Toll Plaza : टोल नाक्याच्या पावतीची किंमत समजुन घ्या.

टोल नाक्याच्या पावतीची किंमत समजुन घ्या व उपयोग करा.

महाराष्ट्र – राज्य अध्यक्षा ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती. “टोल नाक्यावर मिळणाऱ्या या पावती मध्ये दडलंय काय? आणि ती का जपून ठेवली पाहिजे?


त्याचे अतिरिक्त फायदे काय आहेत?” हे आज जाणून घेऊयात.

१. टोल भरलेल्या रस्त्यावरून जातांना जर का तुमची गाडी अचानक बंद पडली तर तुमच्या गाडीला ‘टो-अवे’ करून घेऊन जाण्याची जबाबदारी टोल घेणाऱ्या कंपनीची असते.

२. एक्सप्रेस हायवे वर जर का तुमच्या गाडीतील पेट्रोल संपलं किंवा बॅटरी डिस्चार्ज झाली तर तुम्हाला अश्या वेळी तुमच्या गाडीच्या जागेवर येऊन पेट्रोल, एक्सटर्नल चार्जिंग देण्याची जबाबदारी टोल घेणाऱ्या कंपनीची असते.पण, झालंच तर गाडी पूर्णपणे डाव्या साईड ला लावावी आणि टोल पावतीवर दिलेल्या फोन नंबर वर एक फोन करावा.दहा मिनिटात तुम्हाला मदत मिळेल आणि ५ ते १० लिटर पेट्रोल हे मोफत मिळेल. गाडी पंक्चर झाल्यास सुद्धा तुम्ही या नंबर वर संपर्क साधून मदत मिळवू शकता.

३. तुमच्या गाडीचा अपघात जरी झाला तरी तुम्ही किंवा तुमच्यासोबत असलेल्या कोणीही आधी हे टोल पावतीवर दिलेल्या फोन नंबर वर संपर्क साधणं आवश्यक आहे.

४. तुम्ही गाडीतून प्रवास करतांना जर का एखाद्या व्यक्तीची तब्येत अचानक बिघडली आणि त्या व्यक्तीला जर तातडीने दवाखान्यात नेणं आवश्यक होऊ शकतं. अश्या वेळेस अँम्ब्युलन्स तुमच्यापर्यंत पोहोचवणं ही जबाबदारी टोल कंपन्यांची असते.

ज्यांना ही माहिती नव्याने कळली असेल त्यांनी ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी. एक्सप्रेसवे मुळे वेळेची होणारी बचत हा त्याचा सर्वात मोठा फायदा म्हणावा लागेल.        

महाराष्ट्र -राज्य अध्यक्षा.

ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती.

नॅशनल महामार्ग टोलवर पिवळ्या रेषेबाहेर 10 सेकंद जरी ट्रॅफिक मध्ये वेळ लागल्यास टोल माफ…. – by NHAI


Leave a Comment

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !