पावसाळा जवळ आल्याने शेतकरी राजा लागला मान्सूनच्या पुर्वतयारीला.
शिरपूर: तालुक्यातील ग्रामीण भागात शेतकरी राजा मान्सूनच्या पुर्वतयारीला लागल्याचे चित्र दिसत आहे. पावसाळा तोंडावर आला आहे. बागायतदार शेतकरी शेतातील पिके आवरण्याची जोरदार तयारी सुरू आहे. उन्हाळ्यात ऊन चांगलेच जाणवत असून, तापमान ४२ अंशाच्या पार गेले आहे.
पावसाळा जवळ आल्याने शेतीच्या मशागतीस वेग आला आहे. कडक उन्हामुळे शेतकरी पहाटे अथवा सायंकाळी तापमान कमी झाल्यावर शेती मशागतीची कामे करत आहे. पावसाचे येत्या पंधरा ते वीस दिवसांत आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांनी शेतीची मशागत करण्यास सुरुवात केली आहे.
हेही वाचा – 👇🏻👇🏻👇🏻
शेतकऱ्याला बळीराजा असे का! म्हंटले जाते.लिंक
तालुक्यातील आदिवासी ग्रामीण भागात शेतीची मशागत करण्याकरिता गावातील लोकांना मदतीकरिता बोलाविले जाते, त्यास “ढास” असे म्हणतात. तसेच आदिवासी पट्ट्यात घर दुरूस्ती व नवीन घर बांधण्यास वेग आल्याचे चित्र तालुक्यातील अनेक गावांत दिसून येत आहे. ज्या व्यक्तीचे घर बांधायचे असेल किंवा शेतीची मशागत करायची असेल त्या व्यक्तीकडून घर बांधण्यासाठी किवा शेतीची मशागत करण्याकरिता मदत म्हणून आलेल्या नागरीकांना मेजवाणी स्वरुपात जेवण दिल जात.
गावातील प्रत्येक घराचे एक ना एक नागरिक “ढास” साठी निस्वार्थ मनाने स्वत: मदतीला धावुन येत असतात कुठल्याही प्रकारे मोबदला न घेता सामाजिक मदत म्हणुन दिवसभर स्व:खुशीने कार्य करीत असतात. या कार्यात सामाजिक बाधिंलकी व कठिण काळात एक दुसऱ्याला मदत करणे तसेच मानवतेच दर्शन घडुन येत असत.
Leave a Reply