Two college going girls and one youth are missing : महाविद्यालयात गेलेल्या दोन तरुणी अन् एक तरुण बेपत्ता : शिरपूर तालुक्यातील एकाच गावातील दोघांचा समावेश.
धुळे/शिरपूर : शिरपूर तालुक्यातील एकाच गावातील एक मुलगा व एक मुलगी तर साक्री तालुक्यातील एका गावातील महाविद्यालयीन मुलगी बेपत्ता झाल्याची घटना एकाच दिवशी घडली आहे. त्यांच्या पालकांनी शिरपूर आणि साक्री पोलिस ठाण्यात हरविल्याबाबत नोंद केली आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.
Two college going girls and one youth are missing : महाविद्यालयीन युवक युवती कॉलेजला जातो, असे सांगून घराबाहेर पडले
शिरपूर तालुक्यातील एका गावातील महाविद्यालयीन युवक युवती कॉलेजला जातो, असे सांगून घराबाहेर पडले असताना बेपत्ता झालेत. याबाबत शिरपूर पोलिसांत मिसिंग दाखल करण्यात आली आहे. २६ रोजी सकाळच्या सुमारास १९ वर्षीय युवती एफवायबीएचा पेपर देण्यासाठी घरातून बाहेर पडली होती. दुपारपर्यंत ती घरी परतली नाही.
तिच्या घरच्यांनी तिच्या मैत्रिणीकडे विचारणा केली; मात्र तिने काहीच उत्तर दिले नाही. त्यामुळे तिचे वडील थेट कॉलेजला विचारणा करण्यासाठी गेले. तेथील शिक्षकांनी ती पेपर देण्यासाठी आलीच नाही, असे सांगितले. तिचा परिसरात शोध घेऊनही मिळून आली नाही. अखेर शिरपूर पोलिसांत मिसिंग झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली.
तपास हवालदार रोकडे हे करीत आहेत. दुसरी घटनादेखील २६ रोजी घडली. शिरपूर तालुक्यातील याच गावातील २४ वर्षीय तरुण कॉलेजला पेपर देऊन येतो, असे सांगून घराबाहेर पडला होता. उशिरापर्यंत तो घरी न आल्याने त्यांच्याकडे असलेल्या मोबाइलवर त्याच्या वडिलांनी संपर्क साधला असता तो बंद मिळून आला. Two college going girls and one youth are missing
गावात शोध घेऊनही मिळून आला नाही. त्यामुळे त्याच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून शिरपूर पोलिसात मिसिंग दाखल करण्यात आली आहे. तपास हवालदार ईशी हे करीत आहेत. तर साक्री तालुक्यातील एका गावातील २० वर्षीय युवती २६ रोजी सकाळच्या सुमारास एफवायबीएचा पेपर देण्यासाठी घरातून बाहेर पडली होती.
काही तासांनी तिने वडिलांना मला आता परत घरी यायचे नाही, असे फोनवरून सांगितले. तिच्या वडिलांनी थेट कॉलेज गाठले व शिक्षकांना तिच्याबाबत विचारणा केली. शिक्षकांनी ती पेपरसाठी आलीच नाही, असे सांगितले. त्यानंतर तिच्या वडिलांनी तिच्या मैत्रिणींना विचारपूस केली. मात्र, तिच्याबाबत काहीच माहिती मिळाली नाही. याप्रकरणी साक्री पोलिस ठाण्यात हरविल्याबाबत नोंद करण्यात आली. तपास हवालदार रायते हे करीत आहेत.
Read More :
अशाच नवनवीन माहिती साठी : शासकीय योजना : माहिती अधिकार : ग्रामपंचायत चे माहिती : साठी आमच्या सोसिअल मेडिया ला जॉईन व्हा : आम्ही दररोज नवीन माहिती शेअर करत असतो. महाविद्यालयात गेलेल्या दोन तरुणी अन् एक तरुण बेपत्ता : Two college going girls and one youth are missing
Related Notification Information : | Click Here |
Join Us On WhatsApp | Click Here |
Join Us On Telegram | Click Here |
Join Us On Facebook | Click Here |
Official Website Information | Click Here |