुलासाठी २ एकर शेती विकून लोकांचे पैसे परत केले. लाँड्री व्यवसायही बंद पडला.

वडिलांना जमीन व पेन्शनचे पैसे मिळाल्याने रोहितला पुन्हा गुंतवणुकीची स्वप्ने पडायला लागली, पाटील यांनी त्यास आणखी पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला. त्याचा राग त्याच्या मनात होता. ट्रेडिंग उत्तम सुरु असताना रोहितचा वैयक्तिक पोर्टफोलिओ ३५ लाखांच्या घरात होता. त्या दरम्यान त्याने कुटुंबाची पॉलिसी काढली होती. वडिलांना मारून दरोड्याचा बनाव रचायचा व पॉलिसीचे पैसे घेण्याचा कट रोहितने रचला.

वडिलांना  श्वान जवळ जाताच बोबडी वळली The boy killed with a screwdriver

  • दरोड्याचा कॉल येताच साताऱ्याचे निरीक्षक ब्रह्मा गिरी, उपनिरीक्षक दिलीप बचाटे, अमोल कामठे, नंदकुमार भंडारी, गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप गुरमे, सहायक निरीक्षक काशीनाथ महांडुळे, उपनिरीक्षक विशाल बोडखे, संदीप सोळुंके यांनी धाव घेतली.
  • निरीक्षक गिरी यांना सुरुवातीलाच रोहितवर दाट संशय आला.
  • पोलिस स्थान पोहोचताच मृतदेहानंतर थेट ते रोहितजवळ गेल्यानंतर रोहितची बोबडी वळली.
  • संशय स्पष्ट होताच गुन्हे शाखेच्या गुरमे, बोडखे यांनी त्याला ताब्यात घेतले,
  • कसून चौकशीनंतर त्याने हत्येची कबुली दिली.

हत्या, आत्महत्येसाठी इंटरनेटवर रिसर्च The boy killed with a screwdriver

आठ दिवसांपासून रोहितने विविध माध्यमांतून वडिलांना झोपेच्या गोळ्यांची भुकटी खाऊ घातली. मात्र, गोळ्यांचा परिणाम झाला नाही. तो सोमवारी दुपारी बाहेर गेला व उस्मानपुयात बियर रिचवली, गळा कसा आवळावा, हत्या कशी करावी, आत्महत्या कशी करावी, हे इंटरनेटवर सर्च केले, त्यानंतर घरी परतला, रात्री वडिलांना आइस्क्रीममधून गोळ्या दिल्या.

पहाटे ५ वाजता तळमजल्यावर वडील झोपलेले दिसताच रोहितने त्यांचा गळा आवळला. वडिलांनी प्रतिकार करत त्याला लाथ घातली. मग रोहितने स्कू ड्रायव्हरने पोटाची चाळणी केली. वर जाऊन आईचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला; पण तितक्यात गौरीला जाग आली. वडिलांना उठवण्यासाठी तळमजल्यावर धाव घेतली; पण वडिलांना रक्ताच्या थारोळ्यात पाहून घाबरून ती घराबाहेर पळाली. हत्येनंतर रोहितने स्वतः ही गळ्याला इजा करून घेऊन लुटारूंनी मारल्याचा बनाव केला. ( The boy killed with a screwdriver )

Related News Post :

या शासकीय योजनांची माहिती वाचा :

  • १) मागेल त्याला वैयक्तिक शेततळे लिंक
  • २) मागेल त्याला वैयक्तिक नवीन विहिरी योजना लिंक
  • 3) नवीन विहीर अनुदान योजना 2024 : मिळेल 4 लाख रुपये लिंक
  • ४) Birsa Munda Kruishi Kranti Yojana in Marathi लिंक
  • ५) १०० % गाय गोठा अनुदान योजना लिंक

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !