Unlimited internet data’ will be available from ration shop

Unlimited internet data Ration Shop : रेशन दुकानातून आता ‘आटा’ सोबत ‘अनलिमिटेड डेटा’, मोदी सरकारचा मोठा निर्णय…

ब्रेकिंग. मोबाईल युजर्ससाठी आनंदाची बातमी आहे.

Unlimited internet data Ration Shop
Unlimited internet data Ration Shop 


ग्रामीण भागात इंटरनेटचे जाळे विस्तारण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून, आता रेशन दुकानातून स्वस्त धान्यासोबतच नागरिकांना इंटरनेट डेटाही उपलब्ध करुन दिला जाणार आहे, तेही अगदी अनलिमिटेड.. त्यासाठी मोदी सरकारने पीएम वाणी (पंतप्रधान वायफाय एक्सेस नेटवर्क इंटरफेस) ही योजना सुरू केली आहे.

केंद्र सरकार या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातही रेशन दुकानाच्या माध्यमातून ‘वायफाय’ व इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. या योजनेद्वारे सार्वजनिक ठिकाणी वायफायची सुविधा दिली जाईल. त्यासाठी देशभर सार्वजनिक डेटा कार्यालये उभारली जातील.

रेशन दुकानांंतही ही डेटा कार्यालये असतील. तेथूनच परिसरातील नागरिकांना वायफायद्वारे इंटरनेटची सुविधा मिळेल. रेशन दुकानांचे जाळे देशाच्या कानाकोपऱ्यात पसरलेले असल्याने त्या माध्यमातून अगदी दुर्गम भागातही इंटरनेट पोहोचवता येणार आहे.

अशी होणार अंमलबजावणी.

सार्वजनिक डेटा कार्यालय (पीडीओ) : वायफायची स्थापना, देखभाल व संचलन करील. ग्राहकांना ब्रॉड बँड सेवा देईल.

सार्वजनिक डेटा कार्यालय एग्रिग्रेटर (पीडीओए) : सार्वजनिक डेटा कार्यालयांना एकत्रित आणेल. अधिकृत व लेखांकनाशी संबंधित कार्य करील.

प प्रदाता (प्रोव्हायडर) : युजर्सची नोंदणी, तसेच परिसरात वानी अनुरूप हॉटस्पॉट शोधण्यासाठी ॲप विकसित करील आणि इंटरनेट सेवेमध्ये प्रवेश करण्यासाठी ॲपमध्ये तशी सुविधा उपलब्ध करून देईल.

केंद्रीय नोंदणी : सार्वजनिक डेटा कार्यालय, सार्वजनिक डेटा कार्यालय एग्रिग्रेटर ॲप प्रदाता यांचे तपशील ठेवतील. सुरुवातीला केंद्रीय नोंदणी सी-डॉटद्वारे ठेवली जाईल.

कशी मिळणार सेवा..?

रेशन दुकान परिसरातील जवळपास 200 मीटर परिसरातील नागरिक या सेवेचा लाभ घेऊ शकतील. सध्या या सेवेसाठी निश्चित दर ठरलेले नसले, तरी 100 रुपयांत अनलिमिटेड 4G इंटरनेट सेवा मिळेल. अगदी एक दिवसांसाठीही ही सेवा घेता येईल. त्यासाठी ग्राहकांना पाच रुपये मोजावे लागतील. त्यात 70 टक्के दुकानदार, तर 30 टक्के कमाई कंपनीला मिळणार असल्याचे सांगण्यात आले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *