जे लोकसेवक जनतेच्या पैशातून पगार घेतात त्यांना कामाला लावूयात..!
दि. 24/01/2023 विषय: सरकारी, खाजगी हॉस्पिटलमध्ये रुग्ण हक्काची सनद दर्शनी भागात लावणे बाबत.
(द चार्टर ऑफ राईट) ही सनद मानवी हक्क आयोग भारत सरकारने 13 जानेवारी 2020 रोजी त्यांच्या वेबसाइटवर प्रसारीत केलेली आहे. ही सनद जशीच्या तशी अरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकारने स्वीकारले आहे. व सदर सनद सर्वच राज्य सरकारला पाठविण्यात आलेली आहे. राज्य सरकारने त्यांच्या अरोग्य विभागा मार्फत सर्व हॉस्पिटलमध्ये लागू करावे अशे ही केंद्र सरकारने म्हणले आहे.
सरकारी, खाजगी हॉस्पिटलमध्ये रुग्ण हक्काची सनद दर्शनी भागात लावणे बाबत. चा gr. |
आपल्या जिल्ह्यातील बहुतांश हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या हक्काची सनद दर्शनी भागात लावलेले नाहीत. तरी ती लवकरात लवकर सर्वच हॉस्पिटलमध्ये लावण्यात यावे. कोणत्याही रुग्णांना त्यांच्या हक्काची जाणिव करून देणारा हा कायदा व माहिती मिळवण्याचा हक्क तपासणी, अपेक्षित खर्च रुग्णांच्या नोंदी केसपेर तपासणी अहवाल, सविस्तर बिले मिळविण्याचा हक्क मिळाले पाहिजे. त्या अनुशंगाने हे सर्व बाबींचा विचारात घेता सदरील रुग्णांच्या हक्काची सनद दर्शनी भागात सर्व हॉस्पिटलमध्ये लावण्यात यावे ही विनंती.
कळावे,
आपलाच
विलास प्रतापराव शिंदे
मु पो वसूर ता मुखेड जिल्हा नांदेड